मंगलवार, 28 जुलाई 2009

श्रीगुरुचरित्र - दशमऽध्यायः

श्रीगणेशाय नमः ।ऐकोनि सिद्धाचे वचन ।
 नामधारक विनवी जाण । कुरवपुरीचे महिमान ।
केवी जाहले परियेसा ॥१॥म्हणती श्रीपाद नाही गेले ।
 आणि म्हणती अवतार झाले । विस्तार करोनिया सगळे ।
निरोपावे म्हणतसे ॥२॥सिद्ध सांगे नामधारकासी ।
 श्रीगुरुमहिमा काय पुससी । अनंतरूपे होती परियेसी ।
 विश्वव्यापक परमात्मा ॥३॥पुढे कार्यकारणासी ।
अवतार
झाले परियेसी । राहिले आपण गुप्तवेषी ।
तया
कुरवक्षेत्रांत ॥४॥पाहे पा भार्गवराम देखा ।
अद्यापवरी भूमिका । अवतार जाहले अनेका ।
 त्याचेच एकी अनेक ॥५॥सर्वा ठायी वास आपण ।
 मूर्ति एक नारायण । त्रिमूर्तीचे तीन गुण उत्पत्ती स्थिति आणि प्रलय ॥६॥
भक्तजना
तारावयासी । अवतरतो ह्रषीकेशी । शाप देत दुर्वासऋषि ।
कारण असे तयांचे ॥७॥त्रयमूर्तीचा अवतार ।
याचा कवणा न कळे पार । निधान तीर्थ कुरवपूर ।
 वसे तेथे गुरुमूर्ति ॥८॥जे जे चिंतावे भक्तजने ।
ते ते पावे गुरुदर्शने । श्रीगुरु वसावयाची स्थाने ।
कामधेनु असे जाणा॥९॥
श्रीपादवल्लभस्थानमहिमा
। वर्णावया अनुपमा ।
अपार असे सांगतो तुम्हा । दृष्टान्तेसी अवधारा ॥१०॥
तुज
सांगावया कारण । गुरुभक्ति वृथा नव्हे जाण ।
 सर्वथा न करी निर्वाण । पाहे वाट भक्तांची ॥११॥
भक्ति
करावी दृढतर । गंभीरपणे असावे धीर ।
 तरीच उतरिजे पैलपार । इहपरत्री सौख्य पावे ॥१२॥
याचि
कारणे दृष्टान्ते तुज । सांगेन ऐक वर्तले सहज ।
 काश्यपगोत्री होता द्विज । नाम तया वल्लभेश ॥१३॥
सुशील
द्विज आचारवंत । उदीम करूनि उदर भरीत ।
 प्रतिसंवत्सरी यात्रेस येत । तया श्रीपादक्षेत्रासी ॥१४॥
असता
पुढे वर्तमानी । उदीमा निघाला तो धनी ।
 नवस केला अतिगहनी । संतर्पावे ब्राह्मणासी ॥१५॥
उदीम
आलिया फळासी । यात्रेसी येईन विशेषी ।
सहस्त्र संख्या ब्राह्मणांसी । इच्छाभोजन देईन म्हणे ॥१६॥
निश्चय
करोनि मानसी । निघाला द्विजवर उदीमासी ।
 चरण ध्यातसे मानसी । सदा श्रीपादवल्लभाचे ॥१७॥
जे
जे ठायी जाय देखा । अनंत संतोष पावे निका ।
शतगुणे
लाभ झाला ऐका । परमानंदा प्रवर्तला ॥१८॥
लय
लावूनि श्रीपादचरणी । यात्रेसि निघाला ते क्षणी ।
 वेचावया ब्राह्मणसंतर्पणी । द्रव्य घेतले समागमे ॥१९॥
द्रव्य
घेऊनि द्विजवर । निघता देखती तस्कर ।
 कापट्यवेषे सत्वर । तेही सांगते निघाले ॥२०॥
दोन
-तीन दिवसांवरी । तस्कर असती संगिकारी ।
एके दिवशी मार्गी रात्री । जात असता मार्गस्थ ॥२१॥
तस्कर
म्हणती द्विजवरासी । आम्ही जाऊ कुरवपुरासी ।
 श्रीपादवल्लभदर्शनासी । प्रतिवर्षी नेम असे ॥२२॥ऐसे बोलती मार्गासी ।
 तस्करी मारिले द्विजासी । शिर छेदूनिया परियेसी ।
द्रव्य घेतले सकळिक ॥२३॥भक्तजनांचा कैवारी ।
 श्रीपादराव कुरवपुरी । पातला त्वरित वेषधारी ।
जटामंडित
भस्मांकित ॥२४॥त्रिशूळ खट्‍वांग घेऊनि हाती ।
उभा ठेला तस्करांपुढती । वधिता झाला तयांप्रती ।
त्रिशूळेकरूनि
तात्काळ ॥२५॥समस्त तस्करा मारिता ।
एक
तस्कर येऊनि विनविता । कृपाळुवा जगन्नाथा ।
निरपराधी आपण असे ॥२६॥नेणे याते वधितील म्हणोनि ।
आलो आपण संगी होऊनि । तू सर्वोत्तमा जाणसी मनी ।
 विश्वाची मनवासना ॥२७॥ऐकोनि तस्कराची विनंती ।
श्रीपाद त्याते बोलाविती । हाती देऊनिया विभूति ।
विप्रावरी प्रोक्षी म्हणे ॥२८॥मन लावूनि तया वेळा ।
मंत्रोनि लाविती विभूती गळा । सजीव जाहला तात्काळा ।
ऐक वत्सा ऐकचित्ते ॥२९॥इतुके वर्तता परियेसी ।
 उदय जाहला दिनकरासी । श्रीपाद जाहले गुप्तेसी ।
राहिला
तस्कर द्विजाजवळी ॥३०॥विप्र पुसतसे तस्करासी ।
 म्हणे तू माते का धरिलेसी । कवणे वधिले तस्करासी ।
म्हणोनि
पुसे तया वेळी ॥३१॥तस्कर सांगे द्विजासी ।
आला होता एक तापसी । जाहले अभिनव परियेसी ।
वधिले तस्कर त्रिशूळे ॥३२॥मज रक्षिले तुजनिमित्ते ।
धरोनि बैसविले स्वहस्ते । विभूति लावूनि मग तूते ।
सजीव केला तव देह ॥३३॥उभा होता आता जवळी ।
अदृश्य जाहला तत्काळी । न कळे कवण मुनि बळी ।
 तुझा प्राण रक्षिला ॥३४॥होईल ईश्वर त्रिपुरारि ।
भस्मांगी होय जटाधारी । तुझी भक्ति निर्धारी ।
म्हणोनि आला ठाकोनिया ॥३५॥ऐकोनि तस्कराचे वचन ।
 विश्वासला तो ब्राह्मण । तस्कराजवळिल द्रव्य घेऊन ।
गेला यात्रेसी कुरवपुरा ॥३६॥नानापरी पूजा करी ।
ब्राह्मणभोजन सहस्त्र चारी । अनंतभक्ती प्रीतिकरी ।
 पूजा करी श्रीपादुकांची ॥३७॥ऐसे अनंत भक्तजन ।
मिळूनि
सेविती श्रीपादचरण । कुरवपूर प्रख्यात जाण ।
 अपार महिमा ॥३८॥सिद्ध म्हणे नामधारकासी ।
संशय न धरी तू मानसी । श्रीपाद आहेती कुरवपुरासी ।
अदृश्यरूप होऊनिया ॥३९॥पुढे अवतार असे होणे ।
 गुप्त असती याचि गुणे । म्हणती अनंतरूप नारायण ।
 परिपूर्ण सर्वा ठायी ॥४०॥ऐसी श्रीपादवल्लभमूर्ति ।
लौकिकी प्रगटली ख्याति । झाला अवतार पुढती ।
 नृसिंहसरस्वती विख्यात ॥४१॥म्हणोनि सरस्वतीगंगाधरू ।
सांगत कथेचा विस्तारू । ऐकता होय मनोहरू ।
 सकळाभीष्टे साधती ॥४२॥इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे भक्तसंकटहरणं
 नाम दशमऽध्यायः ॥१०॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ।
ओवीसंख्या ॥४२॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु

 



--
Ravindra S. Dhurandhar
Ph No.9324107806
http://gorakhmantras-ravidhurandhar.blogspot.com/

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें