मंगलवार, 28 जुलाई 2009

श्रीगुरुचरित्र- अष्टमोऽध्यायः

श्रीगणेशायनमः ।नामधारक म्हणे सिद्धासी  गोकर्णमहिमा निरोपिलासी 
 श्रीगुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय सांग ॥१॥श्रीगुरुमूर्ति कृपासिंधु
 माझे मनी लागला वेधु चरित्र ऐकतां महानंदु अतिउल्हास होतसे ॥२॥
परिसोनि
शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अतिगहन सागता झाला विस्तारोन
श्रोते तुम्ही अवधारा ॥३॥गोकर्णक्षेत्री श्रीपाद यति राहिले वर्षे तीन गुप्ती
 तेथोनि श्रीगिरिपर्वता येती लोकानुग्रहाकारणे ॥४॥जयाचे करिता चरणदर्शन
 समस्त तीर्थासमान जाण 'चरणं पवित्रं विततं पुराणं वेदश्रुति ऐसे बोलतसे ॥५॥
समस्त
र्थे गुरुचरणी तो कां हिंडे तीर्थभवनी लोकानुग्रहालागुनी
जात असे परियेसा ॥६॥मास चारी क्रमोनि तेथे आले निवृत्तिसंगमाते
दर्शन देती साधुभक्तांते पातले तया कुरवपुरा ॥७॥कुरवपुर महाक्शेत्र
कृष्णा
गंगा वाहे नीर महिमा तेथील सांगता अपार
 भूमंडाळात र्लभ ॥८॥तेथील महिमा सांगता विस्तार होईल बहुत कथा
पुढे असे चरित्र अमृता सांगेन ऐका एकचित्ते ॥९॥श्रीपाद राहिले कुरवपुरी
ख्याति
राहिली भूमीवरी प्रगटे महिमा अपरंपारी
 सांगतां विस्तार असे देखा ॥१०॥जे जन भजती भक्तीसी सौख्य पावती अप्रयासी
कन्या पुत्र लक्ष्मीसी चिंतिले फळ पावती ॥११॥समस्त महिमा सांगावयासी
 विस्तार होईल बहुवसी नामधारका स्वस्थ परियेसी
सांगेन किंचित् तुज आतां ॥१२॥पुढे अवतार व्हावया गति सांगेन ऐका एकचित्ती
श्रीपाद कुरवपुरा असती कार्यकारणमनुष्यदेही ॥१३॥अवतार व्हावयाचे कारण
सांगेन त्याचे पूर्वकथन वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी ॥१४॥
त्याची
भार्या होती देखा नाम तियेचे अंबिका सुशील आचार पतिसेवका
महापुण्य
सती देखा ॥१५॥तियेसी पुत्र होऊनि मरती पूर्वकर्मफळ अर्जिती
 अनेक तीर्थे आचरती तिणे केलि परियेसा ॥१६॥ऐसे असतां जे होणार गति
 पुत्र जाहला मंदमति माता स्नेह करी भक्ती अपूर्व आपणासी म्हणोनि ॥१७॥
वर्धता
मातापित्याघरी विप्रात्मज वाढला प्रीतिकरी व्रतबंध करिती कुळाचारी
वेदाभ्यास
करावया ॥१८॥विद्या नये तया कुमरा मंदमति अज्ञान बहिरा
 चिंता वर्ते त्या द्विजवरा म्हणे पुत्र मंदमति ॥१९॥अनेक देव आराधोनि
पुत्र लाधलो कष्टोनि प्राचीन कर्म सुटे म्हणोनि चिंता करी अहोरात्र ॥२०॥
अनेक
प्रकारे शिकवी त्यासी ताडन करी बहुवसी होतसे दुःख जननीसी
 वर्जी आपुले पतीते ॥२१॥पतीसी म्हणे ते नारी पुत्र नाहीत आम्हा घरी
कष्ट करोनि नानापरी पोसिले एका बाळकसी ॥२२॥विद्यान येचि वेद त्यासी
वाया
मारून का कष्टसी प्राचीन कर्म सुटे त्यासी की मूढ होऊनि उपजावे ॥२३॥
आतां
जरी तुम्ही यासी ताडन कराल अहर्निशी प्राण त्यजीन मी भरवसी
म्हणोनि विनवी पतीते ॥२४॥स्त्रियेचे वचन ऐकोनि विप्र राहिला निचिंत मनी
ऐसा काही काळ क्रमोनि होती तया ग्रामांत ॥२५॥वर्तता ऐसे तया स्थानी
विप्र पडला असमाधानी दैववशेकरूनि पंचत्व पावला परियेसा ॥२६॥मग पुत्रासहित ते नारी
 होती तेथे कुरवपुरी याचूनि आपुले उदर भरी येणेपरी जीवित्व रक्षी ॥२७॥
विप्रस्त्रियेचा
पुत्र देखा विवाहाहायोग्य झाला निका निंदा करिती सकळीका
मतिहीन
म्हणोनिया ॥२८॥कन्या देती तयासी कोणी। म्हणती काष्ठे वाहतो का पाणी
 समस्त म्हणती असे दूषणी उदर भरी येणे विद्ये ॥२९॥समस्त लोक म्हणती त्यासी
तू
दगडापरी व्यर्थ जन्मलासी लांछन लाविले वंशासी अरे मूर्खा कुळनाशका ॥३०॥
तुझ्या
पितयाचा आचार ख्याति असे चारी राष्ट्र जाणे धर्म वेद शास्त्र
 त्याचे पोटी अवतरलासी ॥३१॥बोल आणिलासी तुवा पितरांसी घातले तया अधोगतीसी
 भिक्षा मागोनि उदर भरिसी लाज कैसी तुज वाटे ॥३२॥जन्मोनिया संसरी
 काय व्यर्थ पशूचिये परी अथवा गंगेत प्रवेश करी काय जन्मोनि सार्थक ॥३३॥
ऐसे
ऐकोनि ब्रह्मचारी दुःख करीत नाना प्रकारी मातेसि म्हणे ते अवसरी प्राण त्यागीन मी आता ॥३४॥निंदा करिती सर्वही मज असोनि देह कवण काज पोसू शके माते तुज ईन अरण्यवासास॥३५॥ऐकोनि पुत्राचे वचन माता करी चिंता गहन शोकदुःखेकरून विलाप करी ते नारी ॥३६॥माता सुत दुःख करीत गेली गंगाप्रवाहात तेथे देखिले जगदुद्धरित श्रीपाद योगी स्नान करिता ॥३७॥जाऊनि दोघे लागती चरणी विनविताती कर जोडुनी वासनअसे आमुचे मनी प्राण त्यजावा गंगेत ॥३८॥निरोप द्यावा जी आम्हांसी सद्गति व्हावया कारणासी आत्महत्या महादोषी म्हणोनि विनवितो कृपासिंधु ॥३९॥ऐकोनि विप्रसतीचे वचन पुसती श्रीपाद कृपायमान कां संकटी तुमचे मन त्यजिता प्राण काय निमित्त ॥४०॥विप्रस्त्री तया वेळा सांगतसे दुःखा सकळा म्हणे स्वामी भक्तवत्सला तारावे आम्हा बाळकाते ॥४१॥पुत्रावीण कष्ट भारी अनेक तीर्थे पादचारी केले व्रत पूजा जरी सकळ देव आराधिले ॥४२॥व्रते उपवास सांगू किती करिते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मति निंदा करिती सकळ जन ॥४३॥वेदशास्त्रसंपन्न पति माझा होता ब्राह्मण त्याचिये पोटी झाला हीन मंदमति दुरात्मा हा ॥४४॥कृपा करी गा श्रीपाद यति जन्मोजन्मी दैवगति पुत्र व्हावा मंदमति ऐसा प्रकार सांगावा ॥४५॥कृपासागर दैन्यहरण म्हणोनि धरिले तुझे चरण शरणागताचे करावया रक्षण आलासि आजि कृपासिंधु ॥४६॥जन्मोनिया संसारी कष्ट केले नानापरी देखेचि सौख्यकुसरी परी जाहले पुत्र राहती ॥४७॥वाचोनिया हा एक सुत शेळीचे गळा स्तन लोंबत वृथा जन्मला म्हणत विनवीतसे श्रीगुरूसी ॥४८॥देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावणे जैसा पूज तू जगत्त्रयासी ॥४९॥सकळ लोक ज्यासि वंदिती ऐसा पुत्र व्हावा म्हणे ती उपाय सांगा श्रीगुरु यती म्हणोनि चरणां लागली ॥५०॥त्याचेनि माते उद्धारगति मागुती होय पुनरावृत्ति पितरां सकळा स्वर्गप्राप्ति लाधे ऐसे निरोपावे ॥५१॥वासना असे माझे मनी पुत्र हावा ब्रह्मज्ञानी बाळपणिच पाहो नयनी पूज्यमान समस्तांसी ॥५२॥ऐकोनि तियेचे वचन सांगती कृपा भक्ति पाहोन करी वो ईश्वरआराधन पुत्र होईल श्रीहरीऐसा ॥५३॥गौळियाचे घरी देखा कृष्ण उपजला कारणिका व्रत केले गौळी ऐका ईश्वराची आराधना ॥५४॥तैसा तू आराधी ईश्वर पुत्र पावशील हा निर्धार तुझा मनोरथ साचार पावेल सिद्धि श्रीपाद म्हणती ॥५५॥विप्रस्त्री म्हणे ते वेळी कैसे व्रत आचरले गौळी कैसा पूजिला चंद्रमौळी विस्तारावे मजप्रती ॥५६॥तैसेच व्रत करीन आपण म्हणोनि धरी सद्गुरुचरण कृपामूर्ति सद्गुरु जाण सांगता झाला ते वेळी ॥५७॥म्हणती श्रीपाद यति तियेसी ईश्वर पूजी हो प्रदोषी मंदवारी तू विशेषी पूजा करी भक्तीने ॥५८॥पूजा करी जे गौळणी विस्तार असे स्कंदपुराणी कथा सांगेन ऐक कानी म्हणती श्रीगुरु तियेसी ॥५९॥ऐकोन श्रीगुरूचे वचना संतोषली विप्रांगना पुढती घाली लोटांगणा तया श्रीपाद श्रीगुरूप्रती ॥६०॥विप्रस्त्री म्हणे स्वामीसी अभिनव माते निरोपिलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णा ऐस ॥६१॥आपण केलिया पूजा जरी फळ पावेन निर्धारी पुर्वी कवणे परी विस्तारावे दातारा ॥६२॥श्रीगुरु सांगती तियेसी सांगेन ऐक एकचित्तेसी उज्जनी नाम नगरीसी जाहले विचित्र परियेसा ॥६३॥तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मपरायण त्याचा सखा असे प्राण मणिभद्र नामे परियेसा ॥६४॥सदा ईश्वरभक्ति करी नाना प्रकारे अपरंपारी भोळा देव प्रसन्न करी दिधला चिंतामणि एक ॥६५॥कोटिसूरयांचा प्रकाश माणिक शोभे महासरस कंठी घालिता महाहर्ष तया मणिभद्ररायासी ॥६६॥तया मण्याचे लक्षण सुवर्ण होय लोह पाषाण तेज फाकले ज्यावरी जाण ते कनक होय परियेसा ॥६७॥जे जे चिंतीत मानसी ते ते पावत त्वरितेसी ऐशी ख्याति माणिकासी समस्त राजे कांक्षा करिती ॥६८॥इष्टत्वे मागती किती एक मागो पाठविती ते माणिक बलात्कारे इच्छिती एक राजे वांछिती परियेसा ६९॥म्हणती विक्रय करूनि देखा आपणा द्यावे ते माणिका जरी देशी स्वाभाविका तरी युद्धालागी येऊ म्हणती ॥७०॥राजे समस्त मिळोनि पातले नगराते उज्जनी अपार सैन्य मिळवूनि वेढिले तया नगरासी ॥७१॥ते दिवशी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजनासी शंका धरितां मानसी एकचित्ते पूजीतसे ॥७२॥महाबळेश्वरलिंगासी पूजा करी तो राजा हर्षी गौळियाचा कुमर पहावयासी आला तया शिवालया ॥७३॥पूजा पाहोनि शिवाची मुले म्हणती गौळियांची खेळू चला आम्ही असेची लिंग करुनि पुजू आता ॥७४॥म्हणोनि विनोदेकरूनि आपुले गृहासन्निधानी एकवटोनि पाषाणी कल्पिले तेथे शिवालय ॥७५॥पाषाणाचे करूनि लिंग पूजा करीत बाळके चांग नानापरीची पत्री सांग कल्पिली तेथे पूजेसी ॥७६॥षोडशोपचारे पूजा करिती उदक नैवेद्य समर्पिती ऐसे कौतुके खेळती गोपकुमर तये वेळी ॥७७॥गोपिकस्त्रिया येउनी पुत्रांते नेती बोलावुनी भोजनाकारणे म्हणोनि गेले सकळही बाळक ॥७८॥त्यातील एक गोपीसुत लिंगभुवन सोडित त्याची माता जवळी येत मारी आपुले पुत्रासी ॥७९॥म्हणे कुमारा जनासी चाल गृहासी झाली निशी काही केल्या जाय परियेसी गोपकुमारक ॥८०॥कोपेकरूनि ते गौळिणी मोडी पूजा खेळ अंगणी पाषाण दूर टाकुनी गेली आपुले सदनासी ॥८१॥पूजा मोडिता तो बाळक प्रलाप करी अनेक मूर्च्छा येऊनि क्षणेक पडिला भूमी अवधार ॥८२॥लय लावूनी लिंगस्थानी प्राण त्यजू पाहे निर्वाणी प्रसन्न झाला शूलपाणी तया गोपसुताकारणे ॥८३॥शिवालय रत्नखचित सूर्यासमान प्रभावंत लिंग दिसे रत्नखचित जागृत झाला तो बाळ ॥८४॥ निजरूप धरी गौरीरमण उठवी बाळ करी धरून वर माग म्हणे मी झालो प्रसन्न देईन जे वांछिसी ते ॥८५॥बाळके नमिले ईश्वरासी कोप करावा मातेसी पूजा बिघडली तव प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे ॥८६॥ईश्वर भोळा चक्रवर्ती वर दिधला बहुप्रीती प्रदोषसमयी पूजा देखती गौळिणी होय देवजननी ॥८७॥तिचे पोटी होईल सुत तोचि विष्णु अवतार ख्यात करी पूजा पाहिली म्हणत पोषील आपुले पुत्रासी ॥८८॥जे जे मानसी तू इच्छिसी पावेल ते ते धरी मानसी अखिल सौख्य तुझिया वंशासी पुत्रपौत्रेसी नांदसील ॥८९॥प्रसन्न होवोनि गिरिजापती गेले लिंगालयी गुप्ती लिंग राहिले रत्नखचिती गौळियाघरी याचिपरी ॥९०॥कोटिसूर्यप्रकाश शिवलय दिसे अति सुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा ॥९१॥आले होते परराष्ट्रराजे विस्मय करिती चोजे सांडूनि द्वेष बोलती सहजे भेटू म्हणती रायासी ॥९२॥पाहे या पवित्र नगरांत सूर्य झाला असे उदित राजा असे बहु पुण्यवंत ऐसियासी विरोध करावा ॥९३॥महणोनि पाठविती सेवकासी भेटू म्हणती रायासी राजा बोलवी तयांसी आपुले गृहासी नगरांत ॥९४॥इतुके होता ते अवसरी राजा पुसतसे प्रीतिकरी रात्री असतां अंधकारी उदय पावला केवी सूर्य ॥९५॥राजा चंद्रसेनसहित पाहावया येती कौतुकार्थ दिसे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपम ॥९६॥येणेचि परी गौळ्याचे सदन अतिरम्य विराजमान पुसता झाला आपण तया गौळिकुमारकाते ॥९७॥सांगितला सकळ वृत्तान्त संतोष करिती राजे समस्त गौळियांत राजा तू म्हणत देती नानादेशसंपदा ॥९८॥निघोनि गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनिप्रदोष पूजा सफळ भय कैचे तया राजा ॥९९॥गौळीकुमर येऊनि घरा सांगे माते सविस्तरा पुढे येईल तुझ्या उदारा नारायण अवतरोनि ॥१००॥ऐसा ईश्वरे दिधला वर संशय करी तू निर्धार संतोषला कर्पूरगौर देखिली पूजा प्रदोषाची ॥१॥मोडिली पूजा म्हणोनि म्यां विनविला शूलपाणी षमा करूनि घेतले म्हणोनि सांगे वृत्तान्त मातेसी ॥२॥ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोषपूजने तया फळला श्रीपाद सांगती तया वेळा विप्रस्त्रियेकारणे ॥३॥तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मजसरी संशय सांडूनि निर्धारी शनिप्रदोषी पूजी शंभू ॥४॥ऐसे म्हणोनि श्रीपादद चक्रवर्ती भोळा शिव विप्रस्त्रियेचा पाहोनि भाव प्रसन्न होत तया वेळी ॥५॥बोलावूनि तिचे कुमारासी हस्त ठेविती मस्तकेसी ज्ञान जाहले तत्काळेसी त्रिवेदी झाला तो ब्राह्मण ॥६॥वेदशास्त्रादि तर्कभाषा म्हणता झाला अतिप्रकाशा विस्मय झाला असे सहसा विप म्हणती आश्चर्य ॥७॥विस्मय करोनि विप्रवनिता म्हणे ईश्वर हाचि निश्चिता कार्याकारणे अवतार होता आला नरदेह धरोनि ॥८॥पूर्वजन्मीचे पुण्यार्जित जोडला आम्हहा निश्चित भेटला असे श्रीगुरुनाथ म्हणोनि नमिती क्षणोक्षणा ॥९॥म्हणे ईशर तूचि होसी पूजा करीन झी मी प्रदोषी मिथ्या नोहे तुझे वाक्यासी पुत्र व्हावा तुज ऐसा ॥११०॥ऐसा निश्चय करोनि पूजा करिती नित्य येऊनि प्रदोषपूजा अति गहनी करी श्रीपादरायासी ॥११॥पुत्र तिचा झाला ज्ञानी वेदशास्त्रार्थसंपन्नी पूज्या जाहला सर्वांहूनि ब्रह्मवृंद मानित ॥१२॥विवाह झाल मग यासी पुत्रपौत्री नांदे हर्षी श्रीगुरुकृपा होय ज्यासी ऐसे होय अवधारा ॥१३॥ऐसा श्रीगुरु कृपावंत भक्तजना असे संरक्षित ऐक शिष्या एकचित्त नामधारका श्रीमता ॥१४॥नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी परियेसा समस्त अहर्निशी म्हणे सरस्वतीगंगाधरू ॥११५॥इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्यानेसिद्धनामधारकसंवादे प्रदोषव्रतमाहात्म्यकथनं नाम अष्टमोऽध्यायः ॥८॥श्रीदत्तात्रेयार्पितमस्तु ओवीसंख्या ॥११५॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु</span>
 


--
Ravindra S. Dhurandhar
Ph No.9324107806
http://gorakhmantras-ravidhurandhar.blogspot.com/

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें