श्रीगणेशाय नमः
जयजयाजी निरंजना ॥ अलक्ष गोचरव्यक्त निर्गुणा ॥
पूर्णब्रह्मा मायाहरणा ॥ चक्रचाळका आदिपुरुषा ॥१॥
हे गुणातीता सर्वत्रभरिता ॥ सगुणरुपा लक्ष्मीकांता ॥
मागिले अध्यायीं रसाळ कथा ॥ मच्छिंद्रोत्सव दाविला ॥२॥
एका सुवर्णविटेसाठीं ॥ कनकगिरी करी गोरक्षजेठी ॥
आतां मम वाग्वटी ॥ भर्तरी आख्यान वदवीं कां ॥३॥
तरी श्रोते ऐका कथन ॥ पूर्वी मित्ररश्मी करितां गमन ॥
वातचक्रीं प्रेरुनि स्यंदन ॥ अस्ताचळा जातसे ॥४॥
तों उर्वशी विमानासनीं ॥ येत होती भूलोकअवनी ॥
तंव ती दारा मुख्यमंडनीं ॥ मदनबाळी देखिली ॥५॥
देखतांचि पंचबाणी ॥ शरीर वेधलें मित्रावरुणी ॥
वेघतांचि इंद्रियस्थानीं ॥ येऊनि रेत झगटलें ॥६॥
झगटतांचि इंद्रिय रेत ॥ स्थान सोडूनि झालें विभक्त ॥
विभक्त होता पतन त्वरित ॥ आकाशाहूनि पैं झालें ॥७॥
परी आकाशाहूनि होतांचि पतन ॥ वातानें तें विभक्तपण ॥
द्विभाग झालें महीकारण ॥ येऊनियां आदळलें ॥८॥
एक भाग लोमश आश्रमा ॥ येऊनि पावला थेट उत्तमा ॥
घटीं पडतांचि तनू उत्तमा ॥ आगस्तीची ओतली ॥९॥
यापरी दुसरा भाग ॥ तो कौलिक ऋषीच्या आश्रमा चांग ॥
येतांचि कैसा झाला वेग ॥ तोचि श्रवण करा आतां ॥१०॥
कौलिक घेऊनि पात्र भर्तरी ॥ मिक्षोद्देश धरुनि अंतरीं ॥
निघता झाला सदनाबाहेरी ॥ वस्तीपर्यटण करावया ॥११॥
परी कौलिक येतांचि बाहेर ॥ भर्तरी ठेवूनि महीवर ॥
बंद करीतसे सदनद्वार ॥ कवीटाळें देऊनियां ॥१२॥
परी भर्तरी ठेविली अंगणांत ॥ तों आकाशांतूनि रेत त्यांत ॥
येऊनियां अकस्मात ॥ भाग एक आदळला ॥१३॥
तों इकडे कौलिक ऋषी ॥ टाळे देऊनि गृहद्वारासी ॥
येऊनि पाहे भर्तरीसी ॥ तों रेत व्यक्त देखिलें ॥१४॥
रेतव्यक्त देखतांचि पात्र ॥ अंतःकरणीं विचारी तो पवित्र ॥
चित्तीं म्हणे वरुणीमित्र ॥ रेत सांडिलें भर्तरीं ॥१५॥
तरी यांत धृमीनारायण ॥ अवतार घेईल कलींत पूर्ण ॥
तीन शत एक सहस्त्र दिन ॥ वर्षे लोटलीं कलीचीं ॥१६॥
इतकीं वर्षे कलीची गेलिया ॥ धृमींनारायण अवतरेल भर्तरीं या ॥
तरी आतां भर्तरी रक्षूनियां ॥ ठेवूं आश्रमीं तैसीच ॥१७॥
मग ती भर्तरी रेतव्यक्ती ॥ रक्षिता झाला आश्रमाप्रती ॥
त्यास दिवस लोटतां बहुतां ॥ पुढें कलि लागला ॥१८॥
मग तो कौलिक ऋषी ॥ गुप्त विचारितां प्रगट देशीं ॥
भर्तरी नेऊनि मंदराचळासी ॥ गृहाद्वारीं ठेविली ॥१९॥
गृहाद्वारीं ठेवूनि पात्र ॥ तो अदृश्य विचरे पवित्र ॥
तों कलि लोटतां वर्षे तीन सहस्त्र ॥ एकशतें तीन वर्षे ॥२०॥
तों द्वारकाधीशअंशें करुन ॥ भर्तरींत संचरला धृमीनारायण ॥
जीवित्व व्यक्त रेताकारण ॥ होतांचि वाढी लागला ॥२१॥
वाढी लागतां दिवसेंदिवस ॥ पुतळा रेखित चालिला विशेष ॥
पूर्ण भरतां नवमास ॥ सिद्ध झाला तो पुतळा ॥२२॥
परी मधुमक्षिकेनें पात्रांत ॥ मधूचें जाळें केले होतें ॥
तयाचे संग्रहें व्यक्त ॥ बाळ वाढी लागला ॥२३॥
वाढी लागतां मधुबाळ ॥ नवमास लोटतां गेला काळ ॥
परी तो देहें होता स्थूळ ॥ भर्तरी पात्र मंगलें ॥२४॥
बहुत दिवसांचे पात्रसाधन ॥ झालें होतें कुइजटपण ॥
त्यांत पर्जन्यकाळीं कड्यावरुन ॥ पर्वत कोसळता लोटले ॥२५॥
कोसळतां परी एक पाषाण ॥ गडबडीत पातला तें स्थान ॥
परी पावतांचि पात्रासी झगडोन ॥ भर्तरी भंग पावली ॥२६॥
भर्तरी भंगतांचि बाळ त्यांत ॥ तेजस्वी मिरवले शकलांत ॥
मक्षिकेचे मोहळ व्यक्त ॥ तेहीं एकांग जाहलें ॥२७॥
मग त्यांत निर्मळपणीं बाळ विरक्त ॥ मिरवों लागलें स्वतेजांत ॥
जैसें अभ्र वेगळें होतां दीप्त ॥ निर्मळपणीं मिरवतसे ॥२८॥
कीं स्थिरावल्या जैसे जीवन ॥ तळा बैसलें गढूळपण ॥
तें बाळ भर्तरी शुक्तिकारत्न ॥ विमुक्त झालें वेष्टणा ॥२९॥
परी कडा कोसळला कडकडीत ॥ शब्द जाहले अति नेट ॥
तेणेंकरुनि मक्षिका अचाट ॥ भय पावोनि पळाल्या ॥३०॥
येरीकडे एकटें बाळ ॥ शब्दरुदनीं करी कोल्हाळ ॥
तेथें चरे कुरंगमेळ ॥ तया ठायीं पातल ॥३१॥
तयांत गरोदर कुरंगिणी ॥ चरत आली तये स्थानीं ॥
तों बाळ रुदन करितां नयनीं ॥ निवांत तृणीं पडलेंसे ॥३२॥
तरी अफाट तृण दिसे महीं ॥ त्यांतही बाळ सबळ प्रवाहीं ॥
चरत येतां हरिणी तया ठायीं ॥ प्रसूत झाली बाळ पैं ॥३३॥
प्रसूत होतां बाळें दोन्ही ॥ झालीं असतां कुरंगिणी ॥
पुनः मागें पाहे परतोनी ॥ तों तीन बाळें देखिलीं ॥३४॥
माझींच बाळे त्रिवर्ग असती ॥ ऐसा भास ओढवला चित्तीं ॥
मग जिव्हा लावूनि तयांप्रती ॥ चाटूनि घेतलें असे ॥३५॥
परी तो खडतरपणी दोन्ही पाडसें तीतें ॥ संध्याअवसरीं झगडलीं स्तनातें ॥
परी हें बाळ नेणे पानातें ॥ स्तन कवळावें कैसे तें ॥३६॥
मग ते कुरंगिणी लोटूनि पाडस ॥ चहूंकडे ठेवूनि चौपदांस ॥
मग वत्सलोनि लावी कांसेस ॥ मुख त्याचें थानासी ॥३७॥
ऐसे लोटतां कांहींएक दिवस ॥ तों तें रागूं लागलें महीस ॥
मग ते मृगी लावूनी थानास ॥ संगोपन करीतसे ॥३८॥
ऐसें करवोनि स्तनपानीं ॥ नित्य पाजी कुरंगिनी ॥
आपुले मुखींची जिव्हा लावूनी ॥ करी क्षाळण शरीरासी ॥३९॥
पाडसें ठेवूनि तया स्थानीं ॥ चरूं जातसे विपिना हरिणी ॥
घडोघडी येतसे परतोनी ॥ जाई पाजूनि बाळातें ॥४०॥
ऐसें करितां संगोपन ॥ वर्षे लोटलीं तयातें दोन ॥
मग हरिणामध्येंचि जाऊन ॥ पत्रें भक्षी वृक्षांची ॥४१॥
परी त्या वनचरांचे मेळीं ॥ विचारितां सावजभाषा सकळी ॥
स्पष्ट होऊनि त्या मंडळीं ॥ त्यांसमान बोलतसे ॥४२॥
हस्तिवर्ग गायी म्हैशी व्याघ्र ॥ जंबुक लांडगे हरिण भयंकर ॥
शार्दूळ रोही गेंडा सांबर ॥ भाषा समजे सकळांची ॥४३॥
सर्प किडे मुंगी पाळी ॥ पक्षी यांची बोली सकळी ॥
तैसेंचि कोकूनि उत्तर पावलीं ॥ देत असे सकळांसी ॥४४॥
ऐसियापरी वनचर - रंगणी ॥ प्रत्यक्ष अवतार विचरे काननीं ॥
जिकडे जिकडे जाय हरिणी ॥ तिकडे तिकडे जातसे ॥४५॥
ऐसें पांच वर्षेपर्यंत ॥ हरिणीमागें तो हिंडत ॥
तों एके दिवशीं चरत ॥ हरिणी आली त्या मार्गे ॥४६॥
काननीं चरतां मार्गे नेटें ॥ तो बाळही आला ते वाटे ॥
तों मार्गी सहस्त्रीपुरुष भाट ॥ मग त्या वाटे तीं येती ॥४७॥
त्या भाटा जयसिंग नाम ॥ कांता रेणुका सुमध्यम ॥
परी उभयतांचा एक नेम ॥ एकचित्तीं वर्तती ॥४८॥
प्रवर्तती परी कैसे अलोटीं ॥ शत्रुमित्र ऐक्यदृष्टीं ॥
कीं धनदघातका मोह पोटीं ॥ समानचि वर्ततसे ॥४९॥
तन्न्यायें पुरुषकांता ॥ प्रपंचराहाटीं वर्तत असतां ॥
तों सहज त्या मार्गे येतां ॥ तया ठायीं पातले ॥५०॥
पातले परी मार्गावरती ॥ बाळ देखिले दिव्यशक्ती ॥
बालार्ककिरणी तेजाकृती ॥ लखलखित देखिलें ॥५१॥
कीं सहजासहज करावया गमन ॥ महीं उतरला रोहिणीरमण ॥
कीं पावकतेजकांती वसन ॥ गुंडाळलें वाटतसे ॥५२॥
ऐशापरी तेजःपुंज ॥ जयसिंग भाट देखतां सहज ॥
मनांत म्हणे अर्कतेज ॥ बाळ असे कोणाचें ॥५३॥
ऐसें स्त्रियेसी म्हणतसे ॥ ऐसिया अरण्यांत असे ॥
बाळ सांडूनि गेली सुरस ॥ मातापिता कैसी तीं ॥५४॥
कीं सहजचाली चालतां ॥ यांत चुकली याची माता ॥
ऐसे अपार संशय घेतां ॥ तयापाशीं पातले ॥५५॥
पातले परी बाळ पाहोन ॥ भयें व्याप्त झालें मन ॥
मग मृग बोलिले आरंबळोन ॥ पळूं लागले मार्गातें ॥५६॥
तें पाहूनि जयसिंग भाटें ॥ धांवोनि धरिली बाळकाची पाठ ॥
पाठीं लागूनि धरुनि मनगट ॥ उभा केला बाळ तो ॥५७॥
उभा करुनि त्यातें बोलत ॥ म्हणे बाळा सांडीं भयातें ॥
तूतें भेटवीन तव मातेतें ॥ माता कोण ती सांग ॥५८॥
परी तैं कुरंगभाषेकरुन ॥ आरंबळतसे छंदेंकरुन ॥
नेत्रा लोटलें अपार जीवन ॥ हांक मारी हरिणीतें ॥५९॥
परी ते हरिणी बाळ पाहून ॥ कासावीस झाले परम प्राण ॥
परी मनुष्यभयेंकरुन ॥ निकट येऊं शकेना ॥६०॥
हरिणी आपुले ठायींच्या ठायीं ॥ परम आरंबळें महीते देहीं ॥
येरीकडे मार्गप्रवाहीं ॥ भाट बोले बाळातें ॥६१॥
म्हणे वत्सा व्यर्थ कां रडसी ॥ कोण मातापिता आहे तुजसी ॥
सोडूनि गेलीं अरण्यासी ॥ तरी भेटवूं तुज आतां ॥६२॥
परी कुरंगभाषेकरुन ॥ ब्यां ब्यां करुनि करी रुदन ॥
मग भाट म्हणे हें वाचाहीन ॥ मुखस्तंभ वाटतसे ॥६३॥
मग हस्तखुणेनें पुसे त्यांतें ॥ परी खूणही तें नेणे परतें ॥
मग जयसिंग म्हणे आपुले मनातें ॥ परम अज्ञानी बाळक हें ॥६४॥
तरी आतां असो कैसें ॥ यातें आपुल्या न्यावें वस्तीस ॥
याची जननी भेटल्यास ॥ हस्तगत यातें करुं ॥६५॥
ऐसा विचार करुनि मनासीं ॥ उचलूनि घेतला स्कस्कंधासीं ॥
परी तें आरंबळोनि हरिणीसी ॥ पाचारीत अट्टहास्यें ॥६६॥
परी ती कुरंगभाषा कांहीं ॥ जयसिंगातें माहीत नाहीं ॥
तैसें वाहूनि मार्गप्रवाहीं ॥ घेऊनि जात बाळका ॥६७॥
परी त्या बाळकासी घेऊनि जातां ॥ अति आरंबळे हरिणी चित्ता ॥
सव्यअपसव्य वेढा भंवता ॥ घेऊन हंबरडा मारीतसे ॥६८॥
बाळावरी ठेवूनी दृष्टी ॥ धांव घेतसे पाठोपाठीं ॥
ठायीं ठायीं महीतटीं ॥ उभी राहूनि आरंबळे ॥६९॥
ऐसी हरिणी आरंबळत ॥ दुरोनि त्यासी मार्ग गमत ॥
परी तो जयसिंग पाहूनि मनांत ॥ विचार करी आपुल्या ॥७०॥
म्हणे ही हरिणी कवणे अर्थी ॥ हिंडत आहे काननाप्रती ॥
पाडस चुकार झालें निगुतीं ॥ म्हणोनि हिंडे विपिनी ही ॥७१॥
ऐसियेपरी चित्तीं भास ॥ भासूनि गमन करीतसे मार्गास ॥
गमन करितां स्वगृहास ॥ वस्तीत जाऊनि पोहोंचला ॥७२॥
मग ती वस्ती पाहोनि हरिणी ॥ विपिना गेली निराशपणीं ॥
परी ठायीं ठायीं उभी राहूनि ॥ हंबरडा मारी आक्रोशें ॥७३॥
येरीकडे जयसिंग भाट ॥ येतां ग्रामा झाला प्रविष्ट ॥
बाळ ओपूनि कांते सुभट ॥ वस्ती फिरुं पातला ॥७४॥
सकळ वस्तीची फेरी फिरुन ॥ पुन्हां शिबिरा येत परतोन ॥
ऐसे करितां मास तीन ॥ लोटूनि गेले वस्तीसी ॥७५॥
परी तें बाळ आरंबळतां ॥ भयानें राहिली सकळ व्यथा ॥
मग थोडी थोडी संवय लागतां ॥ हरिणीस विसर पडला ॥७६॥
तेचि नीतीं बाळ विसर ॥ शनैक पडला कुरंगापर ॥
मग भोजनपानादिक सारासार ॥ कळों सविस्तर लागलें ॥७७॥
बोली चाली शनैःशनैक ॥ प्रविष्ट जाहलें तें बाळक ॥
मग हांका मारी जननी जनक ॥ भक्षावया मागतसे ॥७८॥
असो ऐसियापरी अलोट ॥ ग्रामोग्रामीं हिंडे भाट ॥
हिंडतां हिंडतां भागीरथी तट ॥ काशीक्षेंत्रीं पातला ॥७९॥
पातला परी विश्वेश्वरीं ॥ दर्शना जात देवालयांतरीं ॥
स्नान करुनि भागीरथीतरीं ॥ बाळ घेऊनि गेला असे ॥८०॥
विश्वेश्वराचें दर्शन करीत ॥ तों लिंगातूनि बोलिला उमाकांत ॥
यावें भर्तरीअवतारांत ॥ दृश्य झालां तुम्हीं कीं ॥८१॥
ऐसे ऐकूनि नमस्कारितां ॥ शब्दोदयीं झाला बोलता ॥
त्याचे ते शब्द सहजता ॥ जयसिंगें ऐकिले ॥८२॥
मग तो मनांत करी विचार ॥ बाळ हें करितां नमस्कार ॥
शिवलिंग बोले अति मधुर ॥ भर्तरी ऐसें म्हणोनि ॥८३॥
तरी हा आहे कोन अवतारदक्ष ॥ स्वर्गवासी आहे प्रत्यक्ष ॥
परी प्रारब्धयोगें आम्हां सुलक्ष ॥ प्राप्त झाला वाटतसे ॥८४॥
जैसा दारिद्रिया मांदुसघट ॥ सहज चालतां आदळे वाट ॥
तेवीं आम्हां बाळ चोखट ॥ प्राप्त झालें दैवयोगें ॥८५॥
कीं चिंतातुरासी चिंतामणी ॥ अवचट लाधला मार्गेकरुनी ॥
तेवीं मातें अवतारतरणी ॥ प्राप्त झाला दैवानें ॥८६॥
कीं दुष्ट काळाची थोर रहाटी ॥ प्राण अन्नाविण होतां कष्टी ॥
तैं सुरभि येऊनि कृपाहोटीं ॥ थान आपुलें ओपीतसे ॥८७॥
तन्न्याय मातें झालें ॥ निर्देवा दैवें बाळ लाधलें ॥
लाधलें परी पुण्य पावलें ॥ अवतारी दिसतो हा ॥८८॥
हें पुण्य तरी वर्णू केवढे ॥ जयासाठीं हा स्थूळवट दगड ॥
हर्षे पावूनि संस्कारपाड ॥ यावें भर्तरी म्हणतसे ॥८९॥
तरी आतां भर्तरी नाम ॥ थोर पाचारुं वाचेकारण ॥
ऐसीं चित्तीं कल्पना योजून ॥ पुन्हां शिबिरा पातले ॥९०॥
पातले परी कांतेलागून ॥ सर्व निवेदिलें वर्तमान ॥
म्हणे हा पुत्र तुजकारण ॥ अवतारदक्ष सांपडला ॥९१॥
तरी हा अवतारदक्ष कैसा ॥ म्हणशील तरी वो वाग्रसा ॥
तरी शिव प्रत्यक्ष बोलिला ऐसा ॥ यावें भर्तरी म्हणोनी ॥९२॥
अगे हा बाळ करितां नमन ॥ ध्वनि हे निघाली लिंगांतून ॥
ती म्यां ऐकिली आपुल्या कानें ॥ म्हणोनि म्हणतों अवतार हा ॥९३॥
तरी आतां येथूनि याते ॥ भर्तरी ऐसें नाम निश्वित ॥
पाचारुनि अंतर्भूत ॥ पालन करीं बाळाचें ॥९४॥
ऐसें सांगूनि तो युवती ॥ टाकूनि गेला फेरीप्रती ॥
परी श्रोते चित्तीं कल्पना घेती ॥ शिव कां बोलिला भर्तरी ॥९५॥
यावें भर्तरी ऐसें वचन ॥ किमर्थ बदला उमारमण ॥
तरी तो भर्तरीत पावला जन्म ॥ म्हणोनि शिव बोलिला असे ॥९६॥
भर्तरी अवतार सघन ॥ यावें भर्तरी ऐसें म्हणोन ॥
तरी आतां ऐसें ऐका वचन ॥ कथा पुढें परिसावी ॥९७॥
ऐसें जयसिंग रेणुकेसी ॥ सांगूनि वर्तमान तियेसी ॥
भर्तरी नाम आनंदेसीं ॥ पाचारीत उभयतां ॥९८॥
त्या उभयतांचें जठरांतरीं ॥ संतति नसे संसारविहारीं ॥
म्हणोनि स्नेहाची भोहित लहरी ॥ बोलली असे तयातें ॥९९॥
रेणुका नित्य बैसवोनि अंकीं ॥ चुंबन घेतले लालनअंकीं ॥
नाना पदार्थ मागितले कीं ॥ आणूनि देती उमयतां ॥१००॥
आसन वसन भोजन पान ॥ देती करिती बहु लालन ॥
बाळ खेळतांना पाहून ॥ हर्षयुक्त होती ते ॥१॥
बाळ भर्तरी पंचवर्षी ॥ बोबडे बोले नाचे महीसी ॥
नाच नाचोनि धांवोनि कंठासी ॥ मिठी घाली मातेच्या ॥२॥
मिठी घालितां रेणुका सती ॥ उचलूनि घेत अंगावरती ॥
चुंबन घेतां उभय तीं ॥ हास्यवदन करिताती ॥३॥
हांसूनि एकमेकां म्हणती ॥ ईश्वर पावला आपणांप्रती ॥
उदरीं नसतां स्वसंतती ॥ ईश्वरें दिधली कृपेनें ॥४॥
दिधली परी आक्षेप चित्तासी ॥ घेऊनि म्हणती या बाळासी ॥
मातापिता चुकल्यासी ॥ शोधित असतील महीतें ॥५॥
परी ते शोधितां कोठें ॥ अवचित जरी पडली गांठ ॥
मग ते आपणां पासूनि नेटें ॥ घेऊनि जातील बाळातें ॥६॥
ऐसी चिंता उभय तीं ॥ नित्य त्निय हदयीं वाहती ॥
अहा हें बाळ अलोलिक स्थिती ॥ स्वरुपा मिती नसे याच्या ॥७॥
ऐसें बाळ हें परम सगुण ॥ हें तों नेतील आम्हांपासून ॥
ऐसें चिंतिती परी मन ॥ घोंटाळत उभयतांचे ॥८॥
मग ते उभयतां विचार करिती ॥ कीं यास सोडूनि क्षेंप्रत्राती ॥
मही हिंडतां कोणे क्षिती ॥ गांठी पडेल तयांची ॥९॥
मग त्या क्षेत्रीं स्थळ पाहून ॥ राहते झाले भिक्षुकपणें ॥
भिक्षा मागूनि क्षेत्राकारण ॥ निर्वांहातें चालविती ॥११०॥
यापरी तें भर्तरी बाळ ॥ मेळ मुलांचे स्थावरमंडळ ॥
तयांमाजीं खेळे खेळ ॥ राजचिन्हें सर्वस्वीं ॥११॥
आपण सर्वांचा होऊनि राव ॥ मुलांचींच मुलें सर्व ॥
काठीचे करुनि अश्व ॥ शाळा लाविल्या तयानें ॥१२॥
मंत्री परिचारक पायदळ जन ॥ स्वार झुंझार कारकून ॥
नाना वेष मुलांस दाखवून ॥ राजचिन्हें करीतसे ॥१३॥
तरी खेळ नव्हे भविष्य होणार ॥ होय भाग्याचा संस्कार ॥
जैसें ज्याचें भाग्य पर ॥ चिन्हें उदय पावलीं ॥१४॥
तरी असो राजचिन्हीं ॥ खेळ खेळतां बाळपणी ॥
तों एके दिवशीं आरोहणोनी ॥ काष्ठशालिके पळताती ॥१५॥
पळती ते वाताकृती ॥ मुखें हो हो करुनि म्हणती ॥
हो हो म्हणूनि थापटिती ॥ काष्ठशालिके अश्वातें ॥१६॥
ऐसें खेळतां सोडूनि क्षेत्र ॥ धांवती भरले काननीं सर्वत्र ॥
एकांत विपिनी खेळ खेळत ॥ सान्निध कोणी नसेचि ॥१७॥
परी ते काननचव्हाट्यांत ॥ भर्तरी धांवतां शालिका अश्वातें ॥
तों पायासी ठेंच लागूनि महीतें ॥ उलथोनियां पडियेला ॥१८॥
पडिला महीं कासावीस ॥ होऊनि सांडिलें शुद्धबुद्धीस ॥
नेत्रें विकासूनि महीतें ॥ दाविता झाला तत्क्षणीं ॥१९॥
ते श्वेतवर्ण पाहूनि नयन ॥ अर्भकें पळालीं भयेकरुन ॥
म्हणती भर्तरी पावला मरण ॥ भूत होईल आता हा ॥१२०॥
मग हा आपुल्या लागोनि पाठीं ॥ भक्षील सकळ मग शेवटीं ॥
ऐसें भय मानूनि पोटीं ॥ पळूनि गेलीं अर्भकें ॥२१॥
जाऊनि भागीरथीघांटावर ॥ करीत बैसलीं आहेत विचार ॥
म्हणती भर्तरिया भूत थोर ॥ होऊनि हिंडे ग्रामांत ॥२२॥
मग गडे हो आपण गल्लींसी ॥ कैसें खेळावें भक्षील आपणांसी ॥
तरी आतां आपुले ग्रामासी ॥ खेळ खेळूं सदनांत ॥२३॥
यापरी दुसरा अर्भक बोलत ॥ कीं बरवें सांडिलें काननातें ॥
मनुष्य कोणी नव्हतें तेथें ॥ भक्षिलें असतें आपणांसी ॥२४॥
ऐसें अर्भक घांटावर ॥ करीत बैसले आहेत विचार ॥
तों येरीकडे मूर्च्छा अपार ॥ भर्तरांतें वेधली ॥२५॥
महीं पडलासे उलथोन ॥ शरीर सुकलें तेणेंकरुन ॥
ठायीं ठायीं भेदले पाषाण ॥ रुधिर तेणें वाहातसे ॥२६॥
ऐसे होतां अवस्थेसी ॥ मैत्रावरुणें पाहिलें त्यासी ॥
मग पुत्रमोह हदयासी ॥ परम कळबळा दाटला ॥२७॥
मग महीस मित्रावरुणी ॥ येता झाला स्नेहेंकरुनी ॥
अति लगबगें बाळ उचलोनी ॥ हदयालागीं कवळिलें ॥२८॥
त्वरें आणूनि भागीरथीजीवन ॥ तयासी करविलें तोयपान ॥
हदयालागीं आलिंगून ॥ सावध केलें बाळासी ॥२९॥
आणि पाहूनि स्वयें कृपादृष्टीं ॥ मग दुःखलेशाची झाली फिटी ॥
पाषाणघांव घसवटीं ॥ अदृश्यपणें मिरविले ॥१३०॥
मग तो बाळ सावधपणीं ॥ अंकीं घेऊनि मिरवोनी ॥
परम स्नेहें मुखावरोनी ॥ वरदहस्तें कुरवाळी ॥३१॥
यापरी विप्राचा वेष धरोनि ॥ तेथोनि चालिला मित्रावरुणी ॥
भर्तरीचा धरोनि पाणी ॥ सदनालागीं आणीतसे ॥३२॥
तों मार्गी येतां घाबरे ॥ पाहते झाले सर्व किशोर ॥
पाहतांचि म्हणती भर्तरी थोर ॥ भूत होऊन आला रे ॥३३॥
ऐसें म्हणूनि आरडोनी ॥ पळताती अति भयेंकरुनी ॥
आपुलाले सदना जाऊनी ॥ भयें दडती संधींत ॥३४॥
येरीकडे मित्रावरुणी ॥ सदनीं आला त्यासी घेऊनी ॥
माता रेणुकेसी पाचारोनी ॥ म्हणे सांभाळी बाळातें ॥३५॥
मग ते चरणीं ठेवूनि माथा ॥ म्हणे महाराजा हे ताता ॥
आपण कोण्या ग्रामी असतां ॥ परम स्नेहाळू आहां कीं ॥३६॥
ते रेणुका प्रेमळ सती ॥ पाहतां विप्र दिव्य मूर्ती ॥
वस्त्रासन टाकूनि निगुती ॥ बैसविलें त्यावरी ॥३७॥
मग म्हणे बाळका करीं कवळून ॥ आणिलें तुम्हीं मोहेंकरुन ॥
तरी सकळ संशय सोडून ॥ नामाभिधान मज सांगा ॥३८॥
येरी म्हणे वो सती ऐक ॥ या बाळाचा मी असें जनक ॥
म्हणोनि स्नेहाचें दोंदिक ॥ तरी तुजपाशीं मी आलों ॥३९॥
तरी बाळ तुजकारणें ॥ कायावाचा केलें अर्पण ॥
परी तूंही आतां संशय टाकून ॥ संगोपन करीं याचें ॥१४०॥
तें ऐकून बोलें ऐसें ॥ तुम्ही बाळकाचे जनक कैसे ॥
येरी म्हणे वो अनायासें ॥ कथा ऐक बाळाची ॥४१॥
अगे मी विप्रवेषें तूतें ॥ दिसत आहें परी मी दैवत ॥
मित्रावरुणी नाम मातें ॥ महीलागीं वदतात ॥४२॥
मग मूळापासूनि तीतें कथन ॥ भर्तरीपात्रव्यक्त जनन ॥
हरिणीस्तनीचें संगोपन ॥ सकळ निर्णय बदलासे ॥४३॥
तरी या बाळाचें संभवन ॥ अपूर्व आहे महीकारण ॥
परी असो पूर्ण दैवानें ॥ लाभ झाला तुज याचा ॥४४॥
झाला परी आर्तभूत ॥ जगीं म्हणावीं कां आपुला सुत ॥
काया वाचा बुद्धि सुत ॥ रक्षण करीं उचित हें ॥४५॥
ऐसें सांगूनि मित्रावरुणी ॥ जाता झाला आपुले स्थानीं ॥
येरीकडे नितंबिनी ॥ परम चित्तीं तोषली ॥४६॥
मग भ्रतारासी सांगूनि वर्तमान ॥ तोही हर्षे ऐकून ॥
मग जननीजनकांचें भय पूर्ण ॥ बाळप्रकरणीं फिटलें कीं ॥४७॥
जैसे वस्त्र स्पर्शिल्या साबणीं ॥ सकळ मळाची होय हानी ॥
ठेवी मित्रावरुण वाचेकरुनी ॥ सकळ संशय फिटलासे ॥४८॥
किंवा गढूळ झालें असतां उदक ॥ स्थिरावल्या दावी पवित्र मुख ॥
तेवीं त्याचा समूळ धाक ॥ फिटूनि गेला तत्काळ ॥४९॥
की दारा सगुणपर ॥ गृहीं असतां गरोदर ॥
परी प्रसूतीचे भय थोर ॥ प्रसूत झालिया फिटतसे ॥१५०॥
कीं अनभ्यस्त कांसे लागतां ॥ परम भय मानी पार होतां ॥
परी पार झालिया सकळ चिंता ॥ फिटोनि जाय सरितेची ॥५१॥
कीं अचाट काननीं तस्करभयातें ॥ मार्ग मिळाला भयव्यक्त ॥
परी वस्ती पावल्या स्वस्थचित्त ॥ भयापासूनि होतसे ॥५२॥
तन्नायें मित्रावरुणी ॥ वार्ता ऐकतां उभय कर्णी ॥
भयमुक्त होती आनंदोनी ॥ हेलावे चित्त पूर्णत्वें ॥५३॥
जैसें दुःख जाऊनि होतां सुख ॥ पोसे शरीर दोंदिक ॥
तेवीं त्यांचे चित्तीं बलाइक ॥ आनंदाचा उदेला ॥५४॥
मग ते अतिप्रेमेंकरुन ॥ आशापाशाचें गुंतले बंधन ॥
मग परम स्नेहाचा खुंट उभवोन ॥ गरके घालिति त्यासवे ॥५५॥
ऐसियापरी दिवसेंदिवस ॥ परम उदेले लालनपालनास ॥
तंव काशीक्षेत्रीं पुण्यवस्तीस ॥ पंच वरुषें लोटलीं ॥५६॥
तों षडदशवर्षी भर्तरीनाथ ॥ पूर्ण झाला वयें व्यक्त ॥
जयसिंग आणि रेणुकेप्रत ॥ लग्नविचार सूचला ॥५७॥
मग उभयतां बसूनि एकांतीं ॥ म्हणती चला जाऊं स्वदेशाप्रती ॥
लक्षूनि संबंधा जाती ॥ लग्न करुं बाळाचें ॥५८॥
ऐसा विचार उभयतां करोनि ॥ सोडितें झाले क्षेत्रालागोनी ॥
माळवादेशीं त्यांचा ग्राम उद्देशोनी ॥ मार्ग धरितां तयाचा ॥५९॥
मार्गी चालतां ग्रामोग्रामीं ॥ भिक्षा करिती भिक्षुकधर्मी ॥
मार्गी चालता भविष्य वर्मी ॥ विकट झगटलें येऊनि ॥१६०॥
मार्गी चालतां काननांत ॥ तस्कर येऊनि अकस्मात ॥
जयसिंग शस्त्रघातें ॥ मुक्त केला प्राणातें ॥६१॥
जवळी होतें वित्त कांही ॥ तें हिरोनि नेलें तस्करीं उपायीं ॥
जयसिंगाचें प्रेत महीं ॥ निचेष्टित पडियेलें ॥६२॥
मग तें पाहूनि रेणुका सती ॥ प्रेत कवळूनि देहानिगुती ॥
परम शोकें देहाप्रती ॥ सांडिती झाली तेधवां ॥६३॥
मग तीं उभयतां स्त्रीपुरुष ॥ भर्तरीनें काष्ठें मेळवूनि विशेष ॥
अग्नि लावूनि उभयतांस ॥ शोकडोहीं बुडाला ॥६४॥
उभयतांचें करितां दहन ॥ परी शोकविशोकें पोळे प्राण ॥
म्हणे अहा तात मातेनें ॥ कैसें सोडिलें काननीं या ॥६५॥
अहा तुम्ही जननी जनक ॥ पाहते झालां परत्रलोक ॥
यापरी महीतें मायिक ॥ कोणी नसे मजलागीं ॥६६॥
अहा जननी रेणुकानाम्नी ॥ कैसी गेली मज सोडोनी ॥
आतां आई आई म्हणोनि वाणी ॥ बोलावूं मी कोणातें ॥६७॥
अहा जननी तूं परम मायिक ॥ जाणत होतीस तृषाभूक ॥
आतां निकटपणी लोक ॥ परम कैसे पाहतील ॥६८॥
अहा जननी रात्रींतून ॥ तीन वेळां उठोन ॥
करवीत होतीस तोयपान ॥ तरी मन निष्ठुर कां केलें ॥६९॥
अहा हदयीं धरुनि करिसी चुंबन ॥ वाचे म्हणसी बाळ हें तान्हें ॥
ऐसें म्हणोनि उदकपान ॥ करवीत अससी नित्यशा ॥१७०॥
ऐसी माय तूं सघन ॥ असोनि केलें निष्ठुरपण ॥
मज ऐशा वनीं सोडून ॥ गेलीस कैसी जननीये ॥७१॥
अहा ताता जयसिंगनामी ॥ कैसा गेलासी मज टाकुना ॥
आता पृथ्वीवर दैन्यवाणी ॥ कोठे राहूं निराश्वित ॥७२॥
अहा ताता बाहेर जातां ॥ खाऊ मजला आणीत होतां ॥
तो मुगुटी खोवूनि सदनीं येतां ॥ पाचारुनि मज देशीं ॥७३॥
ऐसा मोह असतां पोटीं ॥ सांडूनि गेलास विपिनीं देठीं ॥
ऐसें म्हणूनि करसंपुटीं ॥ वक्षःस्थळ पिटीतसे ॥७४॥
ऐसें रुदन करीत करीत ॥ पेटवूनि झाला शांताचित्त ॥
परी तो तेथूनि न उठे त्वरित ॥ प्राण सोडूं पाहातसे ॥७५॥
तों मार्गेकरुन व्यवसाइक ॥ त्या वंजारें वृषभकटक ॥
त्यांनीं पाहूनि त्याचा शोक ॥ परम चित्तीं कळबळले ॥७६॥
मग तयापाशीं येऊन ॥ पुसोनि घेतले वर्तमान ॥
वर्तमान कळल्या बोलती वचन ॥ बोधनीती तयातें ॥७७॥
म्हणती अगा भटसुता ॥ शोक कारसी अति वृथा ॥
होणार झालें विषममाथा ॥ विधिअक्षरें नेमीत ॥७८॥
जरी तू आतां करिसी शोक ॥ तरी काय मिळतील जननी जनक ॥
ईश्वरकरणी प्रारब्ध फुटकें ॥ आपुलेंचि म्हणावे ॥७९॥
तरी आतां धैर्य करुन ॥ हित पहावें आपुलें आपण ॥
संसार करुनि आपुले मतीने ॥ तिन्ही लोकीं मिरवावें ॥१८०॥
ऐसें म्हणूनि बोध अपार ॥ उठविला त्याचा धरुनि कर ॥
मग संगें घेऊनि मुक्कामावर ॥ आणिलासे भर्तरी ॥८१॥
मुक्कामीं राहूनि सकळ जन ॥ रात्रीं देऊनि अन्नपान ॥
दुसरें दिवशीं सवें घेऊन ॥ पुन्हां जात व्यवसई ॥८२॥
ऐसेपरी सात पांच दिन ॥ शोक करितां गेले लोटून ॥
मग दिवसेंदिवस होऊनि विस्मरण ॥ सहजस्थिती वर्ततसे ॥८३॥
मग त्या व्यवसायिकां सहज ॥ करुं लागला तयांचें काज ॥
काज होता तेजःपुंज ॥ सकळ चाहती आदरानें ॥८४॥
मग आसन वसन भूषणासहित ॥ व्यवसाइक सकळ संपादित ॥
ऐसेपरी कांहीं दिवस त्या स्थितींत ॥ लोटून गेले तयाचे ॥८५॥
यापरी व्यवसाइक ॥ धान्य भरुनि अति अमूप ॥
उज्जनि शहर अवंतिक ॥ मार्ग धरिला तयाचा ॥८६॥
मार्ग सरतां वृक्षमकटका ॥ येऊनि पोहोंचला अवंतिका ॥
तेथें कथेचा रस निका ॥ होईल तो स्वीकारा पुढें ॥८७॥
म्हणाल पुढिलें अध्यायीं रस ॥ उगाचि मानाल स्वचित्तास ॥
ऐसें तरी न म्हणावें पीयूष ॥ चवी घेतां कळों येईल ॥८८॥
तरी ती कथा सुधारस थोर ॥ वाढी श्रोत्या धुंडीकुमर ॥
मालू ऐसा नामोच्चार ॥ नरहरिकृपें मिरवतसे ॥८९॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥
सदा परिसोत भाविक चतुर ॥ चतुर्विशति अध्याय गोड हा ॥१९०॥
श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥
॥ नवनाथभक्तिसार चतुर्विशतितमोध्याय समाप्त ॥
गोरख बोली सुनहु रे अवधू, पंचों पसर निवारी ,अपनी आत्मा एपी विचारो, सोवो पाँव पसरी,“ऐसा जप जपो मन ली | सोऽहं सोऽहं अजपा गई ,असं द्रिधा करी धरो ध्यान | अहिनिसी सुमिरौ ब्रह्म गियान ,नासा आगरा निज ज्यों बाई | इडा पिंगला मध्य समाई ||,छः साईं सहंस इकिसु जप | अनहद उपजी अपि एपी ||,बैंक नाली में उगे सुर | रोम-रोम धुनी बजाई तुर ||,उल्टी कमल सहस्रदल बस | भ्रमर गुफा में ज्योति प्रकाश || गगन मंडल में औंधा कुवां, जहाँ अमृत का वसा |,सगुरा होई सो भर-भर पिया, निगुरा जे प्यासा । ।,
गुरुवार, 19 फ़रवरी 2009
श्री नवनाथ भक्तिसार अध्याय २३
श्रीगणेशाय नमः
जयजयाजी कमळानना ॥ दुष्टदानवअसुरमर्दना ॥
भक्तकामचकोरचंद्रानन ॥ यादवेंद्रा आदिपुरुषा ॥१॥
हे पयोब्धिवासा यदुकुळटिळका ॥ पुढें बोलवीं कथानका ॥
जेणें श्रोतियां चित्तदोंदिका ॥ आनंदाब्धि उचंबळे ॥२॥
मागिले अध्यायीं सौराष्ट्रग्रामीं ॥ गोरक्षानें मीननाथा मारुनी ॥
पुन्हां उठविलें परीक्षा देऊनी ॥ श्रीगुरुच्या भावने ॥३॥
मच्छिंद्रें धरुनि अज्ञानपण ॥ मीननाथासवे केलें रुदन ॥
परी गोरक्षाचें जाणीवपण ॥ परीक्षेंतें आणिलें ॥४॥
असो यापरी तेथूनि निघून ॥ मार्गी करीत चालिले गमन ॥
तों तैलंगदेशीं गोदासंगमन ॥ समुद्रतीरा पातले ॥५॥
गोदांसंगमीं करुनि स्नान ॥ आत्मलिंग शिवातें भावें पूजून ॥
तेथूनि गोदेचे तट धरुन ॥ पांश्वमदिशे गमताती ॥६॥
तों बारा लिंगांतील लिंग समर्थ ॥ आंवढ्या आणि परळी वैजनाथ ॥
तैं करुनियां सव्य गोदातीर्थ ॥ घेऊनियां चालिले ते ॥७॥
मार्गी चालितां गोदा सव्य ॥ तो वाल्मीकस्थान विपिनमय ॥
गर्भगिरि पर्वतप्राय ॥ येऊनियां तेथें पोचले ॥८॥
तें रान कर्कश अचाट ॥ गगनचुंबित तरु अफाट ॥
तयांमाजी तृण अफाट ॥ न मिळे वाट चालावया ॥९॥
व्याघ्र जंबूक शार्दूळ हरी ॥ वराह रीस काननातरीं ॥
हिंडती ते उन्मत्तापरी ॥ उग्र वेष दावूनियां ॥१०॥
जाळिया वेली कर्दळी सघन ॥ कीं जेथें रश्मींचें न पवे दर्शन ॥
कीं अर्कोदया लपे गगन ॥ ऐसा भास वाटतसे ॥११॥
बोरी बाभळ पळस शमी ॥ रातांजन कंदर्क्प अनेकनामी ॥
खैर हिंवर कंटकधामी ॥ काननांत तरु मिरवती ॥१२॥
एक तुराट्ट अर्की फुल्लाट ॥ वरकड तीक्ष्ण कंटकनट ॥
तेवीं कनकखंडजाळी अचाट ॥ पर्णकुटिका जैसा कीं ॥१३॥
तयांमाजी तृण उचित ॥ स्थावर तरु जाहले व्यक्त ॥
तेणें धरादेवींचें सहसा नितांत ॥ झाकिन्नले शरीर ॥१४॥
महा तें कानन सुरस ॥ वसन नेसविलें भूदेवीस ॥
हरितवर्णी कुसुमपदरास ॥ बुटलिंगी मिरवली ॥१५॥
म्हणाल कासया नेसली वसन ॥ तो परपुरुष दिनकर गगनीं ॥
म्हणूनि कुळवंत दारा लज्जेनें ॥ स्वशरेंरा लपवी ती ॥१६॥
म्हणूनि मित्रकांता जागा ॥ सांडूनि बैसल्या अंबुजभागा ॥
धरादेवीच्या लज्जित मार्गी ॥ लक्षूनियां रक्षिंले ॥१७॥
ऐसियापरी कानन अचाट ॥ दर्शन नोहे महीपाठ ॥
तेथें पाहूनि मच्छिंद्र सुभट ॥ मनामाजी दचकला ॥१८॥
दचकला परी कवण अर्थ ॥ कनकंवाटे जे होती भस्मझोळींत ॥
तस्कर कोणी हरतील तीतें ॥ म्हणूनि चित्तीं विस्मित ॥१९॥
तैसा नव्हे आणिक अर्थ ॥ गोरक्षाचा लोभी स्वार्थ ॥
पहावया परीक्षेंत ॥ मच्छिंद्रनाथ उदेला ॥२०॥
आपण घेऊनि अज्ञान ॥ पाहे गोरक्षाचें लक्षण ॥
नातरी प्रतापवान ॥ तस्करभय त्या नाहीं ॥२१॥
कीं ये तमाचा प्रतापजेठीं ॥ अर्का संचरे भय पोटीं ॥
कीं उदधीचीं बळी चंचुपुटीं ॥ लागतां कोप काय थरथराटे ॥२२॥
कीं मशकाचे उड्डाणें ॥ मंदराचळ व्यापेल कीं भयानें ॥
कीं सर्पकृत किंवा वृश्चिकदंशानें ॥ खगेंद्रा काय भय त्याचे ॥२३॥
तन्न्यायें मच्छिंद्रनाथ ॥ पाळूं न शके तस्कर तयातें ॥
परी श्रीगोरक्षाचें चित्त ॥ परीक्षेसी उदेलें ॥२४॥
कल्पूनि चित्तीं ऐसियापरी ॥ मग गोरक्षातें जती वागुत्तरीं ॥
बोलतां झाला काननांतरी ॥ पाचारुनि निकटत्वें ॥२५॥
म्हणे वत्सा ऐक बा कैसें ॥ उद्भट दिसे विपिन कर्कश ॥
तरी कांहीं भय अरण्यास ॥ नांदतें कीं तस्करीं ॥२६॥
परम पूर्ण व्यक्त तरुदाटी ॥ जेथें अर्क न पडे दृष्टीं ॥
ऐसिये काननीं कर्कश पोटीं ॥ मज भय आज संचरलें ॥२७॥
तरी बाळा प्रज्ञावंता ॥ आहे कीं नाही भय सांग आतां ॥
तस्करभयाची समूळ वार्ता ॥ काननांत न येवो या ॥२८॥
ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥ गोरक्ष विचार करी मनांत ॥
म्हने तस्करभय गुरुतें ॥ काय म्हणूनि उदेलें ॥२९॥
तया शब्दोदयाचा अर्थ ॥ श्रीगुरुजवळ असेल वित्त ॥
म्हणूनि हा शब्द उदयवंत ॥ झाला असेल निश्चयें ॥३०॥
तरी तो म्हणे ताता कैसे समजावें ॥ फुलावरुनि रुखा द्यावीं नांवें ॥
ऐसें शब्दावरुनि मान समजावें ॥ ओळखावें सुज्ञांनीं ॥३१॥
तस्मात् गुरुपाशीं वित्त ॥ आहे काय ऐसें विचारीत ॥
तरी या शब्दाची असे भ्रांत ॥ निरसूनि दुर करावी ॥३२॥
ऐसें योजूनि गोरक्षनाथ ॥ मौन धरोनि मार्गी चालत ॥
परी काननीं अधिकोत्तरांत ॥ भयानक दिसे पदोपदीं ॥३३॥
जंव जंव कानन भयानक दिसे ॥ तंव तंव गोरक्षा मच्छिंद्र पुसे ॥
म्हणे बा अरण्य बहु कर्कश ॥ पदोपदीं दिसतसे ॥३४॥
तरी तस्करभय येथें ॥ आहे कीं नाहीं सांग मातें ॥
परी गोरक्ष उत्तरातें ॥ काहींच तयातें न देई ॥३५॥
जैसा विश्वामित्र समर्थ ॥ मखरक्षणा त्या श्रीरामार्थ ॥
स्तवितां तेणें दशरथातें ॥ परी उत्तर न देई कांहींच ॥३६॥
त्याचि न्यायें गोरक्ष मौन धरोनि ॥ गमतसेच सुपंथ अवनीं ॥
तों पुढें चालतां देखिलें पाणी ॥ संचळपणी स्थिरारावलें ॥३७॥
उदक पाहतां संचळवंत ॥ गोरक्षा वदे मच्छिंद्रनाथ ॥
म्हणे बा गोरक्षा संचरत येथें ॥ उदक आहे नेटकें ॥३८॥
तरी माझी झोळी कक्षेंत घालून ॥ पुढें कांहींसे करीं गमन ॥
तों मीही येतो लगबगेंकरुन ॥ दिशा फिरुन पाडसा ॥३९॥
ऐसें म्हणतां मच्छिंद्रनाथ ॥ अवश्य गोरक्ष म्हणे त्यास ॥
मग स्कंधीं वाहूनि मीननाथास ॥ कक्षीं झोळी घातली ॥४०॥
परी घालितां कक्षे झोळी ॥ वजनवस्त लागें हस्तकमळी ॥
मग मनांत म्हणे प्रतापबळी ॥ भय यांतचि नांदतसे ॥४१॥
ऐसें म्हणोनि स्वचित्तांत ॥ स्कंधी वाहूनि मीननाथ ॥
मच्छिंद्रा सोडूनि थिल्लरांत ॥ पुढें जात सच्छिष्य ॥४२॥
पुढें जातां शतपावलीं ॥ कक्षेतूनि भिक्षाझोळी काढिली ॥
त्यांत पाहतां देखिली ॥ वीट उत्तम हाटकाची ॥४३॥
पाहतांचि दृष्टीं कनकवीट ॥ म्हणे कीं फुका भ्याला मच्छिंद्रनाथ सुभट ॥
मग दाट लक्षूनि तृण अफाट ॥ झुगारिली वीट त्यामाजी ॥४४॥
त्या कनकविटेसमाकृती ॥ पाषाण पाहूनि गोरक्षजती ॥
झोळींत घालूनि कक्षेप्रती ॥ पुन्हां नेसवी झोळीतें ॥४५॥
कक्षे झोळी घालून ॥ स्कंधीं पुन्हां मीननाथ घेऊन ॥
लगबगोंनी मार्गगमन ॥ करीत असे नाथ तो ॥४६॥
सुपंथ लक्षितां तांतडीनें ॥ एक कोस गेला त्वरेंकरुन ॥
तों मच्छिंद्रनाथ दिशा फिरुन ॥ जात मागुता तांतडी ॥४७॥
पुढें जातसे गोरक्षनाथ ॥ मागूनि मच्छिंद्र लगबगा येत ॥
परी तो नाटोपे गोरक्षनाथ ॥ मार्ग क्रमितां मच्छिंद्रा ॥४८॥
परी इतुक्या नेटें भावें ॥ मार्ग मिळतां नाटोपावें ॥
तरी लघुशंकेलागीं धावें ॥ संगतसंगमीं मिळाल्या ॥४९॥
यापरी शौचा सर्वांशीं जावें ॥ लागत आहे सर्वानुभवें ॥
संगतसंगमी होऊनियां ठावे ॥ विसांवयासी महाराजा ॥५०॥
ऐसियापरी आहे गमन ॥ तेवीं मच्छिंद्रा आले घडून ॥
परम तांतडीं करितां गमन ॥ परी तो न मिळे गोरक्ष ॥५१॥
ऐसेपरी गोरक्षनंदन ॥ पुढें चालला सुपंथपथानें ॥
मार्ग काढिला दीड योजन ॥ जाणूनि खूण अंतरींची ॥५२॥
तों अवचट देखिला तरु ॥ गोरक्ष पाहे दृष्टीपरु ॥
मनांत म्हणे व्हावें स्थिरु ॥ येऊं द्यावें नाथासी ॥५३॥
ऐसें योजूनि स्वचित्तात ॥ पाहता झाला उंबरतरुतें ॥
तों त्या ठायीं पोखरणी अदभूत ॥ वामतीर्थ देखिलें ॥५४॥
मग झोळी काढिली कक्षेंतून ॥ स्कंधीचा उतरिला नाथ मीन ॥
मग अंबुपात्र करीं कवळून ॥ पोखरणींत उतरला ॥५५॥
सारुनि आपुलें स्नान ॥ अंगीं भस्म केलें लेपन ॥
उपरी आपुले नेम सारुन ॥ घातलें स्नान मीननाथा ॥५६॥
तों मार्गाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ अति तांतडीनें आले तेथ ॥
स्नान करुनि यथास्थित ॥ नित्यकर्म सारिलें ॥५७॥
सकळ सारिलें नित्यनेमा ॥ बैसले मार्गी विश्रामा ॥
बैसल्या उपशब्दउगमा ॥ पुन्हां दावी मच्छिंद्र ॥५८॥
म्हणे बा रे गोरक्षनाथ ॥ कर्कश अरण्य येथपर्यंत ॥
आपणां लागलें भयानकवत ॥ पुढेंही लागेल ऐसेंचि ॥५९॥
येरु म्हणे जी गुरुराया ॥ याहूनि पुढें अधिक काय ॥
मच्छिंद्र म्हणें काहीं भय ॥ काननीं या आहे कीं ॥६०॥
गोरक्ष म्हणे वागुत्तर ॥ कीं महाराजा असतां जड पर डर ॥
होता जो तो डर थोर ॥ मागेंचि राहिला आहे जी ॥६१॥
आतां नाहीं डर कैंचा ॥ स्वस्थ असावें कायावाचा ॥
मागें राहिला भाव साचा ॥ जड डराचा महाराजा ॥६२॥
तरी आतां कृपादेही ॥ आपणांपाशीं डर नाहीं ॥
मग भय कैचें काननप्रवाहीं ॥ जड असल्या अचाट ॥६३॥
यावरी बोले मच्छिंद्रनाथ ॥ आपणांजवळ जड ॥ आहे बहुत ॥
हाटकवीट भस्मझोळींत ॥ स्त्रीराज्यांतूनि आणिली ॥६४॥
म्हणूनि तूतें भय स्थित ॥ विचारितां काननांत ॥
येरु म्हणे अशाश्वत ॥ जडही नसे डर गेला ॥६५॥
ऐसें म्हणतां गोरक्षनाथ ॥ मच्छिंद्राचे काय चित्तांत ॥
चित्तीं म्हणे हाटकविटेतें ॥ सांडिली की कळेना ॥६६॥
ऐसें जाणूनि स्वचित्तांत ॥ मच्छिंद्र तळमळी पहावयातें ॥
परी गोरक्ष मच्छिंद्राचा धरुनि हात ॥ पर्वतावरी नेतसे ॥६७॥
तो महापर्वत गर्भगिरी ॥ उभे चढतांचि लघुशंका करी ॥
पर्वतमाथां गोरक्ष मौन वरी ॥ मज समजेल म्हणूनी ॥६८॥
मग दोन घटिका स्वस्तिक्षेम ॥ सेविती ते विश्राम ॥
उपरी अवयव परिक्षालून ॥ मार्ग क्रमूं म्हणताती ॥६९॥
ज्याचें त्यानें वस्त्रभूषण ॥ अंगीं केलें परिधान ॥
आपुलाल्या झोळ्या घेवोन ॥ कक्षे अडकवूनि बांधिती ॥७०॥
तो मच्छिंद्र आपुली घेऊनि झोळी ॥ विकासूनि पाहे नेत्रकमळी ॥
तो कनक नसे पाषाणवळी ॥ झोळीमाजी नांदतसे ॥७१॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ धरणीवरी अंग टाकीत ॥
अहा अहा म्हणूनि आरंबळत ॥ कनकवीट गेली म्हणोनी ॥७२॥
मच्छिंद्र बोले क्रोधेंकरुन ॥ तुवां टाकिलें रे माझें धन ॥
तूतें ओझें काय दारुण ॥ झालें होतें तयाचें ॥७३॥
अहा आतां काय करुं ॥ कोठें पाहूं हा भांगारु ॥
परम यत्नें वेंचूनि शरीरु ॥ हाटक आणिले होते म्यां ॥७४॥
तरी हा थोर मध्यें अनर्थ ॥ कैसा योजिला श्रीभगवंतें ॥
हातीचें सांडूनि गेलें वित्त ॥ तरी देवक्षोभ जाणावा ॥७५॥
ऐसें म्हणोनि दडदडां धांवत ॥ पुन्हां परतोनि मागे पहात ॥
ठाई ठाई चांचपीत ॥ उकरीत महीसी ॥७६॥
ऐसी करोनि अपार चेष्टा ॥ अंग टाकी महीं प्रतिष्ठा ॥
गडबडां लोळोनि स्फुंदे स्पष्टा ॥ करकमळें पिटीतसे ॥७७॥
पुनः पुनः मही उकरी ॥ इकडे तिकडे पाषाण करीत ॥
भाळावरती ठेवूनि हस्त ॥ कर्म बुडालें म्हणतसे ॥७८॥
ऐसें म्हणोनि आक्रोश करीत ॥ दीर्घस्वरें हंबरडा फोडीत ॥
जीवास सोडूं म्हणत ॥ कैसें केलें देवानें ॥७९॥
पिशाचासम भ्रमण करीत ॥ म्हणे माझें येथें आहे वित्त ॥
धांवोनि उकरा महींतें ॥ कोणीतरी येऊनियां ॥८०॥
गोरक्षापाशीं शीघ्र येऊन ॥ म्हणे तूं माझें न देशी धन ॥
तूं कोण कोणाचा येऊन ॥ पाळतीने मिरविसी ॥८१॥
ऐसे अनाओळखीने बोलत ॥ तेणें हदयीं दचकला गोरक्षनाथ ॥
मग मच्छिंद्राचा धरोनि हात ॥ पर्वतावरी नेतसे ॥८२॥
तो महानग पर्वत गर्भगिरी ॥ उभे चढले तयावरी ॥
चढतां लघुशंका करी ॥ पर्वतमाथां गोरक्ष ॥८३॥
सिद्धीयोग मंत्र जपूनी ॥ मंत्रधार कनकवर्णी ॥
सकळ पर्वत देदीप्यमानी ॥ शुद्ध हाटकीं मिरवला ॥८४॥
मग श्रीगुरुसी नमन करुन ॥ म्हणे लागेल तितुकें घेईजे सोनें ॥
तें मच्छिंद्र पाहूनियां जाण ॥ म्हणे धन्य धन्य गोरक्षा ॥८५॥
गोरक्ष म्हणे गुरुनाथा ॥ लागेल तितुकें घ्यावें कनका ॥
येरु म्हणे तूं परीस निका ॥ लाभलासी पाडसा ॥८६॥
मग हदयी धरुनि गोरक्षनाथ ॥ म्हणे बा धन्य आहेस सुत ॥
सकळ सिद्धींचे माहेर युक्त ॥ होऊनि जगीं मिरविसी ॥८७॥
मग मी ऐसा परीस टाकोन ॥ काय करुं फार सुवर्ण ॥
उत्तम निधनालागी सांडून ॥ वल्लीरसा कां पहावें ॥८८॥
हातींचा टाकूनि राजहंस ॥ व्यर्थ कवळूं फोल वायस ॥
कीं कामधेनू असतां गृहास ॥ तक्र मागें घरोघरीं ॥८९॥
दैवें निधी लाभल्या हातीं ॥ किमर्थ शोधाव्या किमयायुक्ती ॥
चिंतामणीची असतां वस्ती ॥ चिंता करावी कासयातें ॥९०॥
तें बाळका कैसें कळे पूर्ण ॥ अर्थ लाधला तुजयोगानें ॥
आतां कासया व्हावें सुवर्ण ॥ सकळनिधी अससी तूं ॥९१॥
ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥ उपरी गोरक्ष विचार करीत ॥
म्हणे महाराजा आजपर्यंत ॥ कनक झोळी वागविलें ॥९२॥
तरी तें वागवावया कारण ॥ कोणता होता मनीं काम ॥
तीच कामना दृश्यमान ॥ मातें दावीं महाराजा ॥९३॥
येरु म्हणे वत्सा ऐक ॥ मम हदयींची होती भूक ॥
आपुले देशीं मोडूनि हाटक ॥ बहु साधुंतें पुजावें ॥९४॥
तया हाटकाचें करुनि अन्न ॥ मेळवावे अपार संतजन ॥
भंडारा करावा ऐसें मन ॥ मनकामनेतें वेधलें ॥९५॥
इतुकाचि अर्थ होता चित्तीं ॥ म्हणोनि वागविलें हाटकाप्रती ॥
यावरी बोले गोरक्ष जती ॥ तरी ही कामना फेडीन मी ॥९६॥
मग पर्वती बैसवोनि मच्छिंद्रनाथा ॥ आपण पुन्हां उतरला खालता ॥
उचलोनि नेलें माथां ॥ पर्वतमाथीं गोरक्षकें ॥९७॥
मग गंधर्वास्त्र जपोनि होटीं ॥ स्वर्गा प्रेरिली भस्मचिमुटी ॥
तेणेंकरुनि महीतळवटीं ॥ चित्रसेन उतरला ॥९८॥
श्रीनाथासी करुनि नमन ॥ उभा राहिला कर जोडून ॥
म्हणे महाराजा आज्ञा कोण ॥ काय कार्य करावें मी ॥९९॥
येरु म्हणे गंधर्वनाथा ॥ आणिक पाचारीं गंधर्व येथें ॥
त्यांसी पाठवूनि महीवरतें ॥ मेळा करा सर्वाहीं ॥१००॥
नाना बैरागी संन्यासी ॥ जपी तपी संतयोगियांसी ॥ येथें आणोनि समाजेंसीं ॥ अन्नदानें उत्साह करावा ॥१॥
सुरवरगंधर्वगणसहित ॥ देवदानवकिन्नरांसहित ॥
मेळवोनि अपरिमित ॥ आनंद उत्साह करावा ॥२॥
ऐसें सांगतांचि चित्रसेनातें ॥ मग चित्रसेनें पाचारी गंधर्वातें ॥
एकशत गंधर्व महीवरते ॥ प्रकट झाले येवोनी ॥३॥
मग त्या गंधर्वासी चित्रसेने ॥ सांगूनि सर्व वर्तमान ॥
दाही दिशा प्रेरणा करुन ॥ प्रज्ञावंत आणिले कीं ॥४॥
जपी तपी योगशीळ ॥ गुप्त प्रगट आणिले सकळ ॥
नवनाथादि ऋषिमंडळ ॥ येऊनियां पोहोंचले ॥५॥
शुक दत्तात्रेय याज्ञवल्की ॥ वसिष्ठ वामदेव कपिल शेखी ॥
व्यास पाराशर नारद ऋषी ॥ वाल्मीक पाचारिले गंधर्वी ॥६॥
अठ्यायशीं सहस्त्र ऋषिभार ॥ स्वर्गीहूनि उतरले देवकिन्नर ॥
गणगंधर्वदि वसुलोक अपार ॥ तपोलोक पातले ॥७॥
त्यांतचि अष्टवसूंपहित ॥ उपरिचर आला विमानव्यक्त ॥
तेणें येतांचि मच्छिंद्रास वृत्तांत ॥ कीलोतळेचा सांगीतला ॥८॥
कीं सोडूनि स्त्रीदेश अवनी ॥ सिंहलद्वीपा गेला मैनाकिनी ॥
परी तुमच्या वियोगेंकरुनी ॥ क्षीणशरीर झालीसे ॥९॥
तरी असो कैसें ते ॥ भेटेल तुम्हां ईश्वरसत्ते ॥
परी योगक्षेम स्वशरीरातें ॥ आहांत कीं त्रिवर्ग ॥११०॥
मच्छिंद्र म्हणे अहो जी ताता ॥ तव कृपेची दृष्टी असतां ॥
सदा मिरवूं सर्व क्षेमता ॥ पदोपदी अर्थातें ॥११॥
ऐसे वदतां उभय जाण ॥ तों देवांसह उतरला पाकशासन ॥
ब्रह्मा विष्णु रुद्रादि पूर्ण ॥ महीलागीं उतरले ॥१२॥
श्रीनाथासी भेटोनि सकळ ॥ मग ठाई ठाई सर्व मंडळ ॥
विराजूनि वार्ता सकळ ॥ ठाई ठाई करिताती ॥१३॥
येरीकडे गोरक्षनाथें ॥ पाचारुनि मच्छिंद्रातें ॥
म्हणे समुदाय अपरिमित ॥ मिळाला कीं महाराजा ॥१४॥
तरी तुमची कनकवीट ॥ आणोनि देतों सुमट ॥
तितुक्यांत अर्थ सारोनि सुभट ॥ बोळवावें समस्तांतें ॥१५॥
यावरी बोले मच्छिंद्रनाथ ॥ काय करुं ही कनकवीट ॥
तुजएवढा शिष्यवर्गात ॥ असतां चिंता नसे मज ॥१६॥
ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ ॥ गदगदां हांसे गोरक्षसुत ॥
म्हणे महाराजा प्रतापवंत ॥ सकळ तुम्ही प्रगटलां ॥१७॥
ऐसें बोलोनि वागुत्तरीं ॥ माथा ठेवी चरणांवरी ॥
म्हणे महाराजा स्वशरीरीं ॥ स्वस्थ आपण असावें ॥१८॥
अष्टसिद्धी अणिमा गरिमा ॥ प्राप्ती प्राकाम्य आणि महिमा ॥
वशित्व ईशित्व आठवी प्रतिमा ॥ सिद्धीलागीं पाचारा ॥१९॥
पाचारिल्या अष्ट जणी ॥ येवोनि लागल्या गोरक्षचरणीं ॥
म्हणती आज्ञा करा स्वामी ॥ कामनेसह अर्थातें ॥१२०॥
येरु म्हणे वो प्रियभामिनी ॥ तृप्त करावें मंडळीलागुनी ॥
षड्रसान्नरुचीकरोनी ॥ संतुष्ट सर्व करावे ॥२१॥
मग तेथ अवश्य म्हणोनि सिद्धी ॥ वेंचित्या झाल्या आपुल्या बुद्धी ॥
अन्न निर्मिले पर्वतमांदी ॥ षड्रसादि पक्कान्नें ॥२२॥
ऐशा सिद्धी योजिल्या कामा ॥ याचपरी सडासंमार्जक्न आराम ॥
सप्तही सटव्या नेमूनि उत्तमा ॥ मही पवित्र करीतसे ॥२३॥
तरी त्या सप्तही सटव्या कोण ॥ ऐका तयांचीं नामाभिधानें ॥
आणि तयांतें काय कामानें ॥ निरोपिलें विधीनें ॥२४॥
तरी त्या उत्पत्तिस्थानीं जन्मकाळा ॥ जावोनि लक्षावें यांनीं बाळा ॥
विधिअक्षरें लिहिलीं भाळा ॥ वाचूनि पाहती सटव्या ॥२५॥
जरी सप्त सटव्या मानवासी ॥ शोभा न मिरवे असुरप्रदेशीं ॥
रानसटवी वनचरांसी ॥ विलोकूनि जातस्वे ॥२६॥
वृषभ अश्व गांवाचे पशू ॥ घोडसटवी आहे त्यांस ॥
वासतसटवी खेचरांत ॥ पक्षिकुळा मिरवतसे ॥२७॥
अंबुघासटवी जळचरांत ॥ सबुधासटवी उदळी जात ॥
ऐसिया कामीं सटव्या सात ॥ कमलोदभवें लाविल्या ॥२८॥
त्या सातही परिचारिका ॥ सडासंमार्जन करिती निका ॥
यापरी वाढणें आनंदोदिका ॥ जळदेवता आराधिल्या ॥२९॥
कुमारी धनदा नंदा विमला ॥ लक्ष्मी विख्याता प्रबळ ज्ञानमंगळा ॥
नववीं समर्थं देवता बाळा ॥ ह्या नवही वाढिती सकळातें ॥१३०॥
गंधर्वे करावें पाचारणें ॥ समाचार घ्यावा अष्टवसूनें ॥
चौकी द्यावी भैरवानें ॥ अष्टदिशा अष्टांनी ॥३१॥
उपरिचरवसूनें करपल्लवी ॥ सकळांसी दक्षणा द्यावीं ॥
मच्छिंद्र करीत आघवी ॥ प्रदक्षिणा भावार्थे ॥३२॥
चित्रसेन गंधर्वपती ॥ तांबूल देतसे सर्वांप्रती ॥
आणि तीर्थ जे गंगाभगीरथी ॥ तोय वाढी सर्वांतें ॥३३॥
यापरी अष्टोत्तरशत तीर्थे ॥ पाणी वाहती समर्थे ॥
आणि उचलणें उच्छिष्टपात्रातें ॥ ऐशीं कामे करिताती ॥३४॥
महानुभाव जो उमापती ॥ अती आदरें स्वपंक्तीं ॥
अप्सरा किन्नर गायन करिती ॥ नारदादि येवोनियां ॥३५॥
ऐसें नेम नेमूनियां कामा ॥ दिधलें ऐसें कार्य उगमा ॥
आनंदोत्साह होतां सुकर्मा ॥ सर्वानंद हेलावें ॥३६॥
ऐसी होतां आनंदस्थिती ॥ परी गाहिनी आठवला गोरक्षचित्तीं ॥
मग येवोनियां मच्छिंद्राप्रती ॥ बोलता झाला प्राज्ञिक ॥३७॥
हे महाराजा गुरुनाथा ॥ प्राणिमात्र आले समर्था ॥
परी कर्दमपुतळा गाहिनीनाथा ॥ येथें आणावा वाटतें ॥३८॥
ऐसें मोहक ऐकोनि वचन ॥ म्हणें गंधर्वा पाठवोन ॥
कोंतिगेसहित मधुब्राह्मण ॥ बाळासह आणावा ॥३९॥
मग चित्रसेना सांगोनि वृत्तांत ॥ पत्र लिहिलें मधुविप्राते ॥
सुलोचन गंधर्वाचे ओपून हस्तें ॥ कनकगिरीशीं पाठविला ॥१४०॥
गंधर्व जावोनि कनकगिरीसी ॥ भेटोनि कोंगिगे मधुविप्रासी ॥
मग आनंदोत्सव वृत्तांतासी ॥ निवेदिलें सकळ तेथे ॥४१॥
मग पत्र देवोनि त्याहातीं ॥ वाचून पाहे विप्रमूर्ती ॥
पाचारण ही मजकुरशक्ति ॥ ध्यानालागीं संचरली ॥४२॥
मग बाळासह सपरिवार ॥ येता झाला मधुविप्र ॥
मुक्कामोमुक्काम महीवर ॥ साधुनिया पोंचला ॥४३॥
सप्तवर्षी गहिनीनाथा ॥ आणूनि लोटिला पदवरुता ॥
मच्छिंद्र अंकीं घेवोनि त्यांतें ॥ प्रेमें चुंबन घेतसे ॥४४॥
अति स्नेहानें करोनि लालन ॥ म्हणे अवतारी करभंजन ॥
गैबी जन्मला गहिनीनाम ॥ सकळालागीं दिठावी ॥४५॥
ऐसिये स्नेहाचा परम अवसर ॥ पाहोनि बोलता झाला शंकर ॥
कीं आम्हालागीं पुढें अवतार ॥ घेणें आहे मच्छिंद्रा ॥४६॥
तरी त्या अवतरणीं नेमस्ती ॥ मही मिरवे नामांप्रती ॥
तरी त्या अनुग्रहाचे स्थितीं ॥ गहिनीनाथ वदविला ॥४७॥
तरी त्यातें विद्या अभ्यासून ॥ सकळ अधिकारी करावा पूर्ण ॥
मी अनुग्रह याचा घेईन ॥ पुढले ते अवतारीं ॥४८॥
ऐसें सांगतां शिव त्यास ॥ मग बोलावूनि गोरक्षास प्रत्यक्ष अनुग्रह गहिनीनाथास ॥
गोरक्षानें देवविला ॥४९॥
सर्व देवांचे साक्षीसहित ॥ मौळीं ठेविला वरदहस्त ॥ ब्रह्मपरायण गहिनीनाथ ॥
जाहला सत्य परियेसा ॥१५०॥
अनुग्रहउत्साह मंडळीसंगम ॥ एक मास उभवला आनंदद्रुम ॥
मग कुबेरा पाचारुनि नेम ॥ सांगता झाला गोरक्ष ॥५१॥
म्हणे हा कनकगिरी जा घेवोन ॥ अम्हां देई अपार भूषण ॥
सकळ मंडळी गौरवोन ॥ पाठवणें स्वस्थाना ॥५२॥
मग तो कुबेर बोलें वचन ॥ येथेंचि असों द्यावें धन ॥
मी लागेल तैसें इच्छेसमान ॥ भूषणातें आणितों ॥५३॥
मग अपार दिंडें वस्त्रें आणोन ॥ महत्त्वासारखें दिधलें वांटोन ॥
द्रव्यादि दैवोनि याचकजन ॥ तोषविले सकळ ॥५४॥
सकळ तोषले पावोनि मान ॥ पावती आपुलें स्वस्थान ॥
परी मच्छिंद्र तेथें राहोन ॥ अभ्यासिती गहिनीतें ॥५५॥
उपरी गंधर्व मच्छिंद्रपिता ॥ तो आपुले स्वस्थाना जातां ॥
त्यासवें देऊनि मीननाथा ॥ सिंहलद्वीपीं पाठविला ॥५६॥
उपरिचर वसूनें मीननाथ ॥ केला कीलोतळाच्या हस्तगत ॥
मच्छिंद्राचा सकळ वृत्तांत ॥ निवेदिला तियेसी ॥५७॥
कीलोतळेंनें ऐकोनि वृत्तांत ॥ नेत्रीं आणिलें अश्रुपात ॥
म्हणे आतां मातें मच्छिंद्रनाथ ॥ कैसा भेटेल कळेना ॥५८॥
उपरिचर बोले वो शुभाननी ॥ चिंता न करीं कांहीं मनीं ॥
एक वेळां मच्छिंद्रमुनी ॥ निजदृष्टीं पाहसील ॥५९॥
ऐसें म्हणोनि उपरिचर गेला ॥ येरीकडे कीलोतळा ॥
हदयीं कवळोनि मीननाथबाळा ॥ प्रेमें चुंबन घेतसे ॥१६०॥
म्हणे बाळा माझिये खंती ॥ होतसे कीं तुजप्रतीं ॥
सोडोनि आलासी नाथ निगुती ॥ श्री मच्छिंद्र पितयातें ॥६१॥
ऐसें बेलोनि मीननाथातें ॥ वारंवार चुंबन घेत ॥
येरीकडे गर्भाद्रातें ॥ गहिनी विद्या अभ्यासी ॥६२॥
तये वेळेस कोण कोण तेथें ॥ राहिलें होते ऐका नाथ ॥
विचार करोनि उमाकांत ॥ गर्भाद्रातें राहिले ॥६३॥
अदृश्य अस्त्र नगीं प्रेरुन ॥ स्वस्थाना गेला कुबेर निघोन ॥
तेणें नग तो कनकवर्ण ॥ झांकोळून पैं गेला ॥६४॥
परी गर्भाद्रि पर्वतांत ॥ वस्तीस राहिला उमाकांत ॥
तो अद्यापि आहे स्वस्थानांत ॥ म्हातारदेव म्हणती त्या ॥६५॥
तयाचिया पश्चिम दिशेसी ॥ कानिफा राहिला शिष्यकटकेंसी ॥
वस्ती करोनि नाम या ग्रामासी ॥ मढी ऐसें ठेविलें ॥६६॥
तयाचे दक्षिण पर्वतीं ॥ राहता झाला मच्छिंद्र जती ॥
त्याहूनि पूर्वेस महीपर्वतीं ॥ जालिंदर राहिला ॥६७॥
आणि त्या पर्वतापैलदेशीं ॥ नागनाथ राहिला वडवानळेंशीं ॥
आणि रेवणासिद्ध जया महाशीं ॥ विटेग्रामीं राहिला ॥६८॥
वामतीर्थ गर्भाद्रिपर्वतीं ॥ राहता झाला गोरक्ष जती ॥
सेवेसी शिष्य ठेवोनि सप्ती ॥ विद्या सागे गाहिनीते ॥६९॥
एक वर्षपर्यंत ॥ अभ्यासिला गाहिनीनाथ ॥
सकळ विद्येचे स्वसामर्थ्य ॥ तया देहीं सांठविलें ॥१७०॥
परी कोंतीगांवी मधुब्राह्मण ॥ गेले होते गहिनीस ठेवोन ॥
ते जालंदरासमीप दिशेकारण ॥ वस्तीलागीं विराजले ॥७१॥
विराजले परी गहिनीनाथ ॥ अभ्यासिते झाले पात्रभरित ॥
मग गोरक्ष बोळवोनि त्यातें ॥ विप्रापाशीं पाठविला ॥७२॥
यावरी त्या वस्तीस ॥ वसते झाले बहुत दिवस ॥
शके दहाशें वर्षांस ॥ समाधीं त्यांनी घेतल्या ॥७३॥
घेतल्या परी यवनधर्म ॥ कबरव्यक्त झाले आश्रम ॥
पुढें औरंगजेब तें पाहून ॥ पुसता झाला लोकांसी ॥७४॥
ह्या कोणाच्या असती कबरी ॥ ते म्हणती तव पूर्वजांच्या साचारीं ॥
मठींत कान्हाबापर्वती मच्छिंद्र ॥ आवडतें स्थान याचें तें ॥७५॥
त्याहूनि पूर्वेस जालिंदर ॥ विराजली त्याची कबर ॥
त्याहूनि खालता बल्ली थोर ॥ गाहिनीनाथ नांदतसे ॥७६॥
मग तेणें ऐकूनि ऐसी भात ॥ पालटिलें त्या नांवातें ॥
जानपीर जालिंदरातें ॥ ठेविलें असे राजानें ॥७७॥
गाहिनीनाथास गैवी पीर ॥ नाम ठेविलें तेवी साचार ॥
महीजदी बांधोनि पुजारे ॥ ठाई ठाई स्थापिले ॥७८॥
मच्छिंद्र आणि कानिफाचें ॥ नामाभिधान बदलूनि साचें ॥
मायावा कान्होबा बोलोनि साचें ॥ यवन पुजारी स्थापिले ॥७९॥
कल्याण कलबुगीं बाबाचैतन्य ॥ राजबागशर नाम ठेविलें त्यानें ॥
म्हणाल केलें यवनकारण ॥ ऐसें विपरीत त्या रायें ॥१८०॥
परी समाधी पाहिल्या कबरीऐशा ॥ म्हणोनि त्यातें पडला भास ॥
कीं हे पीर असतील यवनकुळींचे ॥ म्हणोनि प्रविष्ट करावें ॥८१॥
म्हणोनि ऐसें कृत्य घडलें ॥ यापरी ऐकोनि श्रोता बोले ॥
कीं कबरयुक्त नाथ केले भले ॥ काय म्हणोनि झालेती ॥८२॥
तरी ते अंतरसाक्ष नाथ ॥ यवन राजे होतील महीते ॥
ते छळितील हिंदूदेवांतें ॥ म्हणोनि कबरी बांधिल्या ॥८३॥
परी हें असो आतां कथन ॥ मध्यें कथा असती देदीप्यमान ॥
नाथांनीं योजूनि आपुलालें स्थान ॥ ठाई ठाई राहिले ॥८४॥
गोरक्ष सटव्या ठेवोनि रक्षण ॥ निघता झाला तीर्थांकारण ॥
त्या सटव्या तेथें अद्याप राहून ॥ रक्षिताती स्थानासी ॥८५॥
यापरी पुढें गोरक्षनाथ ॥ भेटेल जाऊनि भर्तरीस ॥
ती कथा पुढें रसाळभरित ॥ श्रोतिये श्रवणीं स्वीकारा ॥८६॥
नरहरिवंशीं धुंडीकुमर ॥ कवि मालू असे संतकिकर ॥
कथा सांगेल भक्तिसार ॥ भर्तरीचे आख्यान ॥८७॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥
सदा परिसोत भाविक चतुर ॥ त्रयोविंशाध्याय गोड हा ॥१८८॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय २३ ॥ ओव्या ॥१८८॥

श्री नवनाथ भक्तिसार पोथी - अध्याय २२
श्रीगणेशाय नमः
जयजयाजी कमळाकांता ॥ कमळानाभा कमलोद्भवपिता ॥
कमळपत्राक्षा दुःखहर्ता ॥ पुढें ग्रंथ रसाळ बोलवी ॥१॥
भक्तिसारग्रंथ हा रत्न ॥ बोलवीं श्रोत्यांकारण ॥
मागिले अध्यायीं गोरक्षनंदन ॥ मच्छिंद्र घेऊनि गेला असे ॥२॥
नेला तरी किलोतळा ॥ बुडालीसे सांगडी ॥ शोकाब्धींजळा ॥
तैं उपरिचवसू तरणि आगळा ॥ काढावया पातला ॥३॥
स्थावरबोधाची बांधूनि सांगडी ॥ शोकाब्धींत घातली उडी ॥
शब्दार्थी मारुनि बुडी ॥ धैर्यकांसे धरियेलें ॥४॥
धरिल्यावरी बाहेर काढुनि ॥ म्हणे माय वो सावधानी ॥
शोक सांडी अशाश्वत गहनी ॥ शाश्वत नाहीं कांहींच ॥५॥
पाहतेपणीं जें जें दृश्य ॥ तें आभासपणीं पावें नाश ॥
तूं शोक करिसी शब्दप्राप्तीस ॥ श्लाध्य तूतें लागेना ॥६॥
तूं कोठील मच्छिंद्र कोण ॥ स्वर्ग भूमीचा झाला संगम ॥
योग तितुका भोगकाम ॥ सरुनि गेला जननीये ॥७॥
तूं अससी स्वर्गवासिनी ॥ मच्छिंद्र स्तविला जन्मोनी ॥
परी प्रारब्धें सहजयोगेंकरुनीं ॥ गाठीं पडली उभयतां ॥८॥
पडली परी मच्छिंद्र स्तविला जन्मोनी ॥
परी प्रारब्धें तूं आपुलें स्वहित निश्चित ॥
सांभाळीं कीं जननीये ॥९॥
तूं झालीस पदच्युत ॥ तरी तें सांभाळी निश्चित ॥
तरी आतां मानूनि व्यक्त ॥ होऊनि चाल जननीये ॥१०॥
तूं पातलिया सिंहलद्वीप ॥ मग मच्छिंद्रयोगें स्थावरकंदर्प ॥
पूर्ण होईल शुद्धसंकल्प ॥ मच्छिंद्र दृष्टीं पाहूनियां ॥११॥
द्वादश वर्षे झालिया पूर्ण ॥ तूतें भेटवीन मच्छिंद्रनंदन ॥
मीननाथादि तपोधन ॥ गोरक्ष दृष्टीं पाहसील तूं ॥१२॥
म्हणशील यावया मच्छिंद्रनंदन ॥ काय पडेल त्या कारण ॥
सिंहलद्वीपीं पाकशासन ॥ महामख आरंभील ॥१३॥
तेव्हां विष्णु विरेंची रुद्र ॥ तया स्थानी येती भद्र ॥
सकळ देवादिक मित्र चंद्र ॥ एका ठायीं मिळतील ॥१४॥
ते नवनाथादि प्रतापवंत ॥ ऐक्य करील शचीनाथ ॥
गहिनी गोपीचंद भर्तरि सहित ॥ एक्या ठायीं मिळतील ॥१५॥
तरी आतां शोक कां व्यर्थ ॥ सांडी प्रांजळ करीं चित्त ॥
विमानारुढ होऊन त्वरित ॥ सिंहलद्वीपीं चाल कीं ॥१६॥
ऐसें ऐकोनि मैनाकिनी ॥ महाराजा श्वशुरप्राज्ञी ॥
द्वादशवर्षे मच्छिंद्र नयनी ॥ दावीन ऐसें म्हणतसां ॥१७॥
तरी मखमंडप पाकशासन ॥ करी अथवा न करो पूर्ण ॥
जरी मज दावाल मम नंदन ॥ तरी मज भाष्य द्यावी कीं ॥१८॥
भाष्य दिधल्या अंतरपुटीं ॥ विश्वासरत्ना रक्षीन पोटीं ॥
मग हे शोक दरिद्रपाठी ॥ चित्त सांडील महाराजा ॥१९॥
ऐसें बोलतां मैनाकिनी ॥ श्वशुर हास्य करी आननीं ॥
मग करतळभाष्य देऊनी ॥ संतुष्ट केलें सुनेतें ॥२०॥
यावरी बोले कीलोतळा ॥ मातें नेतां स्वर्गमंडळा ॥
परी नृपपणीं या स्थळा ॥ कोणालागी स्थापावें ॥२१॥
येरु म्हणे ऐक वचन ॥ सवें सेवेसी आहेत क्रियावान ॥
दैर्भामा उत्तम नामानें ॥ राज्य तीते ओपीं कां ॥२२॥
मग अवश्य म्हणे मैनाकिनी ॥ दैर्भामा राज्यासनीं ॥
बैसविली अभिषेक करुनी ॥ राज्यपदीं तेधवा ॥२३॥
राज्यीं ओपूनि दैर्भामा ॥ मिळती झाली विमानसंगमा ॥
परी सकळ देशींच्या शैल्या रामा ॥ शोकाकुळ झाल्या कीं ॥२४॥
म्हणती माय वो शुभाननी ॥ तुम्ही जातां आम्हांसी टाकुनी ॥
आम्हां पाडसांची हरिणी ॥ दयाळू माय अससी तूं ॥२५॥
असो ऐशा बहुधा शक्ती ॥ शैल्या शोकाकुलित होती ॥
मग तितुक्यां समजावूनि युक्तीं ॥ विमानयानीं आरुढली ॥२६॥
दैर्भामेसी नीतिप्रकार ॥ सांगूनि युक्ती समग्र ॥
यथासमान प्रजेचा भार ॥ सांभाळी कां साजणीये ॥२७॥
जेथील तेथें हित फार ॥ तैसे केलें गोचर ॥
मग विमानीं आपण सश्वशुर ॥ स्वर्गमागें गमताती ॥२८॥
असो विमान पावे द्वीपाप्रती ॥ पदा स्थापिली ते युवती ॥
मग तो उपरिचर सहजगती ॥ आपुल्या स्थाना सेविती ॥३०॥
त्याचि न्यायें उपरिदक्षें ॥ आणि कीलोतळा पद्मिनी प्रत्यक्ष ॥
शाषमोचन सायंकाळास ॥ स्थाना पावली आपुल्या ॥३१॥
कीं अब्धीचें अपार जीवन ॥ व्यापी महीतें मेहमुखाने ॥
परी तें पुन्हां सरिक्षाओघानें ॥ ठायींचे ठायीं जातसे ॥३२॥
त्याचिया न्यायें स्नुषा श्वशुर ॥ पावते झाले स्वस्थानावर ॥
परी तैं इकडे नाथ मच्छिंद्र ॥ गौडबंगाली पातला ॥३३॥
मीननाथ स्कंधीं वाहून ॥ मार्गावरी करिती गमन ॥
तों शैल्येंदेशसीमा उल्लंघून ॥ गौडबंगालीं पातले ॥३४॥
मार्गी लागतां ग्राम कोणी ॥ त्या ग्रामांत संचरोनी ॥
गोरक्ष भिक्षा आणी मागुनी ॥ उदरापुरती तिघांच्या ॥३५॥
ऐसेपरी निर्वापण ॥ मार्गी करिताती गमन ॥
तों कौलबंगाला सांडून ॥ गौडबंगाली पातले ॥३६॥
मार्गी चालता सहजस्थिती ॥ तो कनिफा पूर्वी भेटला तयांप्रती ॥
तेथें पातल्या त्रिवर्गमूर्ती ॥ गमन करितां मार्गातें ॥३७॥
तेथें येताचि गोरक्ष जेठी ॥ स्मरण झालें तयाचे पोटीं ॥
कीं अच्युतवृक्षापुटीं ॥ कानिफाची भेटी झालीसे ॥३८॥
झाली परी हें उत्तम स्थान ॥ महायशस्वी पुण्यवान ॥
मातें दाबिले श्रीगुरुचें चरण ॥ जैसे चुकल्या वत्सासी ॥३९॥
प्रत्यक्ष माझी मच्छिंद्रराणी ॥ गेली होती आदिपट्टराणी ॥
मी पाडस रानोरानी ॥ निढळ्यावाणी लागतसे ॥४०॥
कीं मज वत्साची गाउली ॥ सहज रानी चरावया गेली ॥
शैल्या व्याघ्रे आव्हाटिली ॥ ती भेटविली रायानें ॥४१॥
मग स्कंधी होता नाथ मीन ॥ तथालागी मही ठेवून ॥
दृढ पायीं केलें नमन ॥ नेत्रीं अश्रु लोटले ॥४२॥
तें पाहूनि मच्छिंद्रनाथ ॥ बोलता झाला गोरक्षातें ॥
म्हणे बाळा अश्रुपात ॥ निज चक्षूंसी कां आले ॥४३॥
ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥ मग सकळ दुःखाचे मंडण ॥
तें गोरक्षचित्तीं प्रविष्ट होऊन ॥ नेत्रीं नीर अपार लोटलें ॥४४॥
सांगू जातां मुखानें ॥ तो कंठ आलासे भरुन ॥
मग क्षण एक तया स्थानीं बैसून ॥ स्थिर चित्त पैं केलें ॥४५॥
जैसे आकाशीं अभ्र दाटतां ॥ पुन्हां निर्मळ होय तत्त्वतां ॥
तैसें दुःख मोह चिंत्ता ॥ टाकून निर्मळ पैं केले ॥४६॥
मग बद्रीकाश्रमापासूनि कथन ॥ दुःखव्यावृत्ति अतिगहन ॥
कानिफा भेटीपर्यंत वदून ॥ ठाव पशस्वी म्हणतसे ॥४७॥
याचि ठायीं कानिफाभेटी ॥ झाली मातें कृपा जेठी ॥
तुमची शुद्धी तद्वान्वटी ॥ येथेंचि लाधली महाराजा ॥४८॥
तरी हें स्थान पुण्यवान ॥ तुमचे दाविले मज चरण ॥
तरी हे स्थान धनवंत पूर्ण ॥ चुकलें धन मज दिधलें ॥४९॥
दुःखसरिते प्रवाहें वेष्टी ॥ बुडतां वांचविले देउनि पृष्ठी ॥
कीं दुःख व्याघ्राच्या आसडूनि होटी ॥ माये भेटी केली असे ॥५०॥
म्हणे ऐसा राजा आहे नष्ट ॥ तरी आतां करीन त्याचें तळपट ॥
नगरी पालथी घालीन सुघट ॥ महीपालथा मिरवीन तो ॥६०॥
ऐसें बोलोनि विक्षेप चित्तीं ॥ पुढें मागें परमगतीं ॥
एकदोन मुक्काम साधिती क्षिती ॥ हेळापट्टणीं पातले ॥६१॥
ग्रामानिकट ग्रामस्थ भेटती ॥ त्यांतें वृत्तांत विचारीन जाती ॥
ते म्हणती कानिफा येऊनि क्षितीं ॥ मुक्त केलें जालिंदरा ॥६२॥
राया गोपीचंदा अनुग्रह देऊनी ॥ जगीं मिरवला अमरपणीं ॥
तेणें गुरुदीक्षा घेऊनी ॥ तपालागीं तो गेला ॥६३॥
राया मुक्तचंदा स्थापून ॥ राज्यपदीं राज्यासन ॥
देऊनियां अग्निनंदन ॥ तोही गेला षण्मास ॥६४॥
सकळ कथा मुळाहूनी ॥ मच्छिंद्रासी सांगितली ग्रामस्थांनी ॥
तें मच्छिंद्राचे पडतां श्रवणीं ॥ शांतपणीं मिरवला ॥६५॥
जैसा प्रळयानळावरती ॥ घनवृष्टीची होय व्यक्ती ॥
मग सकळ उवाळा पाहूनि अती ॥ अदृश्य होय पावक तो ॥६६॥
कीं साधक पातला असतां ॥ कीं श्रीगुरुचा संसर्ग होतां ॥
होतांचि सिद्धकाची व्यथा ॥ नासूनि जाय ते क्षणीं ॥६७॥
कीं तम ढिसाळ दाटल्या अवनी ॥ उदय होतांचि वासरमणी ॥
मग सकळ तम नाश पावूनी ॥ दिशा मिरविती उजळल्या ॥६८॥
तन्न्यायें मच्छिंद्रसंताप ॥ ग्रामस्थं बोलतां झाला लोप ॥
शांति वरुनि मोहकंदर्प ॥ चित्तामाजी द्रवलासे ॥६९॥
यापरी तो मच्छिंद्रनंदन ॥ ग्रामस्थां विचारी मुख्यत्वकरुन ॥
अधिकारी राज्यनिपुण ॥ कोण आहे प्राज्ञिक तेथें ॥७०॥
येरी म्हणती योगद्रुमा ॥ श्रेष्ठ करणिका राजा उगमा ॥
मैनावती शुभानना ॥ प्राज्ञिकवंत मिरवतसे ॥७१॥
त्या मातेनें अर्थ धरुन ॥ पुत्र मिरविला जी अमरपणें ॥
तुष्ट करोनि जालिंदरमन ॥ अमर झाली आपणही ॥७२॥
ऐसें बोलतां ग्रामस्थ युक्तीं ॥ मनांत म्हणे मच्छिंद्र यती ॥
ऐसा प्राज्ञिक आहे सती ॥ भेटी घ्याची तियेची ॥७३॥
ऐसिये धृती चित्तीं कल्पून ॥ चालते झाले त्रिवर्गजन ॥
ग्रामद्वारा शीघ्र येऊन ॥ द्वाररक्षकां सांगती ॥७४॥P>
म्हणती जालिंदर जो प्रज्ञावंत ॥ तयाचा सहोदर मच्छिंद्रनाथ ॥
ग्रामद्वारीं आहे तिष्ठत ॥ जाऊनि सांगा सतीसी ॥७५॥
अहो अहो द्वारपाळ ॥ सांगा चला उतावेळ ॥
मैनावती लक्षूनि सकळ ॥ वृत्तांत तियेतें निवेदावा ॥७६॥
ऐसें द्वारपाळ ऐकून ॥ मच्छिंद्रा करिते झाले नमन ॥
म्हणती महाराजा आज्ञा प्रमाण ॥ श्रुत करुं सतीसी ॥७७॥
म्हणती महाराज मच्छिंद्रजती ॥ जालिंदरसहोदर म्हणवितो क्षितीं ॥
तो येऊनि ग्रामद्वाराप्रती ॥ तिष्ठत आहे महाराजा ॥७८॥
ऐसे ऐकूनि मैनावती ॥ म्हणे कैसी वृत्ति कैसी स्थिती ॥
कैसी आहे भूषण व्यक्ती ॥ अभ्यासानभ्यास दाक्षेतें ॥७९॥
येरी म्हने जी महाराजा ॥ कनककांति तेजःपुंजा ॥
बालार्ककिरणी विजयध्वजा ॥ आम्हालागीं दिसतसे ॥८०॥
माय वो आम्हां दिसतो ऐसा ॥ कीं न पावला योनिसंभवसा अवतारदीक्षे स्वर्गवासा ॥
करील जनां वाटतसे ॥८१॥
शैली कंथा लेवूनि भूषण ॥ शिंगी सारंगी समागम ॥
कुबडी फावडी करीं कवळून ॥ उभा द्वारीं असे तो ॥८२॥
आणिक एक सच्छिंष्य त्यासी ॥ संग्रही आहे सुखसेवेसी ॥
परी तो शिष्यासमान अभ्यासी ॥ आम्हालागीं भासतसे ॥८३॥
धृति वृत्ति दीक्षेलागून ॥ ज्ञानवैराग्यस्वरुपवान ॥
आम्हालागीं समसमान ॥ गुरुशिष्य वाटती ॥८४॥
त्याचि रीतीं स्वरुप अपार ॥ तान्हुलें एक असे किशोर ॥
परी त्रिवर्ग स्वरुपसागर ॥ नक्षत्रमणी भासती
ऐसें सांगतां द्वाररक्षक ॥ मंत्रीं पाचारिला प्रत्योदक ॥
मग स्वयें घेऊनि सुखासन कटक ॥ सामोरी जातसे युवती ते ॥८६॥
कटकासवें द्वारीं येऊन ॥ वंदिती झाली मच्छिंद्रनंदन ॥
मग त्रिवर्गातें सुखासन ॥ ओपूनि नेतसे मंदिरा ॥८७॥
नेतांचि मंदिरा राजभुवनी ॥ भावें बैसविला कनकासनीं ॥
षोडशोपचारें पुजूनि मुनी ॥ नम्रवाणी गौरविलें ॥८८॥
हे महाराजा तपोसविता ॥ कोणीकडूनि येणें झालें आतां ॥
आम्हां आळशावरी सरिता ॥ प्रेमांबु लोटतसे ॥८९॥
कीं दरिद्र्याचें द्रव्यहरण ॥ करुं मांदुस धांवली आपण ॥
कीं चित्ता बोधी अंतःकरण ॥ बुडतां धांवे चिंतामणी ॥९०॥
कीं मृत्युसमयीं हस्तपादास ॥ ओढितां परम दुःखक्लेशास ॥
तें पाहूनियां अमरपीयूष ॥ धांव घेत कृपेनें ॥९१॥
कीं तृषासंकटीं प्राण ॥ तों गंगाओघ आला धांवून ॥
कीं क्षुधें पेटला जठाराग्न ॥ पयोब्धी तों पातला ॥९२॥
तन्न्यायें अभाग्य भागीं ॥ येथें पातलेत तुम्ही जोगी ॥
परी कोणाच्या वचनप्रसंगीं ॥ आम्हां दर्शंवा महाराजा ॥९३॥
येरी म्हणें वो माते ऐक ॥ उपरिचरवसू माझा जनक ॥
मच्छदेही देहादिक ॥ आम्हांलागी मिरवतसे ॥९४॥
यापरी श्रीगुरुज्ञानदृष्टी ॥ तो अनुसूयासुत शुक्तिकेपोटी ॥
तेणें कवळूनि मौळी मुष्टीं ॥ वरदपात्रीं मिरवला ॥९५॥
मज अनुग्रह प्राप्त झाला ॥ त्यावरी श्रीजालिंदराला ॥
प्राप्त होऊनि वैराग्याला ॥ भूषवीतसे जननीय ॥९६॥
धाकटा बंधु गुरुभक्त ॥ मज विराजला जालिन्दरनाथ ॥
परी या ग्रामीं पापी अवस्थेंत ॥ पावला हें ऐकिलें ॥९७॥
म्हणूनि उग्रता धरुनि पोटीं ॥ लंधीत आलों महीपाठीं ॥
परी उत्तम संग्रह ग्रामजेठी ॥ समस्तांनी सांगितले ॥९८॥
तेणें करुनि कोप कंदर्प ॥ झाला जननी सर्व लोप ॥
तरी तूं धान्य ज्ञानदीप ॥ महीवरी अससी वो ॥९९॥
आपुल्या हितासी गृहीं आणून ॥ शेवटीं परम प्राज्ञेकरुन ॥
तुवां मिळविला स्वानंदघन ॥ धन्य धन्य अससी तूं ॥१००॥
धन्य धन्य मही ऐक ॥ निवटूनि पूर्वजपातक दोंदिक ॥
सनाथपणाची घेऊनि भीक ॥ स्वर्गवासा मिरविशी ॥ ॥१॥
तरी तारक लोकां बेचाळीसां ॥ कुळा झालीस भवाब्धिरसा ॥
कीं भगीरथभूष पितृउद्देशा ॥ मिरवलासे त्रिभुवनीं ॥२॥
कीं विनतेचें दास्यपण ॥ गरुडें सांठविलें पीयूष देऊन ॥
तेवीं तूं कुळांत सकळांकारण ॥ तारक झालीस सर्व काळीं ॥३॥
ऐसें नाथ बोलतां युक्तीं ॥ चरणीं माथा ठेवी सती ॥
म्हणे महाराजा कृपामूर्ती ॥ सदैव केलें तुम्हींच ॥४॥
तुमच्या दृष्टीच्या सहज झळकू ॥ कृपापात्र वरिला मशकू ॥
मम प्रज्ञे मोहशठकू ॥ मिरवला हे महाराजा ॥५॥
अहा तुमचे पडिपाडें ॥ न येती कल्पतरु झाडें ॥
परीस वासनेसमान कोडे ॥ बरें वाईंट मिरवतसे ॥६॥
तैसी तुमची नव्हे स्थिती ॥ साधक कल्याण मिरवी मती ॥
कीं परीस देतां समानगती ॥ बरे वाईट मिरवतसे ॥७॥
परीस लोहाचे करी कनक ॥ परी स्वदीक्षेची न तुटे भीक ॥
तेवीं तुम्हीं नोहेत साधक ॥ आपुलेसमान करितां कीं ॥८॥
ऐशी उद्धारपूर्ण कोटी ॥ तुम्ही मिरवतां महीपाठीं ॥
उदार तरी समता होटीं ॥ मेघ अपूरा वाटतसे ॥९॥
मेघ उदार म्हणती लोक ॥ परी तो अपूरा ओसरे उदक ॥
तस्मात् तुमचें औदार्य दोंदिक ॥ समतापदासी मिरवेना ॥१०॥
तरी तुमची वर्णिता स्तुती ॥ अपूर्ण असे माझी मती ॥
ऐसें म्हणोनि मैनावती ॥ चरणीं माथा ठेवीतसे ॥११॥
मग आसन वसन भूषणासहित ॥ अन्नपानादि अन्य पदार्थ ॥
सिद्ध करुनि मनोरथ ॥ तुष्ट करीत नाथासी ॥१२॥
तीन रात्री वस्ती करुन ॥ सर्त्रा आशीर्वाद देऊन ॥
मग निघता झाला मच्छिंद्रनंदन ॥ गोरक्षनाथादिकरुनियां ॥१३॥
सकळ कटकासहित ॥ बाळवों निघाला चंद्रमुक्त ॥
मैनावती आणि ग्रामस्थ ॥ एक कोस बोळविती ॥१४॥
सकळी चरणावरी ठेवूनि माथा ॥ परतते झाले बोळवोनि नाथा ॥
मग आपुले सदनीं येऊनि तत्त्वतां ॥ धन्य नाथ म्हणतात ॥१५॥
येरीकडे मच्छिंद्रनाथ ॥ त्रिवर्गादि गमन करीत ॥
ग्रामोग्राम मुक्काम साधीत ॥ जगन्नाथीं पातलें ॥१६॥
तेथें करुनि उदधिस्नान ॥ जगन्नाथाचें घेऊनि दर्शन ॥
तीन रात्रीं तेथें राहून ॥ तीर्थविधि सारिला तो ॥१७॥
तेथूनि निघोनि पुनः मार्गी ॥ गमन करीत मग योगी ॥
तों सौराष्ट्रग्राममुक्कामप्रसंगी ॥ जाऊनि तेथें राहिले ॥१८॥
रात्र क्रमोनि जैसी तैसी ॥ दुसरे दिनीं मित्रोदयासी ॥
गोरक्ष सांवरोनि भिक्षाझोळासी ॥ भिक्षेलागीं प्रवर्तला ॥१९॥
भिक्षा मागोनि सदनोसदनीं ॥ परम श्रमोनि आला सदनीं ॥
तों येरीकडे शिबिरस्थानीं ॥ शयनीं असे मीननाथ ॥१२०॥
तो मच्छिंद्रनाथानें उठवोन ॥ बैसविला शौचाकारण ॥
तों ते संधींत भिक्षा मागोन ॥ गोरक्षनाथ पातला ॥२१॥
ग्रामांत हिंडतां सदनोसदनीं ॥ श्रमे विटलासे मनीं ॥
तो येतांचि स्थानीं श्रमोनी ॥ मच्छिंद्रनाथ बोलतसे ॥२२॥P>
म्हणे गोरक्षा मीननाथ ॥ शौचास बैसविला आहे गल्लींत ॥
तरी तूं त्या तें प्रक्षाळूनि त्वरित ॥ घेऊनि येई पाडसा ॥२३॥P>
ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ ॥ भिक्षाझोळी ठेवूनि तेथ ॥
लक्षूनि पातला मीननाथ ॥ गल्लीमाजी जाऊनियां ॥२४॥
तो मीननाथ परम अज्ञान ॥ हस्तपाद भरले विष्ठेनें ॥
अंगव्यक्त गोरक्ष विष्ठा पाहोन ॥ परम चित्ती विटलासे ॥२५॥
मनांत म्हणे मच्छिंद्रासी ॥ कीं परम असे विवसी ॥
विषय उपद्रव संन्याशासी ॥ व्यर्थ कासया पाहिजे ॥२६॥
कीं ----- भाराविण बोडकी ॥ कुंकूंखटाटोप हुडकी ॥
तेवीं मच्छिंद्रमनीं उपद्रव शेखीं ॥ काय आज ---- ॥२७॥
जन्मांधासी अवनीं ॥ तोचि संभार रक्षी कानीं ॥
निगडी मनुष्या षड्रसान्नीं खटाटोप कासया ॥२८॥
कीं परम भ्याड सोडी सदन ॥ शस्त्रसंभारापरी संगोपन ॥
ज्याचें काय आसन वसन ॥ त्या वस्त्रभूषण कासया ॥२९॥
कीं रानींचें रानसावज उन्मत्त ॥ द्रव्य देऊनि त्या करावें शांत ॥
तेवीं निस्पृहताविषय अत्यंत ॥ गोड कांहींच वाटेना ॥१३०॥
ऐसें बोलूनि गौरनंदन ॥ मीननाथ तें करीं कवळून ॥
दृष्ट करी मच्छिंद्राकारणें ॥ उचलोनिया तेधवां ॥३१॥
विष्ठेव्यक्त मीननाथ ॥ पाहोनि मच्छिंद्र बोलत ॥
म्हणे गोरक्षा सरितेआंत ॥ धुवोनि आणि बाळका ॥३२॥
अवश्य म्हणोनि गोरक्षनाथ ॥ तैसाचि उठोनि सरिते जात ॥
संचार करितां सरितेंत ॥ तों उत्तम खडक देखिला ॥३३॥
देखिलें परी एकांतस्थान ॥ मनांत म्हणे न्यावें धूवोन ॥
परी अंतर्बाह्य मळी निवटवून ॥ नाथालागीं दाखवूं
ऐसें विचारुनि चित्तांत ॥ पदी धरिला मीननाथ ॥
खडकावरी आपटोनि त्वरित ॥ गतप्राण पैं केला ॥३४। ।
सरिते उदक असे अपार ॥ त्यांत प्रवेशते झालें रुधिर ॥
तें सर्व अपार जळचर ॥ भक्ष्य म्हणोनि धावले ॥३६॥
मच्छ मगरी कबंधदेही ॥ मग तळपती त्या प्रवाहीं ॥
तैं अपार जळचरें पाहूनि डोहीं ॥ मनांत म्हणतसे गोरक्ष ॥३७॥
म्हणे जीवें गेला मीननाथ ॥ तरी याचें घालों सदावर्त ॥
एक जीवावरी तृप्त होत ॥ आहेत जीव सकळ हे ॥३८॥
ऐसा विचार करुनि मनीं ॥ त्वचा घेतली काढुनि ॥
रतिरति मांस तुकडे करोनी ॥ जळचरांतें ओपीतसे ॥३९॥
उरल्या अस्थी त्या जळांत ॥ टाकूनि तेथूनि उठला नाथ ॥
परी त्या जळा नसे अंत ॥ अस्थी तळीं व्यक्त जाहूल्याती ॥१४०॥
ऐसे करिता गौरनंदन ॥ मांस तें सकळ गेलें आटून ॥
मांस सरल्या आतडें पूर्ण ॥ जळचरांतें भक्षविलें ॥४१॥
एक त्वचेरहित भाग ॥ कांहीं न ठेवी वरतें अव्यंग ॥
खडकीं पवित्र करुनि चांग ॥ त्वचा घेऊन चालला ॥४२॥
चालला परी तो सदनीं ॥ शिबिरीं नसे मच्छिंद्रमुनी ॥
शांभवीअर्था बाजारभुवनीं ॥ संचारलासे महाराजा ॥४३॥
तो येतांचि तेथें मच्छिंद्रनाथ ॥ मग तान्हा पसरी प्रावणी त्वचेत ॥
मित्ररश्मि पाहोनि वात ॥ सुकावया घातलें ॥४४॥
तों येरीकडे मच्छिंद्रनंदन ॥ शांभवी आलासे घेऊन ॥
कंदा कुत्का सिद्ध करुन ॥ असनावरी बैसला ॥४५॥
बैसला परी गोरक्षातें ॥ म्हणे बा रे कोठें मीननाथ ॥
येरी म्हणे धुवोनि त्यातें ॥ स्वच्छ आणिलें महाराजा ॥४६॥
मच्छिंद्र म्हणे आणिलें परी ॥ कोठें ठेविला न दिसे नेत्रीं ॥
येरी म्हणे तान्हा प्रावरीं ॥ सुकूं घातला महाराजा ॥४७॥
म्हणे मच्छिंद्र काय बोलसी ॥ घातला सुकूं ऐसें म्हणसी ॥
येरी म्हणे कीं असत्य तुम्हांसी ॥ भाषण माझें वाटतसे ॥४८॥
तरी बाहेर शीघ्र येवोन ॥ स्वचक्षूनें पहावा विलोकून ॥
ऐसें बोलता मच्छिंद्रनंदन ॥ तेचि क्षणीं बाहेर येतसे ॥४९॥
म्हणे कोठें रे मीननाथ ॥ परी पाहतां म्हणे तान्हा प्रावर्णातें ॥
न्याहाळोनि पाहतां देखे त्वचेतें ॥ मग धरणी आंग सांडीतसे ॥१५०॥
म्हणे अहा रे काय केलें ॥ बाळ माझें कैसें मारविलें ॥
अंग धरणीवरी टाकिलें ॥ वरी लोळे गडबडां ॥५१॥
अहा अहा म्हणूनी ॥ मृत्तिका उचलोनि घाली वदनीं ॥
आणि वक्षःस्थळा पिटूनी ॥ शोक करी आक्रोशें ॥५२॥
परम मोहें आरंबळत ॥ उठउठोनि त्वचा कळीत ॥
हदयीं लावूनि आठवीत ॥ बाळकाच्या गुणातें ॥५३॥
अहा तुझा मी असें जनक ॥ परम शत्रु होतो एक ॥
जननींचें तोठूनि बाळक ॥ तुज आणिलें कैसें म्यां ॥५४॥
म्हणे अहा रे मीननाथा ॥ मज सांडूनि कैसा गेलासी आतां ॥
एकटा परदेशी सोडूनि तत्त्वतां ॥ मार्ग मिळाला तुज केवीं ॥५५॥
आतां तूतें कीलोतळा ॥ कोठूनि पाहील मुखकमळा ॥
अहा तुझा कापिला गळा ॥ कैसा येथें आणूनी ॥५६॥
बाळका स्त्रियांचे राज्यांत ॥ भुभुःकारें पावशील मृत्यु ॥
म्हणोनि बा रे तुजसी येथें ॥ रक्षणातें आणिलें ॥५७॥
आणिलें परी तुज निश्वितीं ॥ कृत्तांत झाला गोरक्ष जती ॥
ऐसें म्हणोनि धरणीप्रती ॥ अंग टाकी घडाडून ॥५८॥
पुन्हा उठे मच्छिंद्रनंदन ॥ त्वचा हदयी धरा कवळून ॥
म्हणे बाळा तुजसमान ॥ पुत्र कैंचा मज आतां ॥५९॥
अहा बाळाचें चांगुलपण ॥ मज भासतसे जैसा मदन ॥
अहा बाळाचे उत्तम गुण ॥ कोणा अर्थी वर्ण मी ॥१६०॥
बाळा लोटलीं वर्षे तीन ॥ परी काय सांगू मंजुळ बोलणें ॥
हा ताता ऐसें म्हणोन ॥ हाक मारीत होतासी तूं ॥६१॥
बा रे तनू असतां कोवळीं ॥ परी शयनीहून उठसी उषःकाळीं ॥
माथा ठेवूनि मम पदकमळीं ॥ अहो तात ऐसें म्हणसी ॥६२॥
बा तू वसत होतासी मम शेजारीं ॥ मर्यादा रक्षीत होतांसी अंतरीं ॥
अरे कठिण वागुत्तरीं ॥ शब्द वाहिला नाहीं म्यां ॥६३॥
बा रे भोजन करितां ताटीं ॥ चतुरपणाची परम हातवटी ॥
आपुल्या पुढें ठेवूनि दृष्टि ॥ ग्रास देसी बाळका ॥६४॥
अहा रे अहा मीननाथ बाळा ॥ परमज्ञानी वाचा रसाळा ॥
लिप्त कदा नव्हेसी मळा ॥ शुद्ध मुखकमळा मिरवीसी ॥६५॥
अहा बारे चक्षुघ्राण ॥ कधीं न पाहिलें तुझें मळिण ॥
आज तुझे अंग विष्ठावेष्ठन ॥ कैसें अमंगळ जावया ॥६६॥
बा रे कधीं मजवांचून ॥ न राहसी एकांत पण ॥
आजिचे दिनीं शयनीं मज सोडून ॥ कैसा परत गेलासी ॥६७॥
बा रे माय तुझी कीलोतळा ॥ तिचा कधीं न पाहसी लळा ॥
आसनीं शयनीं मजपासूनि बाळा ॥ पैल झाला नाहीस तूं ॥६८॥
तरी ऐसें असूनि तुझें मनीं ॥ आजि मज गेलासी सोडूनी ॥
अहा एकदां येऊनि अवनीं ॥ मुख दावीं मज बाळा ॥६९॥
ऐसें म्हणोनि मच्छिंद्रनाथ ॥ हंबरडा गायीसमान फोडीत ॥
अहा माझा मीननाथ ॥ कोणीं दाखवा म्हणतसे ॥१७०॥
भूमीं लोळे अश्रु नयनीं ॥ नेत्रीं ढाळितां न समाये पाणी ॥
वक्षःस्थळादि पिटूनि अवनीं ॥ दाखवा म्हणे मीननाथ ॥७१॥
ऐसें म्हणोनि आक्रंदत ॥ ते पाहून गोरक्षनाथ ॥
मनांत म्हणे अद्यापि भ्रांत ॥ गेली नाहीं श्रीगुरुची ॥७२॥
मग पुढें गोरक्षनाथ होऊन ॥ म्हणे महाराजा कां घेतां अज्ञानपण ॥
कोण तुम्ही कोणाचा नंदन ॥ करितां रुदन त्यासाठी ॥७३॥
अहो पुरतें पाहतां कोण मेला ॥ अशाश्वताचा भार हरला ॥
शाश्वत अचळ आहे बोला ॥ कदा काळीं न मरे तो ॥७४॥
अहो तुमचा मीननाथ ॥ नामधारी असे त्यांत ॥
तो कदा न मरे योजिल्या घात ॥ आहे शाश्वत महाराजा ॥७५॥
तो कदा न मरे शस्त्रघातांनीं ॥ त्यातें न जाळी कदा वन्ही ॥
अनिळ न शोषी ना बुडवी पाणी ॥ शाश्वत चिन्ही नांदतसे ॥७६॥
ऐसें बोलता गोरक्षक ॥ परी कदा न सोडी शोक ॥
अहा अहा मीननाथ ॥ ऐसें म्हणोनि आक्रंदे ॥७७॥
ऐशिया आग्रहाचा अर्थ ॥ तें पाहूनियां गोरक्षाच्या ॥
मग संजीवनीमंत्राप्रत ॥ स्मरण करिता पैं झाला ॥७८॥
करीं कवळूनि भस्मचिमुटी ॥ संजीवनी मंत्र जपे ओठीं ॥
त्वचेप्रती सोडिता झाला मुष्टीं ॥ मीननाथ ऊउला ॥७९॥
उठतांचि मीननाथ ॥ मच्छिंद्राचे गळा पडत ॥
मच्छिंद्र पाहूनि हदयांत ॥ परम मोहें धरीतसे ॥१८०॥
चुंबन घेऊनि म्हणे बाळा ॥ कोठें गेला होतासी खेळा ॥
मज टाकूनि विनयस्थळा ॥ गमन केलें होतें कीं ॥८१॥
ऐसें म्हणोनि जैसे तैसे ॥ तोही अस्त पावला दिवस ॥
दुसरे दिनीं मीननाथास ॥ घेऊनि ते चालिले ॥८२॥
मार्गी चालतां त्रिवर्ग जाण ॥ गोरक्ष करितां झाला बोलणें ॥
हे महाराजा मच्छिंद्रनंदन ॥ चित्त द्यावें मम बोला ॥८३॥
तुमचा प्रताप पाहतां अवनीं ॥ निर्जीवा जीववाल वाटे मनीं ॥
ऐसें असूनि सुतालागुनी ॥ रुदन केलें हे काय ॥८४॥
तरी हें रुदन करावया कारण ॥ काय होतें बोला वचन ॥
ऐसे मीननाथ सहस्त्रावधीनें ॥ संजीवनीने निर्माल ॥८५॥
तरी हें आश्वर्य वाटे मनीं ॥ स्वामी पडेल शोकरुदनीं ॥
कीं चिंताहारक चिंतामणी ॥ तो चिंतेमाजी पडियेला ॥८६॥
ऐसे ऐकोनि मच्छिंद्रनाथ ॥ म्हणे तुवां मारिलें किमर्थ ॥
येरु म्हणे मोहभावार्थ ॥ तो पाहावया तुमचा ॥८७॥
तुम्ही वेराग्यशील म्हणवितां ॥ तरी माया लंघुनि व्हावें परता ॥
आशा मनिषा तृष्णा ममता ॥ लिप्त नसावी शरीरातें ॥८८॥
ऐशा परीक्षा भावनेसीं ॥ म्यां मारिलें मीननाथासी ॥
परी प्राज्ञिक तुम्ही सर्वज्ञराशी ॥ रुदन कासया केलें जी ॥८९॥
येरु म्हणे वत्सा ऐक ॥ तूं शिष्य माझा अससी एक ॥
तरी म्यांही परीक्षेंचे कौतुकें ॥ तुझें बाळा पाहिले असे ॥१९०॥
बा रे आशा तृष्णा मनिषा कामना ॥ काम क्रोध मद मत्सर वासना ॥
हे मोहमांदुसी मायासदना ॥ नांदणुकी करितात ॥९१॥
तरी तुझे ठायीं मायालेश ॥ आहे कीं नाहीं महापुरुष ॥
हे पहावया रुदनास ॥ आरंभिलें म्यां पाडसा ॥९२॥
आम्ही अलक्षरुपी पाहणें ॥ आणि विज्ञानज्ञानानें विवरणें ॥
याच कौतुकें जाणपते ॥ पाहिलें म्यां पाडसा ॥९३॥
बा रे शाश्वत अशाश्वत ॥ तुज कळलें कीं नाहीं होतों यां भ्रांतीत ॥
तयाची परीक्षा रुदननिमित्त ॥ तुझी घेतली पाडसा ॥९४॥
आतां बा रे तुझे वयसपण ॥ समूळ आजि झालें हरण ॥
पयतोयाचेनि कारण ॥ हंसपुरुष मिरविशी ॥९५॥
ऐसें बोलतां गुरुनाथ ॥ गोरक्ष चरणीं माथा ठेवीत ॥
म्हणें महाराजा तुम्ही सनाथ ॥ या देहासी पैं केलें ॥९६॥
ऐसें बोलूनि वागुत्तर ॥ पुन्हां गमती मार्गापर ॥
मुक्काममुक्कामीं ज्ञानविचार ॥ गुरुशिष्य करिताती ॥९७॥
असो यापरी करितां गमन ॥ पुढें कथा येईल वर्तून ॥
नरहरीवशीं धुंडीनंदन ॥ श्रोतियांते सागेल ॥९८॥
तरी पुढील अध्यायीं कथाराशी ॥ पुण्यषर्वत पापनाशी ॥
श्रोते स्वीकारुनि मानसीं ॥ अवधानिया बैसावें ॥९९॥
तरी नरहरिवंशीं धुंडीसुत ॥ तुमचा आहे शरणागत ॥
मालू नाम ठेविलें सत्य ॥ तो कथा सांगेल तुम्हांसी ॥२००॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥
सदा परिसोत भाविक चतुर ॥ द्वाविंशतितमाध्याय गोड हा ॥२०१॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ अध्याय ॥२२॥ ओव्या ॥२०१॥

श्री नवनाथ भक्तिसार पोथी - अध्याय २१
श्रीगणेशाय नमः
जयजयाजी जगन्नायका ॥ जगज्जनका जगत्पाळका ॥ विश्व व्यापूनि अवशेषका ॥ विश्वंभर म्हणविसी ॥१॥
जरी सकळ विद्यांचे भरणें ॥ करिसी कायावाचामनें ॥ तरी मीच काय विश्वार्तीनें ॥ उरलों असें महाराजा ॥२॥
जरी मी असें विश्वांत ॥ तरी पाळण होईल सहजस्थितींत ॥ ऐसें असोनि संकट तुम्हातें ॥ कवण्या अर्थी घालावें ॥३॥
परी मम वासनेची मळी ॥ रसनांतरी हेलावली ॥ तयाचीं सुकृत फळें जीं आलीं ॥ तीं तुज पक्क ओपीत महाराजा ॥४॥
तरी तेंही तुज योग्य भूषणस्थित ॥ मज न वाटे पंढरीनाथ ॥ परी सूक्ष्म शिकवीत भक्तां मात ॥ मोक्षगांवांत प्रणविसी ॥५॥
तरी आतां असो कैसें ॥ स्वीकारिलें बोबड्या बोलास ॥ मागिले अध्यायीं सुधारस ॥ गोरक्ष मच्छिंद्र भेटले ॥६॥
भेटले परी एकविचारीं ॥ गुरुशिष्य असती त्या धवळारी ॥ नानाविलासभोगउपचारी ॥ भोगताती सुखसोहळे ॥७॥
शैल्यराजनितंबिनी ॥ मुख्य नायिका कीलोतळा स्वामिनी ॥ मोह दर्शवी गोरक्षालागुनी ॥ स्वामिनी ॥ मोह दर्शवी गोरक्षालागुनी ॥ स्वसुताहूनि आगळा ॥८॥
आसन वसन भूषणांसहित ॥ स्वइच्छें तया उपचारीत ॥ पैल करुनि मीननाथ ॥ संगोपीत गोरक्षबाळा ॥९॥
जैसा चातकालागी घन ॥ स्वलीलें करी उदकपान ॥ कीं तान्हयाला कासें लावून ॥ पय पाजिती गौतमी ॥१०॥
पाजी परी कैशा स्थिति ॥ उभवोनि महामोहपर्वतीं ॥ वत्सासी लावोनि कांससंपत्ती ॥ शरीर चाटी तयाचें ॥११॥
त्याची नीतीं कीलोतळा ॥ संगोपीत गोरक्षबाळा ॥ भोजन घालीत अपार लळा ॥ तान्हयातें पाजीतसे ॥१२॥
भलतैसें ललितपणें ॥ श्रीगोरक्षा घाली भोजन ॥ निकट मक्षिका उडवोन ॥ निजकरें जेववीतसे ॥१३॥
नाना दावोनि चवणे ॥ अधिकाधिक करवी भोजन ॥ ऐसिये परी माउलपण ॥ नित्य नित्य वाढवी ॥१४॥
ऐसा असोनि उपचार ॥ बरें न मानी गोरक्ष अंतरें ॥ चित्तीं म्हणे पडतो विसर ॥ योगधर्माविचाराचा ॥१५॥
ऐसें चिंतीत मनें ॥ मग भोग तो रोगाचि जाणें ॥ जेवीं षड्रस रोगियाकारणें ॥ विषापरी वाटती ॥१६॥
मग नित्य बैठकीं बैसून ॥ एकांतस्थितीं समाधान ॥ धृति वृत्ति ऐसी वाहून ॥ करी भाषण मच्छिंद्रा ॥१७॥
हे महाराजा योगपती ॥ आपण बसता या देशाप्रती ॥ परीं हें अश्लाघ नाथपंथीं ॥ मातें योग्य दिसेना ॥१८॥
कीं पितळधातूचें तगटीं हिरा ॥ कदा शोभेना वैरागरा ॥ कीं राव घेऊनि नरोटीपात्रा ॥ भोजन करी श्लाघ्यत्वें ॥१९॥
श्रीमूर्ति चांगुळपणें ॥ महास्मशानीं करी स्थापन ॥ तैसा येथें तुमचा वास जाण ॥ दिसत आहे महाराजा ॥२०॥
पहा जी योगधर्मी ॥ तुम्ही बैसलां निःस्पृह होवोनि ॥ तेणेंकरुनि ब्रह्मांडधामीं ॥ कीर्तिध्वज उभारिला ॥२१॥
मृत्यू पाताळ एकवीस स्वर्ग ॥ व्यापिलें आहे जितुकें जग ॥ तितुकें वांच्छिती आपुला योग ॥ चरणरज सेवावया ॥२२॥
ऐसी प्रज्ञा प्रौढपणीं ॥ असोनि पडावें गर्ते अवनीं ॥ चिंताहारक चिंतामणी ॥ अजाग्रीवी शोभेना ॥२३॥
तरी पाहें कृपाळु महाराज ॥ उभारिला जो कीर्तिध्वज ॥ तो ध्रुव मिरवेल तेजःपुंज ॥ ऐसें करी महाराजा ॥२४॥
ऐसें झालिया आणिक कारण ॥ तुम्ही पूर्वीचे अहां कोण ॥ आला कवण कार्याकारण ॥ कार्याकार्य विचारा ॥२५॥
कीं पूर्वी पहा ब्रह्मस्थिती ॥ श्रीकविनारायणाची होती ॥ लोकोपकारा अवतार क्षितीं ॥ जगामाजी मिरवला ॥२६॥
आपण आचरलां तपाचरण ॥ शुभमार्गा लावावें जन ॥ धर्यपंथिका प्रज्ञावान ॥ जगामाजी मिरवावया ॥२७॥
ऐसें असतां प्रौढपण ॥ ते न आचारावे धर्म ॥ मग जगासी बोल काय म्हणवोन ॥ अर्थाअर्थी ठेवावे ॥२८॥
जात्या वरमाया आळशीण ॥ मम काय पहावी वर्हाडीण ॥ राव तस्कर मग प्रजाजनें ॥ कोणे घरी रिघावें ॥२९॥
कीं अर्कचि ग्रासिला महातिमिरीं ॥ मग रश्मी वांचती कोणेपरी ॥ उडुगणपती तेजविकारी ॥ जात्या होती तेवीं तारागणें ॥३०॥
तेवीं तुम्ही दुष्कृत आचरतां ॥ लोकही आचरती तुम्हांदेखतां ॥ अवतारदीक्षेलागीं माथां ॥ दोष होईल जाणिजे ॥३१॥
तरी आधींच असावें सावधान ॥ अर्थाअर्थी संग वर्जून ॥ अंग लिप्त मलाकारणें ॥ तिळतुल्यही नसावें ॥३२॥
नसतां ओशाळ कोणापाठीं ॥ कळिकाळातें मारूं काठी ॥ निर्भयपणें महीपाठीं ॥ सर्वां वंद्य होऊं कीं ॥३३॥
तरी महाराजा ऐकें वचन ॥ सकळ वैभव त्यजून ॥ निःसंग व्हावें संगेंकरुन ॥ दुःखसरिता तरवी ॥३४॥
प्रथमचि दुःखकारण ॥ विषयहस्तें बीज रजोगुण ॥ रजा अंकुर येत तरतरोन ॥ क्रोधपात्रीं हेलावे ॥३५॥
मग क्रोधयंत्रीं तृतीयसंधी ॥ मदकुसुमें क्रियानिधी ॥ मदकुसुमांचे संधीं ॥ मत्सरगंध हेलावे ॥३६॥
गंधकुसुमें ऐक्यता ॥ होतांचि दैवे विषयफळता ॥ मग विषयफळीं अपार महिमता ॥ मोहर शोभें वेष्टीतसे ॥३७॥
मग वेष्टिलिया मोहर अंतीं ॥ दैवें फळें पक्कपणा येती ॥ मग तीं भक्षितां दुःखव्यावृत्तीं ॥ यमपुरी भोगावी ॥३८॥
मग तें शिवहळाहळाहूनि अधिक ॥ कीं महा उरगमुखींचे विख ॥ मग प्राणहारक नव्हे सुख ॥ दुःखाचे परी सोशीतसे ॥३९॥
मग दुःखाचिये उपाधी ॥ शोधीत फिराव्या ज्ञानऔषधी ॥ तरी प्रथम पाऊल कृपानिधी ॥ भिवोनियां ठेवावें ॥४०॥
तरी आतां योगद्रुमा ॥ चित्तीं निवटोनि विषयश्रमा ॥ सावधपणें योगक्षेमा ॥ चिंता मनीं विसरावी ॥४१॥
ऐसी विज्ञापना युक्तिप्रयुक्तीं ॥ करुनि तोषविला मच्छिंद्रयती ॥ तंव निवटूनि विषयभ्रांती ॥ विरक्तता उदेली ॥४२॥
मग म्हणे वो गोरक्षनाथा ॥ तूं जें बोललासी तें यथार्था ॥ निकें न पाहती अशा वृत्ता ॥ भ्रष्टदैवा दिसेना ॥४३॥
तरी आतां असो कैसें ॥ जाऊं पाहूं आपुला देश ॥ ऐसें म्हणोनि करतळभाष ॥ गोरक्षकातें दीधली ॥४४॥
कीं गंगाजळनिर्मळपण ॥ परी महीचे व्यक्तकरोन ॥ गढूळपणें पात्र भरुन ॥ समुद्रातें हेलावे ॥४५॥
भाक देऊनि समाधान ॥ चित्तीं मिरवी गोरक्षनंदन ॥ मग गुरुशिष्य तेथूनि उठोन ॥ पाकशाळे पातले ॥४६॥
पाकशाळे करुनि भोजन ॥ करिते झाले उभयतां शयन ॥ कीलोतळामेळें मच्छिंद्रनंदन ॥ शयनीं सुगम पैं झाले ॥४७॥
झाले परी मच्छिंद्रनाथ ॥ कीलोतळेतें सांगे वृत्तांत ॥ म्हणे मातें गोरक्षनाथ ॥ घेऊनि जातो शुभानने ॥४८॥
जातो परी तव मोहिनी ॥ घोटपळीत माझे प्राणांलागुनी ॥ त्यातें उपाय न दिसे कामिनी ॥ काय आतां करावें ॥४९॥
येरी म्हणे तुम्ही न जातां ॥ कैसा नेईल कवणे अर्थी ॥ मच्छिंद्र म्हणे मज सर्वथा ॥ वचनामाजी गोंविले ॥५०॥
विरक्तपणाच्या सांगोनि गोष्टी ॥ वैराग्य उपजविलें माझे पोटीं ॥ तया भापे संतुष्टदृष्टी ॥ वचनामाजी गुंतलों ॥५१॥
तरी आतां काय उपाय ॥ सरला सर्वस्वी करुं काय ॥ तुझा देखोनि विनय ॥ जीव होय कासाविस ॥५२॥
तरी आतां ऐक वचनीं ॥ उपाय आहे नितंबिनी ॥ तुवांचि त्यातें घ्यावें मोहोनी ॥ बहुधा अर्थीकरोनियां ॥५३॥
येरी म्हणे जी प्राणनाथ ॥ म्यां उभविला उपायपर्वत ॥ परी तो न रोधी वज्रवंत ॥ विरक्तीतें मिरवी तो ॥५४॥
ऐसें असतां त्या प्रवाहीं ॥ उपाय मोहाचा चालत नाहीं ॥ मच्छिंद्र म्हणे करुनि पाहीं ॥ यत्न आणिक पुढारां ॥५५॥
ऐसें भाषण करितां उभयतां ॥ निशा लोटली सर्वही असतां ॥ उपाय मोहाचा चिंतन करितां ॥ गोरक्ष येऊनि बोलतसे ॥५६॥
म्हणे माय वो ऐक वचन ॥ मज करुं वाटतें तीर्थाटन ॥ तरी मच्छिंद्रनाथा सवें घेऊन ॥ तीर्था आम्ही जातसों ॥५७॥
येरी म्हणे वत्सा ऐक ॥ तूं ज्येष्ठ सुत माझा एक ॥ तूं वरिष्ठ अलोलिक ॥ मम मनीं ठसलासी ॥५८॥
कीं स्त्रिया राज्यसंपत्ती ॥ त्यांत तूं शोभसी नृपती ॥ आणि धाकटा बंधु धरुनि हातीं ॥ शत्रु जिंकशील वाटतसे ॥५९॥
तरी तूं सकळ राज्याचा धीर ॥ आम्ही उगलेंचि सुख घेणार ॥ अन्नवस्त्राचा अंगीकार ॥ करुनि असों तव सदनीं ॥६०॥
बा रे नाथाचा वृद्धापकाळ ॥ दिवसेंदिवस वाढतसे सबळ ॥ तैसें माझें शरीर विकळ ॥ दिवसेंदिवस होईल कीं ॥६१॥
मग आम्हां वृद्धांचें दीनपण ॥ हरील बा कोण तुझ्याविण ॥ आणि धाकट्या बंधूचें संगोपन ॥ कोण करील तुजवांचुनी ॥६२॥
बाळा तुजवांचूनि मनाचें कोड ॥ कोण पुरवील तूं गेल्या पुढें ॥ मायेवांचूनि न ये रडे ॥ संगोपिता तूं अससी ॥६३॥
बा देवा रे आमुचा सकळ तिलक ॥ तूं अससी राजनायक ॥ तूं गेलिया आम्हीं भीक ॥ घरोघरीं मागावी ॥६४॥
तरी ऐसें विपत्तिकोडे ॥ मज न दाखवी दृष्टीपुढें ॥ तरी मज योजूनि विहीरआडें ॥ लोटूनि मग जाई पां ॥६५॥
ऐशा बोलतां रसाळ युक्ती ॥ परी न मोहे गोरक्ष चित्तीं ॥ जैसें मेघसिंचन झालिया पर्वतीं ॥ अचळ भंगावीण तो ॥६६॥
ऐसें कीलोतळेचें ऐकूनि वचन ॥ म्हणे माय तूं करिसी सत्य भाषण ॥ परी काय गे तूतें बोलून ॥ वैभव माझें दाखवावें ॥६७॥
तिहीं लोकीं गे चार खुंट ॥ आमुचे असे गे राज्यपट ॥ तूतें बोलाया अधिक वरिष्ठ ॥ काय स्त्रियांचें राज्य हें ॥६८॥
तरी माय वो आतां कैसें ॥ आम्ही जातों तीर्थावळीस ॥ तुम्ही स्वस्थ असूनि ग्रामास ॥ संपत्ती भोगा आपुली ॥६९॥
आम्हांसी काय संपत्ति कारण ॥ आमुची संपत्ति योगधारण ॥ सुकृतक्रियाआचरण ॥ सुखसंपन्न भोगावें ॥७०॥
ऐसें निकट बोलूनि तीतें ॥ म्हणे आज्ञा द्यावी जी आमुतें ॥ येरी म्हणे जी ऐक मातें ॥ मम हेतू जाऊं नये ॥७१॥
चित्तीं विचारी कीलोतळा ॥ परम दक्षतेनें या बाळा ॥ उपरी दाराविषय घालोनि गळां ॥ यत्नेंकरुनि अडकावूं ॥७२॥
हें योजूनि म्हणे जाणें तीर्थासी ॥ तरी ऐक बा अटक घालूं तुजसी ॥ इतुका संवत्सर मजपासीं ॥ वस्ती करुनि असावें ॥७३॥
येरी म्हणे एक मातें ॥ षण्मास लोटले मज येथें ॥ आतां न राहे माते कल्पांतें ॥ तीर्थावळी जाणें कीं ॥७४॥
याउपरी बोले कीलोतळा ॥ षण्मास तरी संगती द्यावी मला ॥ थोडकियासाठीं उतावेळा ॥ होऊं नको मम वत्सा ॥७५॥
मग मी समाधानेंकरुन ॥ श्रीनाथ तुजसवें देऊन ॥ तीर्थावळीतें बोळवीन ॥ समारंभ पाडसा ॥७६॥<
ऐसे बोलतां बोल रसाळ ॥ विवेकी ज्ञानतपोबाळ ॥ षण्मास वस्ती करुं सदनीं ॥ परी अमुक दिन निश्वय करोनी ॥ ठेवीं आम्हां जावया ॥७८॥
तो दिवस आलियापाठीं ॥ आम्ही न वसूं महीतळवटीं ॥ मग यत्न केलिया तुम्हीं कोटी ॥ फाल माते होतील ॥७९॥
तरी आतां कोणता दिन ॥ दावी माते निश्चयेंकरुन ॥ येरी म्हणे प्रतिपदकारण ॥ बोळवीन तुम्हांसी ॥८०॥
मुहूर्त संवत्सरप्रतिपदेस ॥ मग न पुसतां कोणास ॥ तया दिनीं गमन तुम्हांस ॥ भोजन झालिया करवीन ॥८१॥
ऐसा निश्चय मैनाकिनी ॥ बोलूनि स्थिर केला भुवनी ॥ पुढें कांहींएक दिवसांलागुनी ॥ गोरक्षातें पाचारी ॥८२॥
निकट बैसवूनि आपुलेजवळी ॥ अति स्नेहानें मुख कवळी ॥ म्हणे बा रे कामना मम हदयकमळीं ॥ वेधली असे एक ॥८३॥
कामना म्हणशील तरी कोण ॥ स्नुषा असावी मजकारण ॥ तरी उत्तम दारा तुज निपुण ॥ करुं ऐसें वाटतें ॥८४॥
मग मी बाळा स्नुषेसहित ॥ काळ क्रमीत बैसेन येथ ॥ तों तुम्हीं करुनि यावें तीर्थ ॥ आपुलें राज्य सेवाया ॥८५॥
षण्मास बाळा येथें अससी ॥ अंगीकारीं मुख्य संबंधासी ॥ अंगीकारिलिया तव मानसीं ॥ मोह माझा उपजेल ॥८६॥
म्हणशील तरी विधिपूर्वक ॥ लग्न तुझें करीन निक ॥ परी मम चित्ताचे काम दोंदिक ॥ फेडशी इतुकें पाडसा ॥८७॥
गोरक्ष ऐसे बोल ऐकूनी ॥ म्हणतसे ऐका मम जननी ॥ म्यां काता दोन गुरुकृपेनी ॥ वरिल्या आहेत जननीये ॥८८॥
वरिल्या आहेत तरी चांग ॥ नित्य भोगितों करुनि योग ॥ म्हणशील कवण नामीं सांग ॥ तरी कर्णमुद्रिका म्हणती त्यां ॥८९॥
तया कांतालागीं सोडून ॥ अन्य कांता न वरी व्यभिचारीण ॥ हें योग्य नव्हे मजकारण ॥ गुरुभक्ती जननीये ॥९०॥
ऐसें बोलतां गोरक्षनाथ ॥ कीलोतळा बैसली स्वस्थचित्त ॥ म्हणे नाथ हा विरक्त ॥ कदा नातळे विशयांतें ॥९१॥
यापरी लोटलिया त्या दिवशीं ॥ आणिका एके दिनीं परदेशीं ॥ एक शैली उत्तमराशी ॥ सेवेलागीं पाठविली ॥९२॥
भोजन झालिया रात्रीं निर्भर ॥ शैली संचरली तें मंदिर ॥ अत्युत्तम सारीपाट करें ॥ कवळोनियां पातली ॥९३॥
सदनीं संचरतां बोले वचन ॥ म्हणे हे गोरक्षनंदन ॥ मी सारीपाट करीं कवळून ॥ खेळावया आणिला कीं ॥९४॥
तरी खेळ खेळूं एकटभावें ॥ ऐसें उदेलें माझिया जीवें ॥ येरु म्हणे अवश्य यावें ॥ पूर्ण कामना करावया ॥९५॥
ऐसें म्हणतां नितंबिनी ॥ सारीपाट पसरुनि निकट येऊनी ॥ परी द्यूत खेळतां शुभाननी ॥ नेत्रबाण खोंचीतसे ॥९६॥
खोंचीत परी विषयपर ॥ बोल बोलत अनिवार ॥ बोल नव्हे तें महावज्र ॥ तपपर्वत मंगावया ॥९७॥
ऐसे बोलत आणिक कर्णी ॥ दाखवितसे नितंबिनी ॥ मौळीचा चीरपदर काढूनी ॥ भूमीवरी सोडीतसे ॥९८॥
श्रृंगारव्यक्त नेत्रकटाक्ष ॥ तुकवोनि खेळ खेळे गोरक्ष ॥ खेळ खेळतां मग प्रत्यक्ष ॥ जाणूनि चीर सरसावी ॥९९॥
उघडी एकचि जानू करुन ॥ दावी आपुलें नग्नपण ॥ परी तो विरक्त गौरनंदन ॥ विषयातें आतळेना ॥१००॥
मग नाना संवाद नाना स्तुती ॥ दावितां ती श्रमली युवती ॥ परी हा विरक्त कोणे अर्थी ॥ आतळेना तियेते ॥१॥
मग ती आपुले चित्तीं श्रमोन ॥ राहती झाली दीनवदन ॥ कीलोतळेतें वर्तमान ॥ सर्व सांगूनि गेलीसे ॥२॥
यावरी कीलोतळा संपत्तीसी ॥ गोरक्षा दावी भलते मिसीं ॥ रत्नमुक्तमाणिकराशी ॥ श्रृंगारादि अचाट ॥३॥
परी दावूनि सहजस्थित ॥ म्हणे वत्सा हें तुझेंचि वित्त ॥ चंद्रसूर्यअवधीपर्यंत ॥ भोगिसील पाडसा ॥४॥
ऐसें कीलोतळा ॥ परी हा न मळे आशामळा ॥ जेवीं मुक्ता लिंपिलिया काजळा ॥ श्वेतवर्ण सांडीना ॥५॥
ऐशा युक्तिप्रयुक्ती करितां ॥ निकट वृत्ति आली तत्त्वतां ॥ मग कीलोतळेच्या मोहे चित्ता ॥ नित्य हुंबाडा येतसे ॥६॥
मीननाथ जवळ घेऊन ॥ नेत्रीं लोटलें अपार जीवन ॥ ती आणि शैल्या सेवकी पाहून ॥ दुःखी होती तैशाचि ॥७॥
मग त्या म्हणती वो माय स्वामिनी ॥ आम्ही युवती ॥ कीलोतळेसी समजाविती ॥ ऐसें बोलतां दिनव्यावृत्ती ॥ प्रतिपदा आली असे ॥९॥
मग त्या दिवशी आनंदमहिमा ॥ गुढ्या उभारिल्या ग्रामोग्रामा ॥ परी श्रृंगाररुप प्रवाहोत्तमा ॥ मच्छिंद्रयोगी बुडाले ॥११०॥
ैचा आनंद कैंची पाकनिष्पत्ती ॥ कैंची गुढी शोकव्यावृत्ती ॥ सकळ ग्रामीं शैल्या युवती ॥ मच्छिंद्रयोगें हळहळल्या ॥११॥
एक म्हणती हा नाथ ॥ राज्यप्रकरणी प्रतापवंत ॥ उदार धैर्यपर्वत ॥ दयाळ आगळा मायेहुनी ॥१२॥
एक म्हणती चागुलपणा ॥ यापुढें उणीव वाटे मदना ॥ कनकारनीं सभास्थाना ॥ अर्कासमान वाटतसे ॥१३॥
एक म्हणती ऐसा पुरुष ॥ दैवें लाधला होता आम्हांस ॥ गोरक्ष विवसी आली त्यास ॥ घेऊनि मेला जातसे ॥१४॥
ऐशापरी बहुधा युक्तीं ॥ गोरक्षातें शिव्या देती ॥ अहो मच्छिंद्रअर्काप्रती ॥ राहुग्रह हा भेटला ॥१५॥
एक म्हणती नोहे गोरक्षक ॥ आम्हां भेटला यम देख ॥ मोहपाश घालूनि प्रत्यक्ष ॥ मच्छिंद्र प्राण नेतसे ॥१६॥
हा कोणीकडोनि आला मेला ॥ कां आमुच्या देशासी आला ॥ मच्छिंद्र मांदुस घेऊन चालला ॥ बलात्कारें तस्कर हा ॥१७॥
एक म्हणती अदैव पूर्ण ॥ ऐसें लाधलें होतें स्थान ॥ त्या सुखासी लाथ मारुन ॥ जात आहे करंटा ॥१८॥
काय करील अभाग्यपण ॥ घरोघरीं भीक मागून ॥ त्या तुकड्यांचें झाले स्मरण ॥ षड्रसान्न आवडेना ॥१९॥
उत्तम चीर अन्न भूषण ॥ सांडूनि करील चिंध्या लेपन ॥ महाल माड्या नावडे सदन ॥ सेवील कानन अदैवी ॥१२०॥
ऐसे बहुधा बहुयुक्ती ॥ बोलताती त्या युवती ॥ बोलूनी वियोगें आरंबळती ॥ मच्छिंद्र मच्छिंद्र म्हणोनि ॥२१॥
ऐसेपरी सकळ ग्रामांत ॥ संचरलीसे विकळ मात ॥ येरीकडे गोरक्षनाथ ॥ कुबडी फावडी संयोगी ॥२२॥
अंगी लेवूनी कंथाभूषण ॥ माळा गळां दाट घालून ॥ सिंगी सारंगी करीं कवळून ॥ नाथापाशीं पातला ॥२३॥
चरणीं अर्पूनियां भाळ ॥ म्हणे स्वामी आली वेळ ॥ उठा वेगीं उतावेळ ॥ गमन करावया मार्गात ॥२४॥
तें पाहूनि कीलोतळा ॥ सबळ उदक आणीत डोळा ॥ म्हणे स्थिर होई कां बाळा ॥ भोजन सारिल्या जाईजे ॥२५॥
मग पाक करुनि अति निगुती ॥ गुरुशिष्य बैसवूनि एक पंक्ती ॥ वाढितां बोलती झाली युवती ॥ विचक्षण कीलोतळा ॥२६॥
म्हणे महाराज मच्छिंद्रनाथ ॥ तुम्ही जातां स्वदेशांत ॥ परी मीननाथ तुमचा सुत ॥ ठेवितां कीं संगे नेतां ॥२७॥
नाथ म्हणे वो शुभाननी ॥ जैसे भावेल तुझिये मनीं ॥ तैसीच नीति आचरुनी ॥ मीननाथ रक्षूं गे ॥२८॥
मग बोलती झाली कीलोतळा ॥ तुम्ही संगे न्यावें बाळा ॥ येथें रक्षण केऊतें बाळा ॥ भुभुःकारी होईल कीं ॥२९॥
तुम्ही होतां निकट येथें ॥ म्हणवूनि भुभुःकार न बाधी त्यातें ॥ तुम्ही गेलिया कोण येथें ॥ रक्षण करील बाळाचें ॥१३०॥
आणिक एक घेत लक्ष ॥ मातें शापिलें वसू उपरिईशे ॥ तुमचा पिता जो प्रत्यक्ष ॥ वीर्यसंघ आराधिला ॥३१॥
तयाचा विचक्षण सबळ शाप ॥ मीं सोडिलें सिंहलद्वीप ॥ त्या शापाचें पूर्ण माप ॥ भरुनि आले महाराजा ॥३२॥
तरी उःशापाचा समय आला आतां ॥ फळासी येईल तुम्ही जातां ॥ उपरिचर वसू तुमचा पिता ॥ येऊनि नेईल मजलागीं ॥३३॥
मग बाळाचें संगोपन ॥ कोण करील मायेविण ॥ यातें जरी न्यावें स्वर्गाकारण ॥ मनुष्यदेह नयेचि ॥३४॥
तरी सांगाया हेंचि कारण ॥ मीननाथ सवें नेणें ॥ मग अवश्य म्हणे मच्छिंद्रनंदन ॥ भोजन करुन उठले ॥३५॥
कीलोतळाही भोजन करुनी ॥ मेननाथाकडे पाहूनी बोल न निघे तिचे वदनीं ॥ परी हदयीं डोंब पाजळला ॥३६॥
मच्छिंद्रमोहाच्या स्नेहेंकरुनि आपार ॥ अनिवार मोहाचे वैश्वानर ॥ पेट घेता शिखेपर ॥ दुःख आकाशीं प्रगटलें ॥३७॥
मोह उचंबळोनि अत्यंत चिंता ॥ नेत्रीं लोटली अश्रुसरिता ॥ तें पाहूनियां शैल्या समस्ता ॥ गोरक्षातें वेष्टिती ॥३८॥
म्हणती गोरक्षा ऐक वचन ॥ करुं नको रे कठिण मन ॥ मच्छिंद्र आमुचा घेऊनि प्राण ॥ जाऊं नको महाराजा ॥३९॥
पहा पहा सुखसंपत्ती ॥ राज्यवैभव केवीं गती ॥ ऐशा टाकूनि स्वसुखाप्रती ॥ कानन सेवूं नको रे ॥१४०॥
महाल मुलुख तुज हस्ती ॥ अश्व फिरणें चातकगती ॥ हें सुख टाकूनि राज्यसंपत्ती ॥ कानन सेवूं नको रे ॥४१॥
महाल मुलुख तुज स्वाधीन ॥ प्रजालोकादि करिताती नमन ॥ ऐसा टाकूनि बळमान ॥ कानन सेवूं नको रे ॥४२॥
हिरे रत्नें माणिक मोतीं ॥ परम तेजसी नक्षत्रज्योती ॥ स्वीकारुनि भूषणाप्रती ॥ सुखसंपत्ती भोगावी ॥४३॥
आम्ही झालों तुमच्या दासी ॥ नित्य आचरुं सेवेसी ॥ रतिसुखासी नटूं तैसें ॥ हें सुखसंपन्न भोगी कां ॥४४॥
कला कुशला विद्या सांग ॥ सभेस्थानीं रागरंग ॥ ऐसे टाकूनि प्रेमभोग ॥ कानन सेवूं नको रे ॥४५॥
जरी जरतारी दीपती चीर ॥ परिधानीं कीं इच्छापर ॥ ऐशिया सुखा करी निर्धार ॥ कानन सेवूं नको रे ॥४६॥
जडितरत्न हेमशृंगार ॥ भूषणीक मनोहर ॥ ऐसें टाकूनि सुख मनोहर ॥ कानना जाऊं नको रे ॥४७॥
चुवा चंदन अर्गजा गंध ॥ अंगीं चर्चू आम्ही प्रसिद्ध ॥ ऐसें टाकूनि सुखवृंद ॥ कानना जाऊं नको रे ॥४८॥
कनकासनीं विराजमान ॥ दिससी जैसा सहस्त्रनयन ॥ ऐशा सुखाचा त्याग करुन ॥ कानना जाऊं नको रे ॥४९॥
द्रव्यराशी अमूप भांडार ॥ भरले असती अपरंपार ॥ किल्ले कोट टाकूनि सुंदर ॥ कानन सेवू नको रे ॥१५०॥
ऐशा सुखाची उत्तम जाती ॥ टाकूनि जासी दुःखव्यावृत्ती ॥ महीं भ्रमण काननक्षितीं ॥ दुःख अपार आहे रे ॥५१॥
शालदुशाल भूषणमाळा ॥ टाकूनि घेसी दुःख कशाला ॥ सांडूनि षड्रस अन्न विपुला ॥ कंदमूळ खाशील ॥५२॥
उंच आसन मृदु कैसें ॥ मंचकीं शय्या कुसुमकेश ॥ तें टाकूनि महीस ॥ लोळसील काननीं ॥५३॥
तरी गोरक्षा मनुष्यदेही ॥ वृत्ति आणी विवेकप्रवाही ॥ राज्यासनाचें सुख घेई ॥ सकळ मही भोगीं कां ॥५४॥
अरे या देशीं शत्रुभय ॥ अन्य राजाचें नाहीं भय ॥ ऐसें स्थान आनंदमय ॥ तरी सकळ मही भोगीं कां ॥५५॥
ऐसें बहुतांपरी उपदेशीं ॥ दाविती तया सुखासी ॥ परी विरक्त स्वचित्तेंसीं ॥ आशेलागीं आतळेना ॥५६॥
मग धिक्कारुनि सकळ युवती ॥ म्हणे आम्हां कासया व्हावी संपत्ती ॥ प्राण टाकोनि शवाहातीं ॥ तुम्हीच मिरवा जगीं हो ॥५७॥
अगे आम्हांसी वोढण शयनावसनीं ॥ वरती आकाश खालीं मेदिनी ॥ शयन करितों योगधारणीं ॥ अलक्षीं लक्ष लावूनियां ॥५८॥
ऐसी बहुतां नीतीं तयेसी वाणी ॥ म्हणे दूर लंडी गोड बंगालिणी ॥ ऐसें म्हणोनि तये अवनीं ॥ पाऊल ठेवितां पैं झाला ॥५९॥
मग किलोतळेतें करुनि नमन ॥ स्कंधीं वाहिला मच्छिंद्रनंदन ॥ श्रीमच्छिंद्र सवें घेऊन ॥ ग्रामाबाहेर पैं आला ॥१६०॥
परी कीलोतळेनें गोरक्षकासी चोरुन ॥ कनकवीट आणिली भांडारांतून ॥ मच्छिंद्रनाथाकरीं अर्पोन ॥ भस्म झोळीत टाकिली ॥६१॥
परी मच्छिंद्राच्या मोहें करुन ॥ घोंटाळीत पंचप्राण ॥ नेत्रीं अपार अश्रुजीवन ॥ मोहें नयन वर्षत ॥६२॥
मग गांवाबाहेर मैनाकिनी ॥ माथा ठेवी नाथाचे चरणीं ॥ गोरक्ष हदयीं कवळोनी ॥ निरवीतसें तयातें ॥६३॥
म्हणे वत्सा माझे नाथा ॥ घेउनि जासील अन्य देशांत ॥ परी क्षुधा तृषा जाणोनि यातें ॥ सुख देईं पाडसा ॥६४॥
बा रे अशक्त मच्छिंद्रनाथ ॥ दिधलासे तुझिया हातांत ॥ योजन अर्धयोजन महीतें ॥ सुख देई पाडसा ॥६५॥
बा रे मच्छिंद्र शांतीचा अचळू ॥ परी फारचि असे अति भुकाळू ॥ तरी मच्छिंद्राचा क्षुधानळू ॥ बाळासमान जाण रे ॥६६॥
जैसें मीननाथाचें लहानपण ॥ त्याचि रीतीं मच्छिंद्रातें मान ॥ हे उभयतां आहेत क्षीण ॥ तुझे ओटींत वाहिले ॥६७॥
यापरी तूतें सांग किती ॥ तू जेथें अससी बा सर्वज्ञमूर्ती ॥ सच्छिष्य असें तूतें म्हणती ॥ कारण भक्ती पाहोनी ॥६८॥
ऐसें वदोनि कीलोतळा ॥ मिठी घाली गोरक्षगळां ॥ म्हणे बारे तूतें वेळोवेळां ॥ निरवितें जीवीं धरी बा ॥६९॥
ऐसें म्हणोनि हंबरडा फोडीत ॥ परम अट्टहास्यें शब्द करीत ॥ म्हणे आतां कैसा नाथ ॥ निजडोळां देखेन मी ॥१७०॥
ऐसी मोहाची उभवी वार्ता ॥ तें गोरक्षक पाहोनि म्हणे चित्ता ॥ वेगें निघावें नातरी ममता ॥ मच्छिंद्रातें दाटेल ॥७१॥
मग श्रीगुरुचा धरोनि हात ॥ लगबगें चालिला गोरक्षनाथ ॥ पाउलापाउलीं दुरावत ॥ तों तों आरंबळे कीलोतळा ॥७२॥
पालथा घालोनि पर्वत ॥ अदृश्य झाले तिन्ही नाथ ॥ मग कीलोतळा मस्तक महीप्रत ॥ आपटीतसे तेघवां ॥७३॥
गायीसमान हंबरडा मारीत ॥ हस्तें वक्षःस्थळ पिटीत ॥ म्हणे आतां मच्छिंद्रनाथ ॥ दृष्टीं कैसा पडेल ॥७४॥
ऐसा मच्छिंद्र गुणी ॥ सदा शांत म्हातारपणीं ॥ दयाब्धि कृपानिधि पूर्ण ॥ कोठें पाहूं मच्छिंद्रा ॥७५॥
म्हणे बाई गे शचीनाथ ॥ तैसा आपणांमाजी मिरवत ॥ ऐसा स्वामी दयावंत ॥ कोठें पाहूं निजदृष्टीं ॥७६॥
अहा मज कृपणाचें धन ॥ गोरक्षतस्करें नेलें चोरुन ॥ आतां नाथें कठीण मन ॥ कैसें केलें मजविषयीं ॥७७॥
आहा मज वत्साचें अब्धिजीवन ॥ गोरक्षघन गेला गिळोन ॥ कीं मज अंधाची काठी हिरोन ॥ गोरक्षक निर्दयें नेली गे ॥७८॥
आतां आवोनि मंदिरांत ॥ काय कोठें पाहों नाथ ॥ दाही दिशा ओस मातें ॥ वाटताती साजणी ॥७९॥
सभेस्थानीं कनकासनीं ॥ जेवीं बैसला दिसे तरणी ॥ आतां तें आसन वसन पाहोनी ॥ पाठी लागेल गे माये ॥१८०॥
अगे राजवैभव सकळ भार ॥ मातें वाटतें ओस नगर ॥ आतां माझा नाथ मच्छिंद्र ॥ कैं पाहीन निजदृष्टीं ॥८१॥
ऐसा हा मच्छिंद्रपुरुष ॥ कोठें हिंडतां न देखों देश ॥ अति स्नेहाळू माया विशेष ॥ मायेहूनि पाळीतसे ॥८२॥
बाई गे बाई निजतां शयनीं ॥ काय सांगू तयाची करणी ॥ तीन वेळां मज उठवोनी ॥ तान्हेलीस म्हणते ॥८३॥
मग आपुले करीं उदकझारी ॥ लावी माझिये मुखपात्रीं ॥ उदक पाजोनि कृपागात्रीं ॥ जठर माझें चापीतसे ॥८४॥
रिक्त जठर लागतां त्यातें ॥ म्हणे अससी क्षुधाक्रांत ॥ मग पाचारोनि परिचारिकेतें ॥ बळेंचि भोजन घालीतसे ॥८५॥
ऐशिया मोहाची दयाकोटी ॥ वागवीत होता आपुले पोटीं ॥ अति निर्दय होवोनि शेवटी ॥ कैसा सोडोनि पैं गेला ॥८६॥
ऐसें बोलोनि वागुत्तर ॥ मस्तक आपटिलें महीवर ॥ मुखीं मृत्तिका वारंवार ॥ घालोनि हंबरडा फोडीतसे ॥८७॥
ऐशिया दुःखाची सबळ कहाणी ॥ उपरिचरवसूच्या पडली कानीं ॥ मग तो विमानीं बैसोनी ॥ तियेपाशीं पातला ॥८८॥
विमान ठेवोनि तये अवनीं ॥ निकट पातला कृपेंकरुनी ॥ निकट येता धरिला पाणी ॥ म्हणे पापिणी हें काय ॥८९॥
तूं स्वर्गवासिनि शुभाननी ॥ येथें आलीस शापेंकरुनीं ॥ तें शापमोचन गे येथोनि ॥ झालें आहे सुख मानी कां ॥१९०॥
मग करें कुरवाळोनि कीलोतळा ॥ धरिता झाला हदयकमळा ॥ अश्रु डोळां पुसोनि ते वेळां ॥ सदनामाजी आणीतसे ॥९१॥
सदना आणूनि ते युवती ॥ बोधिता झाला नाना युक्तीं ॥ तो बोध असे भक्तिसार ग्रंथीं ॥ पुढले अध्यायीं ऐकावा ॥९२॥
भक्तिसार उत्तम ग्रंथ ॥ ऐकतां होय पुण्यवंत ॥ तरी श्रोते देऊनि चित्त ॥ ग्रंथ आदरें ऐकावा ॥९३॥
नरहरिवंशी धुंडीसुत ॥ अनन्य तुम्हां शरणागत ॥ मालू ऐसें नाम देहातें ॥ संतकृपेनें व्यापिलें ॥९४॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ग्रंथ ॥ स्वयें बोलिला पंढरीनाथ ॥ सदा संतसज्जन परिसोत ॥ ईश्वरीकृपेंकरोनियां ॥९५॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ॥ सदा परिसोत भाविक चतुर ॥ एकविंशतितमाध्याय गोड हा ॥१९६॥
श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु अध्याय ॥२१॥ ओव्या ॥१९६॥
॥ नवनाथभक्तिसार एकविंशतितमाध्याय समाप्त ॥
सदस्यता लें
संदेश (Atom)