शनिवार, 17 जनवरी 2009

गुरु स्तोत्र

गुरु गुनालाया परा परा धी नाथ सुन्दरा, देवा दिका हनी वरिष्ठ तूची एक साजिरा
गुनावतार तू धरोनिया जगासी तारिसी , सुरा मुनीश्वरा अलभ्य या गतीसी दाविसी ।

जया गुरुत्व बोधिले तयासी कार्य सधिले , भवार्न वासी लंघिले सुविघ्ना दुर्ग भंगीले
सहा रिपुन्शी जिंकले निजात्म तत्व चिंतिले , परा परत्परासी पाहिले प्रकृष्ट दुख साहिले

गुरु उदार माउली , प्रशांत सौख्य साउली , जया नरसी फाउली तयासी सिद्धि गावली
गुरु गुरु गुरु गुरु म्हणोनी जो स्मरे नरु , तरोनी मोह सागरु सुखी घडे निरंतरू

गुरु चिदाब्धि चंद्र हा , महत्पादी महेंद्र हा , गुरु प्रताप रुद्र हा , गुरु कृपा समुद्र हा
गुरु स्वरुप दे स्वत गुरुची ब्रह्म सर्वथा , गुरु विना महा व्यथा नसे जनि निवारिता

शिवाहुनी गुरु असे अधिक हे मला दिसे , नरासी मोक्ष द्यावया गुरु स्वरुप घेतसे
शिवस्वरूप अपुले न मोक्ष देखिले , गुरुत्व सर्व घेतले म्हणोनी कृत्य सधिले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें