सोमवार, 23 नवंबर 2009

गुरुचरित्र

गुरुचरित्र
श्रीगुरुचरित्राचे अद्भूत सामर्थ्य

श्रीगुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भारलेला सिद्धमंत्ररूप, महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे. श्रीगुरुचरित्राचे पारायण करण्याने कार्यसिद्धी होऊन साधक संकटातून पार पडतो.

श्रीगुरुचरित्राचे सर्व अध्याय सिद्धमंत्ररूप व महाप्रासादिक असल्यामुळे साधकाच्या मनात कमीअधिक सामर्थ्याचा संचार होऊन त्या त्या अध्यायाच्या अधिक पारायणांनी अधिक पुण्य लाभते. परमेश्वर अधिक कृपा करतो. साधकाच्या देहामध्ये त्या त्या मनोरथसिद्धीशक्तीचे कंप किंवा लहरी वेहवेगळ्या तत्वाच्या उत्पन्न होऊन ती ती इच्छा लवकर पूर्ण होते. सृष्टीतील त्या त्या इष्ट शक्तीला व इष्ट द्रव्याला ती लोहचुंबकाप्रमाने आकर्षित करते असा जगमान्य मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. या दृष्टीने श्रीगुरुचरित्राच्या या ग्रंथाचे अपार महत्व आहे. शेवटी श्रीगुरुचरित्रात श्रीगुरुंनी स्वत: सांगितल्याप्रमाणे:
श्रीगुरुचरित्राचे वाचनाने| आमुचे चरित्र जो पठन करी | त्यासी लाभती पुरुषार्थ चारी |
सिद्धी सर्वही त्याचे द्वारी | दासीपरी तिष्ठतील | त्यासी नाही यमाचे भय |
त्यास लाभ लाभे निश्चय | पुत्रपौत्रांसहित अष्टेश्वर्य | पावून निर्भय पावे मुक्ती |

साधकाच्या सर्व मनोकामना पूर्णा होवो असे सर्वांना शुभ चिंतून हे निवेदन संपवतो. शुभंभवतू!
- स्वानंद सरस्वती यांच्या प्रस्तावनेतून
|| श्रीगणेशाय नम: || श्रीगुरूभ्यो नम: ||

ॐ नमो जी विघ्नहरा || गजानना गिरिजाकुमारा ||

जय जया लंबोदरा || एकदंता शूर्पकर्णा || १ ||

मोक्षदाता तो शकर || अंतीं संहार करणार ||

उमा ज्यासी असे प्रियकर || तयासी नमन हे माझें || २ ||

भक्ताकारणें विनविणें || सर्वांनीं मज साह्य होणें ||

तुम्ही समस्तां पावणें || मोक्षपदीं जावया || ३ ||

गुरूचरित्र कामधेनु || एकतां होय महाज्ञानु ||

श्रोते व्हावे सावधानु || एकचित्ते परियेसा || ४ ||

वसिले ज्या ग्रामीं गुरू || तेथील महिमा असे थोरू ||

जाणति लोक चहुं राष्टु || सर्व येती य्रात्रेसी || ५ ||

तेथें राहून जे आराधिति || तयां होय फलप्राप्ति ||

पुत्र दारा धन संपत्ति || जी इच्छा ती पुर्ण होय || ६ ||

दयानिधीऐसा यति || तयासि विनवितो श्रीपती ||

नेणें मी भाव भक्ती || अंत:करणीं परियेसा || ७ ||

तारीं तूं जगविश्र्वासी || त्रिमूर्ति तूंचि अससी ||

समस्तसुखराशिसीं || तूंचि वर देणारा || ८ ||

त्रिमूर्ति तुज म्हणोनी || वर्णिती अठरापुराणीं ||

ही गोष्ट माझे अंत:करणीं || नये साक्षी परियेसा || ९ ||

याहून तू आम्हांसी || काय मागणें मागसी ||

सांगावें बा ऋषीकेशी || काय देऊं देवा || १० ||

यतीश्वरात्रिमूर्ति देवा || कृपा करावी ऐका ||

मी सर्वथा अपराधी देखा || बहुतांपरी || ११ ||

इति श्रीगुरूचरित्रे सिद्धनामधारकसंवादे नाम प्रथमो.Sध्याय: || १ ||
|| श्रीगणेशाय नम: ||
सुकुमार लावण्यमूर्ती || अंगी असे कर्पूरदीप्ती ||
तेजें जैसा गभस्ती || पाहें मुर्ति सांवळी || १ ||
करूनियां मन स्थिर || ऐकें कथा उपरीर ||
ब्रम्हवाक्य साचार || चारी युग त्त्याकारणे || २ ||
लक्ष कोटी वरूषें जाण || ब्रम्हा वसे नाभिस्थान ||
त्यासिं न कळे मी कोण || कोठे आहें कळेना || ३ ||
लोभ माया मग त्यागुन || विष्णुसी गेला शरण.
विष्णु जाहले प्रसन्न || सांगती गुरू करीं बा || ४ ||
कैसा गुरू करावा आपण.त्याची काय असावी खूण ||
गुरूमहिमा कैसा जाण || सांगा तो परियेसा || ५ ||
करूनियां मन स्थिर || ऐक ब्रम्हा गुरूप्रकार ||
सांगति विष्णु परिकर || सांदीपनी आख्यान पैं || ६ ||
गुरूपासोन काय होतें || भक्ति करितां मनोभावे ||
तेणे ज्ञान होय निगुतें || गुरू ईश्र्वर मानावा || ७ ||
रमावर आणि उमावर || यांपेक्षां गुरू मानावा थोर ||
गुरू ही अक्षरें साचार अमृतासम जाणावी || ८ ||
वेदानुसार गुऋरू होती देखा || आपण जाहले तात्त्काळिका ||
वर देती अलोलिका || जीवउत्त्पन्न करीं || ९ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे शिष्यदीपकाख्यानं नाम द्वितीयोऽध्याय: || २ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
ब्रम्हवैवर्तकपुराणी || जें कथन केलैं व्यासांनी ||
तें निरोपिले सगुणीं || गुरूमहिमप्रकार || १ ||
म्हणता ऐसे गुरू आपण || धरीतसे मग तो चरण ||
मी झालों आतां तुम्हाधीन || ज्ञान मातें निरोपावें || २ ||
रूपयौवनें करून जाण || तारूण्यमद मज भरोन ||
संसारपाशे गुंतून || गुरूसेवा विसरलो || ३ ||
द्रव आला गुरूलागोन || बोलाविलें तया जवळी जाण ||
जवळ त्यातें बैसवोन || गुह्य सांगती तयासी || ४ ||
विष्णु ब्रम्हा आणि शंकर || यांनी घेतले नाना आवतार ||
ऐकावी कथा साचार || कारणीक तयानाम || ५ ||
लींनपणें शिष्य होवोनी || पुसतसे श्रीगुरूलागोनी ||
कां अवतरले मनुष्यपणीं || ते सांगावे मज परीयेसा || ६ ||
अवताराचीं कारणें || सांगतो तुज विस्तारानें ||
मन करून सावधपणें || एकचित्तें श्रवण करावें || ७ ||
वर्षभर व्रत करी अंबरीषी || भंगावया आला ऋषी ||
अतित होऊन हाटेसी || येते जाहले दुर्वास || ८ ||
तव पातला ऋषिकेशी || येऊन उभा सन्निधानेंसी ||
तो शापील ते ऋषिसी || जन्में गा अखिल योनीसी || ९ ||
राखावें आपले भक्तातें || विष्णु बोले दुर्वासातें ||
शापावें आंम्हां निगुतें || भक्ततारका शिरोमणी || १० ||
या कारणें विष्णुसी || शापीतसे दुर्वास ऋषी ||
नाना योनी अवतरसी || भक्तांकारणें रक्षिसी || ११ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे अंबरीषव्रतनिरुपणं नाम त्रितीयोऽध्याय: || ३ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
अपराधाविणें जाण || व्रत भंगिले काय कारण ||
शापिलें विष्णुलागोन || ऐसा दुर्वास कोपे पैं || १ ||
त्रिगुण देवता मिळोन || विचार करिती तिघेजण ||
अनुसूयागृहीं जावोन || सत्व हरूं पतिव्रतेचे || २ ||
अनुसुयेचे सत्व हरावयासी || तिघे येती आश्रमासी ||
विचार करिती मानसी || कैसेपरि सत्त्व हरावें तीचें || ३ ||
सदा तुझे आश्रमांत || संतर्पण होतसे अभ्यागत ||
ऐकून कीर्ती विख्यात || म्हणोनि आलों तव आश्रमीं || ४ ||
याकारणे अनुसूये पतिव्रते || आलों आम्ही तव गृहातें ||
वाढीं नग्न होऊन आम्हांते || नाहीं तरी जाऊं दुजे गृहीं || ५ ||
गर्भी जैसे निगती बाळक || तेंवि जाहले नग्नहोतां देख ||
गृहीं खेळताति अमोलिक || ऐसें तेथे नवल जाहलें || ६ ||
भरून मग पायसवाटी || मुखी लावितसे ते गोरटी ||
तेणें तृप्त होती त्रिमूर्ती || ऐसें नवल तिणें केलें || ७ ||
सन्मुख होती मग तिघेजण || म्हणती प्रसन्न तुज लागोन ||
जी इच्छा मनांतून || ते देतों तुजलागीं || ८ ||
भूमीवरी व्हावी ऐसी कीर्ती || केलीं बाळकें तुम्हा म्हणती ||
ऐसा वर द्यावा तुम्ही निश्र्चिंती || हेंच मागणे देवराया || ९ ||
तारावया विश्र्वातें || नामें ठेविलीं तीघां कौतुकें ||
विष्णुसि दत्त चंद्र ब्रम्हदेवातें || शंकरासी दुर्वास पैं || १० ||
ऐसें गुरूपीठ मूळ जाण || दुर्वास तोचि हा आपण ||
लोकानुगृहाकारण || पृथ्वीवरी हिंडावें || ११ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे अनसूयोपाख्यानं नाम चतुर्थोऽध्याय: || ४ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
सर्व लोक जाहले अज्ञानी || कली संचरलासे मेदिनीं ||
लोकानुग्रहालागोनी || अवतरती दत्त आपण || १ ||
कळलें दत्तालागुन || पुत्राविणें इस दु:ख दारूण ||
तरी द्यावें इसि वरदान || ऐसा मनीं विचार करिती || २ ||
लक्षीतसें तूं आतां मार्ग || भिक्षा मागतांतिता सवेग ||
विन्मुख जातां होय भंग || ऐसें सांगती तियेसी || ३ ||
लोकीं कीर्तिवंत होय जाण || ऐसा पुत्र होईन आपण ||
साक्षात विष्णु सगुण || होता अवतार तुझे घरीं || ४ ||
कैंची भेटी तुज देवमूर्ती || वर देऊन गेली तुजप्रती ||
आतां रहावें मन करून निश्रिंचतीं || पुत्र होईल भरंवसे || ५ ||
करित असावें दत्तचिंतन || होतील तुझे मनोरथ पूर्ण ||
संशय सोडीं मनांतून || ऐसें सांगे यति तियेसी || ६ ||
वर जो लाधलीस आतां || पुत्र होईल तुज निभ्रांत ||
धन्य तुझी मातापिता || न धरीं चिंता मानसींपैं || ७ ||
राहती दोघें निश्र्चिंत मनीं || हर्षे निर्भर होवोनी ||
ऐसें होतां ते स्त्री जाहली गर्भिणी || विप्रा आनंद होतसे || ८ ||
प्रसूत जाहली शुभदिनीं || नव मास भरतां तेंच क्षणीं ||
विप्रेंमग स्नान करोनी || जातक केलें परियेसा || ९ ||
दावी पुत्र लोकांलागुन || तों सोळा वर्षे जाहलीं तया पूर्ण ||
वर देवोन मग मातेलागुन || पुत्रासीं ज्ञान दीधलें || १० ||
यासि होईल संतति शतायुषी || हा निश्र्चय धरीं मानसीं ||
ऐसावर देवोन मातेसी || आपण गेले तीर्थाप्रती || ११ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे इदत्तात्रेयावतारकथनं नाम पंचमोऽध्याय: || ५ ||


|| श्रीगणेशाय नम: ||
निघोन गेले श्रीपाद यती || नाना तीर्थे आचरती ||
मग जाती गोकर्णक्षेत्राप्रती || राहती तेथें आनंदे पै || १ ||
लौकिकीं जाती तीर्थासी || परोपकार करणें मानसी ||
हा मुख्य सांराश असे परियेसी || ऐकें गा शिष्योत्तमा || २ ||
भलत्या मिषें करून || लोकोपकार करावा पूर्ण ||
दु:ख दरिद्र तयांचे हरण || व्हावें ऐसें करावें पै || ३ ||
निघोन गेले तैं गोकर्णासी || विशेष काय त्या तीर्थासी ||
सर्व तीर्थें सोडून परियेसी || गोकर्णीच कां गेले ते || ४ ||
महास्थान असे गोकर्ण || तया वरिष्ठ दुजें तीर्थ जाण ||
नसे या भूमंडळीं पूर्ण || या कारणें जाती ते तीर्था || ५ ||
लक्ष कोटी वरूषें जाण || अन्य तीर्था करितां पुण्य ||
तें पुण्य एका दिनीं येथें होय पूर्ण || ऐसें फळ गोकर्णी असे || ६ ||
नि:पाप होती गोकर्णी || याविषयीं कथा असे पुराणीं ||
लिंगपुराण करितां श्रवण || पापें सर्व भस्म होती || ७ ||
सर्व पाप नाशक हें तीर्थ || ऐसें वर्णिती पुराणीं वरिष्ठ ||
तरी या तीर्थाचा आद्यंत || सांगा स्वामी कृपाळुवा || ८ ||
गणेशे प्रतिष्ठिलें लिंग || नाम महाबळेश्र्वर स्वयंभू ||
स्कंधपुराणीं कथा असे सांग || ती तूं श्रवण करावी || ९ ||
या प्रकारें तें क्षेत्र उत्तम पूर्ण || रावणें मुरडिलें म्हणोन ||
नाम पावलें तया गोकर्ण || महाबळेश्र्वराचें पैं || १० ||
येथें महाबळेश्र्वर हें नाम || पावावया काय कारण ||
रावण बळिवंत म्हणोन || नाम पावलें परियेसा || ११ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे गोकर्ण महात्म्यनिरूपणं गोकर्णमहिमावरणनं नाम षष्ठमोऽध्याय: || ६ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
समस्त तीर्थे सोडोनी || श्रीपाद गेले किं कारणीं ||
पूर्वीं आराधिले कवणीं || ती कथा सांगावी मज || १ ||
वसंतकाळीं राजा एक परियेसीं || विनोदें गेला पारधीसीं ||
प्रवेश केला घोर वनासीं || वसति तेथें सिंह शार्दूलपै || २ ||
कपटी सेवकाहातीं केला पाक || राजानें श्राद्धदिनीं देख ||
नरमांसाची केली शाक || वसिष्ठाकारणें वाढिली || ३ ||
लक्षितां वसिष्ठ तया शाकेसीं || शापिता जाहला राजासीं ||
राजपत्नीनें गुरूसी || उ:शाप मागीतला पैं || ४ ||
करूणावचन तिचें ऐकोनी || शांत जाहला वसिष्ठ मुनी ||
वर्षे बारा वनी कमोनी || भेट होईल पत्नीची || ५ ||
रमतां तूं स्त्रियेलागुन || संग होतां तुज मृत्यु पर्ण ||
ऐसा शाप विप्रस्त्री देऊन || गेली पतिसहगमनीं || ६ ||
हिंडतसे तो मिथिलापुरीं || कष्टोन राजा बहुतांपरीं ||
निर्वाण होऊन मनांतरीं || चिंताग्रस्त बैसला पैं || ७ ||
तापसी ऐक भेटला राजासी || गोकर्ण महिमा सांगे आद्यतेसी ||
राजा होऊन मग संतोषी || गोकर्णाप्रती गेला || ८ ||
यथास्थित कथा तूंचि ऐक || श्रीपाद गेले गोकर्णा देख ||
राहिले दिवस बहुतेक || उत्तम क्षेत्र जाणोनी || ९ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे गोकर्णमहिमावर्णनं नाम सप्तमोऽध्याय: || ७ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
सर्व श्रवण करून शिष्य देखा || दुजे दिनीं प्रश्र्न करिती ऐका ||
पुढें वर्तली काय कथा || सांगा स्वामी गुरूवर्या || १ ||
कर्म असें पूर्वफळार्जिती || एके स्त्रीसीं पुत्र होती मरती ||
अनेक तीर्थें तीं करिती || मंदमती पुत्र एक जाहला || २ ||
लाभला पुत्र कष्टोनी || ती पूर्वकर्म न सुटे तिजलागोनी ||
बहुत देव आराधोनी || मंद पुत्र प्रसवली पैं || ३ ||
वदे शब्द नये तो पशुपरी || जन्मोनियां विप्र संसारी ||
तरी तो गंगेत प्रवेशकरी || लोक निंदती म्हणोनियां || ४ ||
दास होऊनी दोघेजण || विनविताति श्री गुरूलागोन ||
वासना आहे आमुचे मनीं || प्राण त्यजावा गंगेत || ५ ||
तये स्त्रीचें वचन ऐकोन || पुसताती श्रीपाद कृपाघन ||
कोणते संकटीं तुमचें मन || त्यजितां प्राण किमर्थ पैं || ६ ||
पावणें मला पुत्र पूज्यमान || पुढला जन्म व्हावा मनुष्य जाण ||
देवा तूं ऐसें करीं कारण || पुत्रपूज्य जगत्त्रयीं || ७ ||
रवि सोम भोYंम वारेसीं || शंकरासी पुजावें प्रदोषीं ||
हें व्रत सांगती तियेसीं || श्रीपादगुरू परियेसा || ८ ||
गर्गमुनि शिष्य उज्जयनिनगरीं || चंद्रसेनराजा राज्य करी ||
सदा ईश्र्वराची भक्तीकरी || त्याची कथा ऐकावी || ९ ||
तावनमात्र कथा ऐकोन || संतोषोनी मग तीं दोघेजण ||
श्रीपाद सांगती तया लागोन || शंकर पूजावा प्रदोषीं || १० ||
यथासांग त्यांनी केलें व्रत || मनेच्छा जाहली पूर्ण त्वरीत ||
पुत्र झाला वेद म्हणत || ऐसें केलें श्रीपाददेवें || ११ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे प्रदोषव्रतमाहात्म्यकथनं नाम अष्टमोऽध्याय: || ८ ||

|| श्रीगणेशायनम: ||
श्रीपाद कुरवपुरीं असतां || पुढें वर्तली एक कथा ||
सांगावी स्वामी यथार्था || कृपासिंधु दातारा || १ ||
पाहुन रजकाचा मनोभाव || वर देती श्रीपाद राव ||
राज्यपद पावसी सहज || ऐकतां संतोषें रजक पैं || २ ||
दया करावी श्रीगुरूनाथा || ऐसी स्तुती करी तो रजक ||
श्रीपाद होती कृपावंत || वोळखिली वासना तयाची || ३ ||
यक्षगंधर्वी या पायांसी || पूर्वी आराधिलें देवासीं ||
ते पाय अंतरतां नसेची || वासना पूर्ण करावी || ४ ||
ती तयाची इच्छा पाहून || सांगताती श्रीपाद आपण ||
जावें तूं म्लेंच्छकुळीं जाण || सांगतां खुण परियेसा || ५ ||
विदुरानगरीं म्लेंच्छ कुळीं जन्म घेसी || भेटी देऊं अंतकाळासी ||
श्रीपाद सांगती तयासी || कारण असे येणें आम्हा || ६ ||
लगबगां लागे तो श्रीपादचरणीं || निरोप देती जावें म्हणोनी ||
ऐसें तया संबोधोनी || पुन्हां नमितसे तो रजक || ७ ||
भाव देखोन श्रीपादमूर्ती || रजका जवळी पाचारिती ||
इह भोगिसी कां पुढतीं || राज्यपद सांग मज || ८ ||
यति पुसतां तये क्षणीं || त्याजिला प्राण ततक्षणीं ||
जन्मे म्लेंच्छ जातयोनीं || विदुरानगरीं विरव्यात || ९ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे रजकवरप्रदानं नाम नवमोऽध्याय: || ९ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
भक्तजन तारावयासी || अवतार घेती ऋषीकेशी ||
शाप देती दुर्वास ऋषी || पुढील भविष्य जाणोनी || १ ||
त्रिमूर्तीचा अवतार || याचा कोणा नकळे पार ||
निधान तीर्थ कुरवपुर || वसती तेथें त्रिमूर्ती || २ ||
दूत होऊनी गुरूचरणासी || निश्चय करी तो मानसीं ||
द्विज एक निघे उदिमासी || नवसी लक्ष ब्राम्हण || ३ ||
लीनता धरून श्रीपादचरणीं || याचेनि घेतो द्विज ते क्षणीं ||
वेंचावया संतर्पणीं || द्रव्य घेतलें समागमें || ४ ||
तस्कर म्हणती तया द्विजासीं || आम्हीं जातों कुरवपुरासी ||
श्रीपादयतिदर्शनासीं || प्रतिवर्षी नेम परियेसा || ५ ||
विप्रासी बोलून मार्गासीं || तस्करी मारीलें तयासीं ||
शिर छेदून परियेसी || द्रव्य घेतले सर्व हिरोन || ६ ||
गृही नव्हे मार्गात || भक्तासी आपुले रक्षणार्थ ||
रात्री माजी येती श्रीगुरूनाथ || निवविती तया विप्रातें || ७ ||
हा प्रकार करून गुरूदेखा || गुप्त होती तात्काळिका ||
सूर्योदय होतांचि || ऐका विप्र पुसे तयां तस्करासीं || ८ ||
यथाविधी सर्व र्वतमान || चोर सांगती द्विजालागून ||
भस्म लावूनियां जाण || जीवविलें तुजप्रती || ९ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे भक्तसंकटहरणं नाम दशमोऽध्याय: || १० ||

|| श्रीगणेशाय नम: ||
ॐमित्येकाक्षरं ब्रम्ह || ऐसें असे वेदवाक्य प्रमाण ||
याविषयीं ऐक वर्तमान || नृसिंहसरस्वती अवतार || १ ||
कारण पुढील जाणोन || श्रीपाद होती अवतार पूर्ण ||
शिववृत्ती स्त्री पूर्वील जाण || तिचें घरीं परियेसा || २ ||
रक्षी बाळातें नारी || दिवस दहा जाहल्यावरी ||
नाम ठेविती प्रीतीकरीं || नामकरण करी द्विजोत्तम || ३ ||
ऋषी चारी वेदांचे येती || शाखा परत्त्वें वेद पढती ||
इष्ट सोयरे दाईज गोती || सर्व येती व्रतबंधा || ४ ||
पिता माता आनंदित || कुळाचारें देवदेव करित ||
विचार करिती मनांत || चैल संस्कार पुर्वी करावा || ५ ||
नेवूनिया अंतगृहेसीं || गायत्री मंत्र उपदेशी ||
उपदेश होतांचि तयासीं || भिक्षा घालीं म्हणे पैं || ६ ||
ब्रम्हचारी म्हणे मातेसीं || भिक्षा मागणें आम्हांसी ||
वेदाभ्यास मनोहरेंसी || करणें असे आम्हांस ||
म्हणतां ऐसें पुत्र जाण || दु:खें दाटली अति गहन ||
बाष्पोदकें भरले नयन || मूर्छना आली ते वेळीं || ८ ||
मग म्हणती मातेलागून || तुज होत पुत्र चार जाण ||
सेवा करिती भावें करून || ऐसा वर देते झाले || ९ ||
याच प्रकारें जननिसी || गुरूमूर्ती सांगती दिनयेंसी ||
माता बोलतसे पुत्रासी || श्रोते सावधान ऐकावें || १० ||
इत्थंभूत ऐकोन मातृ वचन || श्रीगुरू सांगती तिज ज्ञान ||
ते तुम्ही ऐकावें शुद्धमनें || पूर्ण ज्ञान तें जाणावें || ११ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे श्रीपादावतारबालचरित्रं नाम एकादशोऽध्याय: || ११ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
पर्जन्य पडतां वृक्षावरी || उदक न राहो तया पर्णाग्री ||
तेवि शरीर स्थिर नव्हे निर्धारीं || क्षणैक हे जाणावे || १ ||
यमाचा जरी असे इष्ट || त्याने करावा हा हट्ट ||
अमरत्व असे ज्यासी स्पष्ट || त्याणे म्हणावे मर्म पुढे पैं || २ ||
शरीर हे नाशिवंत || हे तूं जाणतोसि निश्र्चित ||
याकारणे धर्म करी त्वरीत || विलंब सहसा करू नये || ३ ||
राहावें तू मज समीपता || जोवरी मज होय एक सुता ||
निरोप नेदी तोंवरी तत्वतां || ऐक विनंती ही माझी || ४ ||
मी सांगे ऐसे वचन || जरी जाशील तूं उल्लंघून ||
तरी मी प्राण त्यागीन || हा निश्र्चय तूं जाणावा || ५ ||
नव मास भरतां त्वरित || माता होतसे मग प्रसूत ||
पुत्रयुग्म जाहले ख्यात || अति सुंदर सुलक्षणी || ६ ||
नकळे आम्हां स्वरूप ज्ञान || काय ओळखावे तव गुण ||
मायामोहे वेष्ठोन || आम्ही नेणो महिमा तुझा || ७ ||
दर्शन होय तुझे जोंवरी || आम्ही वाचो आत्मजा तोंवरी ||
आम्ही राहावे कोणेपरी || या धुरंधर संसारी || ८ ||
करितां स्मरण मी येईन जवळी || न करावी चिंता वेळोवेळीं ||
मी येतो स्मर तात्काळीं || हा भरवसा पूर्ण पैं || ९ ||
राहुन मग काशीस्थानी || अनुष्ठान केलें इश्र्वरसंनिधानीं ||
विश्र्वेश्र्वराचे दर्शनीं || करिताती आत्माराम || १० ||
यति जाहले मग आपण || कृष्ण सरस्वती गुरूसी शरण ||
तैं नाम पावले जाण || नृसिंह सरस्वती ऐका || ११ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे गुरुपरंपराकथनंद्वादशप्रश्नं नाम द्वादशोऽध्याय: || १२ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
करंज नगरीं मग गुरू येवोन || भेटती मातापिता बंधुजन ||
शिष्य सतांसह वर्तमान || भिक्षा घेती घरोघरीं || १ ||
रूपासी होईल तुझे पाळट || देहासी होईल कष्ट ||
ते वेळीं होईल माझी भेट || ऐसें संताईस निरोपिलें || २ ||
नानातीएर्थे पाहत पाहत || येते जाहले गौतमतीर्थास ||
गौतमाख्यान समस्त || सांगती शिष्यवर्गासी || ३ ||
करून तेथील देखा || आले मन्जरीग्रामीं एका ||
नृसिंहोपासक माधवा || उपदेशून गेले ब्रम्हेश्र्वरा || ४ ||
राहिलें तेथें श्रीगुरू आपण || पोटव्यथेचें विप्रालागोन ||
औषध तया देऊन जाण || मग सायंदेवा भेटती || ५ ||
यथाविधि भोजन देऊन || व्यथा त्याची दूर करून ||
सायदेवाचे स्त्रीसीं वरदान || देऊन सर्वां सुखी केलें || ६ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे विप्रोदरव्यथानिरसनं नाम त्रयोदशोऽध्याय: || १३ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
नमितसे सायंदेव आपण || चरणीं माथा ठेवून ||
श्री गुरू सांगती तयालागोन || तें श्रवण करितसे ||
माझे वंश परंपरी || भक्ती असावी तुझे घरीं || २ ||
राहणें तव चरणसन्निध || दुजे स्थान नवावे एक ||
संसारसागरापासाव || देईं तूं श्रीगुरू कृपासिंधु || ३ ||
यथास्थित तया सांगूनी || श्रीगुरू जाती तेथोनी ||
जेथें वसे भवानी || वैजनाथी गुप्त पैं || ४ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे दुष्टयवनशासनं नाम चतुर्दशोऽध्याय: || १४ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
परिसा तुम्ही गुरू गुप्त राहोनी || शिष्यां सर्वां बोलावोनी ||
निरोप देती याचे लागोनी || भेटी आतां श्रीशैल्या || १ ||
वर असा देऊन शिष्यासी || आम्हा येणें श्री शैल्यासी ||
बहुधान्य संवत्सरासी || भेटी तेथें होईल परियेसा || २ ||
तरी आम्ही जावें कोणे तीर्था || निरोपावें स्वामी यथार्था ||
तुझें वाक्य आम्हा अनाथा || निरोपिसी तेथें जाऊं || ३ ||
वाक्य तुझें आम्हासी || प्रसिद्ध पणें असे निश्र्चयेंसी ||
तरी जे स्थानीं निरोप देसी || तेथें राहूं स्वस्थमनें || ४ ||
शिष्याचें वचन ऐकोनी || श्रीगुरूमूर्ती प्रसन्न वदनीं ||
निरोपिती तें ऐका श्रवणीं || तीर्थयात्रा करावी || ५ ||
नेमे करावी तुम्ही यात्रा || तेथील महिमा ऐकावा त्वरिता ||
तीं तुम्ही श्रवण करितां || महापातकें नासती || ६ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे क्षेत्रतीर्थवर्णनं नाम पंचदशोऽध्याय: || १५ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
नमुनी मग शिष्यांकित || श्रीगुरूसी मग पूसत ||
सांगा स्वामी वृतांत || श्रीगुरूमहिमा समस्त पैं || १ ||
वैजेश्र्वरसन्निधानी || कां राहतेजाहले श्रीगुरूमुनी ||
जेथें वसे अंबा भवानी || तेंथें राहती गुप्त पैं || २ ||
गुरू असतां वर्तमानीं || आला एक ब्राम्हणमुनी ||
श्रीगुरूतें नमोनी || बोलतसे परियेसा || ३ ||
रघुवीरा सारखें निधान || कां हिंडतोसी रानोरान ||
गुरू असतां संन्निधान || वंचु नये कर्म जपासी || ४ ||
वेडीं भाषणें विश्र्वाचीं ऐकूनि || श्रीगुरू म्हणती तयालागुनी ||
सांगतों ऐका विस्तारोनी || गुरूसेवा प्रकार || ५ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे श्रीगुरुशुश्रूषणं नाम षोडदशोऽध्याय: || १६ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
ऐकोन सिद्धाचें वचन || नामधारक करी नमन ||
श्रीगुरू परमात्मा जाण || कां राहिले गुप्तरूपें || १ ||
दिनकरातें लपवितां परियेसी || केवीं लपे तेजोराशी ||
कस्तुरी ठेवतां जनतेसी || सुगंध केवींगुप्त होय || २ ||
रूपें असतां सुंदर || त्यासी ठेविती लोक गुप्त जर ||
तो कैचा गुप्त राहिल साचार || सांगे त्वा शिष्योत्तमा || ३ ||
पार्वतीनें शंकरासी || प्रगट केलें मोहिनीरूपेंसी ||
तैसें श्रीगुरूकारणेंसी || भक्तांनीं प्रगट केलें || ४ ||
यदर्थ एक कथा तुम्हास || सांगतों ऐका समस्त ||
एक ब्राम्हण विद्यावंत || करवीरक्षेत्रीं असे देखा || ५ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे द्विजोद्धरणं नाम सप्तदशोऽध्याय: || १७ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
तारावें भक्तासी हा हेत || म्हणोन तीर्थे आचरत ||
राहिले तेथें गुरूनाथ || पुढें प्रगट जाहले पैं || १ ||
क्षणांत होती प्रगट गुप्त || भिक्षे जाती तया ग्रामांत ||
एका विप्रमंदिरांत || येते जाहले भिक्षेकारणें || २ ||
पर्णकुटिकेंत तो पंचयज्ञ करी || याचकवृत्तीनें उदर भरी ||
ऐसा तो असे अति दरिद्री || अतिथी पूजी नेमेंसी || ३ ||
त्राहि त्राहि श्रीगुरूनाथा || माझे दु:ख दरिद्र नाशा ||
करा निवारा आतां व्यथा || म्हणोनी धरी चरण पैं || ४ ||
यति सांगतीं ते द्विजासी || सुखी राहें आपुले गृहासी ||
पुत्रपौत्रसुखें नांदसीं || तयासी वर देते जाहले || ५ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे विवेकसारअयाचितविप्रदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्याय: || १८ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
संतोषोनी सिद्ध || आपण सांगावें म्हणती विस्तारोन ||
शिष्य ऐकती भावेंकरून || गुरूमहिमा अनुपम्य || १ ||
वनीं वृक्षांत अश्र्वत्थ थोर || ऐसा असे वेदांतसार ||
श्रीगुरूसी आवडे औदुम्बर || याचें कारण ऐकावें || २ ||
तया औदुम्बरवृक्षासी || दीधले वर थषिकेशी ||
सदा सफल तूं होसी || कल्पवृक्ष तुझें नाम || ३ ||
त्रिमुर्ती तव सन्निधानीं || राहती सर्व अनुदिनीं ||
जो सेवा करी तुझी भावेंकरोनी || मनोरथ पूर्ण होतील || ४ ||
मम वस्ती तुझेपासीं || लक्ष्मीसह राहे संतोषीं ||
ऐस वर देती विष्णु परियेसी || म्हणोन प्रीती तयावरी || ५ ||
त्रिमूर्ती श्रीगुरूनाथ || म्हणोनी औदुंबरी राहत ||
भक्तजनतारणार्थ || भूमीवरी संचारती || ६ ||
यमलोकीं जाणें ज्याचा हेत || त्यानीं पहावा देवाचा अंत ||
जे असती मदोन्मत्त || तयासी देवभक्ती मुळीं नसे || ७ ||
त्रिमुर्ति गुरू हें जाणोन || गुहक करी स्तोत्र आपण ||
संतोषोनी श्रीगुरू जाण || आश्र्वासिती तयासी || ८ ||
देऊनियां वर तयासी || दैन्य गेलें तुझें परियेसीं ||
जी इच्छा असेल मानसीं || ते पावसी सर्वाभीष्ट || ९ ||
हा औदुंबरवृक्ष निर्मळ || याखालीं जपतप फळ ||
करितां कोटीगुणें फळ || म्हणोनी सांगती श्रीगुरू || १० ||
यति राहती औदुंबरीं || प्रगटरूपें गाणगापुरीं ||
राहतीं श्रीगुरू प्रीती करी || विरव्यात असे परियेसा || ११ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे औदुंबरक्षेत्रवर्णनं नाम एकोनविंशोऽध्याय: || १९ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
सदा वसती औदुंबरीं || आला विप्र एक सदाचारी ||
भार्या पतिव्रतेसम परि || मृतवत्सा असे देखा || १ ||
वास्तव्य करी संगमासी || औदुंबरसेवा एक मासीं ||
श्रीगुरूसेवा अहोरात्रीसीं || तिची मनेच्छा पूर्णहोय || २ ||
घवघवीत मूर्तिमंत || विप्र एक येऊनि तिचे सन्निध ||
मागे द्रव्य एकशत || तया श्रीगुरू निवारिती || ३ ||
नामें तयाचीं करूनी || किया केली दशदिनीं ||
श्रीगुरूची सेवा निशिदिनीं || स्वप्नीं प्रसाद देती तिला || ४ ||
शांत होऊनी मग मानसीं || जावोनी मग गुरूचरणापासीं ||
म्हणे पुत्र वांचवीं निश्र्चयेसीं || नाहींतरी प्राण देईन || ५ ||
यथार्थ हा माझा भाव || निश्र्चयें जाण तूं देवाधिदेव ||
मनोरथ करितां पूर्ण तूं देव || मम वासना पूर्ण करीं || ६ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे ब्रह्मसमंधपरिहारो नाम विंशोऽध्याय: || २० ||


|| श्रीगणेशाय नम: ||
चैन न पडे त्या दोघांसी || पुत्र मेला परियेसीं ||
निद्रा नाही अहोरात्र तयांसी || सेवा करितां आश्र्चर्य जाहलें || १ ||
तंव निद्रा आली त्वरित || सुषुप्तींत पाहे भस्मांकित ||
व्याघ्रचर्मपरिधानत || रूद्राक्षमाळा जटाधारी || २ ||
न्याग्रोधदंड त्रिशूल हातीं || आले औदुंबरासन्निधी ||
कां शोक करी वो सती || सांगा माते आम्हासी || ३ ||
रूद्राक्ष शमी बिल्वका || चौथास्मृतुमुख रस ऐका ||
पंचम वायुसह ते रस देखा || सजीव केला पुत्र तिचा || ४ ||
वायु हाचि असे प्राण || गेला तो बाहेर विसरून ||
तया घातला पुन्हा आणून || पुत्र तुझा जिवंत झाला || ५ ||
यदर्थ हे औदुम्बर छायेसीं || जे बसती अहोरात्रीसीं ||
तया मृत्यु नसे निश्र्चयेंसी || ऐसें जाणावें तुम्ही || ६ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे बालसंजीवनं नाम एकविंशोऽध्याय: || २१ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
विप्र एक गाणगापुरीं देखा || असे अतिदरिद्री देखा ||
त्यासी चांगलें करणें ऐका || गुरूचे आलें मनांत || १ ||
वर्तत असतां दरिद्र दोषी || असे एक वांझ महिषी ||
वेसण घातली तियेसी || दन्तहीन अति वृद्ध || २ ||
भरतां दोन प्रहर ऐका || श्रीगुरू जाती कारणिका ||
भिक्षार्थी म्हणती देंखा || तया विप्रस्त्रीगृहीं || ३ ||
राहिलें अन्न आम्हासी || नको घालूं भिक्षेसी ||
महिषी असे तव गृहासी || क्षीर देईं भिक्षेसी || ४ ||
यथार्थ जाणें माझें वचन || मग वांझ महिषी दुभवोन ||
क्षीर तिचें पिती आपण || वर देती जे द्विजा || ५ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे वंध्यामहिषीदोहनं वंध्यामहिषीदोहनं नाम द्वाविंशोऽध्याय: || २२ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
काल माझे गृहासीं || गुरूनीं दुभविली वांझ महिषी ||
म्हणोनि विप्र सांगे राजासी || श्रीगुरूचा महिमा || १ ||
लागतसे राजा चरणासी || लोटांगण श्रींगुरूसी ||
घालीतसे विनयभावेसीं || मनोभावें करोनियां || २ ||
नमीत ग्रामींयेऊन आपण || अहो जी करा पावन ||
अज्ञानी लोकांलागुन || ज्ञान देऊन सुधा करावें || ३ ||
रूपेंकरून असे भयंकर || अश्र्वत्थ वृक्ष ग्रामाबाहेर ||
ब्रम्हराक्षस वसे वृक्षावर || तया पाहती श्रीगुऋरू || ४ ||
पाहोनियां राक्षसासी || पुसते जाहले तयासी ||
तात्काळ तो श्रीगुरूसी || नमीतसे वारंवार || ५ ||
यति म्हणती राक्षसासी || तू जावें आतां संगमासी ||
मुक्ती दिली तुज परियेसी || तो पुनीत होय पैं || ६ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे राक्षसमुक्तकरणं नाम त्रयोविंशोऽध्याय: || २३ ||

|| श्री गणेशाय नम: ||
सर्वत्रांस सांगती श्रीगुरू नाथ || जाणें असे कुमसीस ||
त्रिविकृम भारती विरव्यात || भेटीकारणें तयाचे || १ ||
कळलें तया मुनीश्र्वरास || राजा येतो आपुले भेटीस ||
तो ध्यानीं आणी आपुले देवास || तो ध्यानीं दिसेना || २ ||
लवकर येई गा नरहरी || ऐशी मूर्तीस हांक मारी ||
तों अकस्मात पाहे दूरी || श्रीगुरू नृसिंहमूर्ती पै || ३ ||
तरी आतां नमावें कोणा || कोणा दावूं आपली करूणा ||
त्रिमूर्ति हे जाणिले जाणा || तरी आतां निजरूप दावीं || ४ ||
तूं निंदिसी लोकांसी || म्हणोन आलों तुजपासीं ||
विचार तरी तो मानसीं || नृसिंहरूपी प्रत्यक्ष गुरू || ५ ||
मायामोहंधकारीं || बुडालों मी अज्ञानसागरीं ||
नोळखे यासी दुराचारी || दिवांध मी निश्र्चयेंसी || ६ ||
करूणावायु मज प्रेरोन || दाविलें रूप सगुण ||
तरि मज आतां कृपा करून || प्रसन्न होऊन पुनीत करा || ७ ||
देउनिया भारतीसी वरदान || करावें आपणा आधीन ||
पाही गुरूमहिमा संपूर्ण || करी ऐसें देवाधिदेव || ८ ||
हात धरून त्रिविकृमासी || दाविते जाहले गुरू परियेसी ||
जग हें आत्मस्वरूपेंसी || जावेंगा भारतीमुनी || ९ ||
यथार्थ मग श्रीगूरू देखा || वर देते जाहले मुनीसी ऐका ||
ठेविले ते ग्रामीं निका || येते जाहले गाणगापुरीं || १० ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे त्रिविक्रमभारतीविश्वरूपदर्शनं नाम चतुर्विंशोऽध्याय: || २४ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
भारती असती कुमसीसी || त्याची महिमा विस्तारेंसी ||
सांगावी मज कृपेसी || गुरूवर्य आत्मारामा || १ ||
करून वाद विप्रांसवें || हरण करूं तयांचीं सत्वें ||
ऐसी आज्ञा मागती यवनातें || विप्र दोन परियेसा || २ ||
रक्षण देऊन विप्रासवें || तुम्ही चहुराष्ट्रीं जावें ||
हरून ब्राम्हणांचीं सत्वें || राजा म्हणे येईं सत्वर || ३ ||
ऋषी आहे भारतीमुनी || ऐकतां द्विज कोपोनी ||
आले कुमसीभुवनीं || चर्चा करावया भारतीसवें || ४ ||
पाहून भारती ते द्विजासीं म्हणे || चला जाऊं गाणगापुरासीं ||
सांगू वृतांत गुरूसी || तैं द्विजा घेऊन येई तेथें || ५ ||
यथास्थित वर्तमान सकळीं || सांगती त्रिविक्रृम गुरूजवळी ||
आम्हास हें वेळोवेळीं वाद चर्चा म्हणती कर || ६ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे द्विजप्रशंसा नाम पंचविंशओऽध्याय || २५ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
तव श्रीगुरू म्हणती विप्रासी || नको धरू अभिमानासी ||
वेदाचा अंत न कळे ब्रम्हासी || अनंत वेद असती पैं || १ ||
सर्व साधारण व्यास बोलिलें || त्यांच्यानें पूर्ण न जाहले ||
मग शिष्यां चौघां सांगीतले || नामें तयांचीं ऐका || २ ||
विस्तारे सांगतों पैल निका || दुजा वैशंपायन देखा ||
तिसरा जैमिनीनाम ऐका || चौथा सुमन्तू परियेसा || ३ ||
तुम्ही एक वेद शिकतां व्यक्त || पाहिजे दिवस कल्पांत ||
चारी वेद आम्हीं म्हणत || तरी वेद अनंत परियेसा || ४ ||
वर्षानुवर्षे तप केलें || ब्रम्हकल्प तीन वेळां गेले ||
ब्रम्हचर्याश्रमव्रत धरिलें || तरी पार नसे वेदासी || ५ ||
ऋग्वेदादी चार वेद आद्यंत || सांगतो ऐका एकचित्त ||
पूर्वी भारद्वाज विख्यात || ऋषीनें अभ्यासिला पैं || ६ ||
पुण्य म्हणजे तत्त्वसार || पुन्हा त्याणें तप केलें फार ||
ब्रम्हा होय प्रसन्न सत्वर || वर माग म्हणे ते ऋषीतें || ७ ||
भारद्वाज म्हणे ब्रम्ह्यासी || मज तुम्ही प्रसन्न जाहलाती ||
तरी वेद सांगा आद्यंतेंसी || ब्रम्हचर्यव्रत मी असें || ८ ||
गोत्र माझें भारद्वाज || जातीचा आहें मी द्विज ||
मज वेद सांगावें सहज || मनोरथ पूर्ण करावा || ९ ||
देव ब्रम्हा ऋषीसी || मिती नाही या वेदांसीं ||
सर्व कैंचे शिकूं म्हणसी || मातें वेद असे अगोचर || १० ||
वर पाहें तुज दाखवितों सकळ || करोनियां मन निर्मळ ||
शक्ती जाहल्या सर्वकाळ || अभ्यासी भारद्वाज पैं || ११ ||
या प्रमाणें बोले ऋषीसी || ब्रम्हा दावितसे वेदांसी ||
दिसताती तीन राशी || गिरिरूपासमान देखा || १२ ||
धीर्ज्योतिर्मय कोटी सूर्य || पाहतां ऋषीस वाटे भय ||
वेद दिसती गिरिमय || कैसे अभ्यासावे परियेसा || १३ ||
मग बोले भारद्वाज ऋषी || कैचे शिकूं या वेदांसी ||
हे दिसती गिरिरूपेंसी || कैचे शिकूं सांग पां || १४ ||
हित पाहोन माझें आतां || स्वामी कृपा करावी तत्वतां ||
मी दीन हें तुम्ही जाणतां || तरी कृपा करावी देवा || १५ ||
धि:कार असो मजकारणें || ऐसे वेद कधीं शिकणें ||
यांचें ज्ञान मज कधीं होणें || तरी तुझें तूंच आवरीं || १६ ||
या वेदांचा आद्यंत || मी पहावया असें अशक्त ||
तूं जाहलासी प्रसन्न युक्त || जे देशी तेच मी घेईन || १७ ||
या वेदां देखोनी अमित || भय पावलें माझें चित्त ||
जे द्याल मातें उचित || तितुके मी घेई परियेंसा || १८ ||
नमितसे तो ब्राम्हणालागुन || मग ब्रम्हदेव सन्तोषोन ||
देतसे वेदमुष्टी तीन || अभ्यासावया कारणें || १९ ||
प्रथम तीन भाग एकेकाचे केले || वेगळाले मंत्र जाहले ||
चौथा अथर्वण निघे || अभ्यास करितो भारद्वाज || २० ||
चौमुखी ब्रम्हदेवासी || चार वेद उच्चारावया हर्षी ||
असे चार वेद जाहले तत्वेंसी || ते केंवी म्हणावे पैं || २१ ||
दर्शन पूर्ण एकेक वेदासी || शिकतां मोठा यत्न पडसी ||
सांगतों थोडे तुम्हासी || व्यक्त अभ्यासावया || २२ ||
या प्रकारें सांगे व्यास शिष्यांसी || एकेक वेद अभ्यासा हर्षी ||
विस्तार ऐका आद्यंतेंसी || शक्तयुनुसार शिकावें || २३ ||
तत्क्षणीं बोलती चौघेजण || नमिताती व्यासचरण ||
कृपा करावी आम्हा लागुन || गुरूवर्या व्यास देवा || २४ ||
ऐसें करूणा वचन ऐकोनी || व्यास सांगे संतोषोनी
पैलशिष्या बोलावुनी || ऋग्वेद निरोपितसे || २५ ||
न्रम होऊनी तो व्यासासी म्हणे || बरवें सांगावें आम्हासी ||
ध्यानपूर्वक लक्षणेंसी || भेदाभेद सांगावे || २६ ||
मी सांगतों ऐक शिष्योत्तमा || ऋग्वेदाचा ध्यानमहिमा ||
वर्णरूपादि व्यक्त सीमा || भेदाभेद सांगतों || २७ ||
लकारयुक्त असे ऋग्वेद || याचा उपवेद आयुर्वेद ||
अत्रिगोत्र जाणावें त्रिशुद्ध || ब्रम्हदेवता ऐका || २८ ||
पूर्ण गायत्री छंद असे त्यासी || रक्तवर्ण रूपेंसी ||
पन्ननेत्र असती सद्दशी || लंब ग्रीवा कंबुकंठ || २९ ||
रोमकुंच श्मश्रुप्रमाण || पृथुद्विरलि दीर्घ जाण ||
ऋग्वेदरूप साधारण || मूर्ती घ्यावी मानसीं || ३० ||
हितार्थ याचे भेद ऐका || पहिला चर्चा हानिका ||
द्वितीय श्रावक देखा || तृतीय चार्वाक श्रावक पैं || ३१ ||
तसेच पंचम क्रृम फार || षष्ठ म्हणावा क्रम षटकार ||
सातवा कृमिदंड परिकर || ऐसे सप्त भेद जाणावे || ३२ ||
यासी पंच भेद आणिक || त्यासी म्हणती शाखा देख ||
पठण करा ते अमोलिक || सांगतो ते श्रवण करा || ३३ ||
ज्ञय म्हणजे त्या अश्र्वलायनी || दुजी शाकला बाष्कलायनी ||
चौथी मांडव्य माडूकिनी || पण्चम असे द्वादश || ३४ ||
या कलियुगाभीतरी || म्हणतां आम्ही वेद चारी ||
कीर्ती मिरविताती दिगंतरी || अध्यापक म्हणोनी || ३५ ||
देखाया द्वादश भेदांस || मिळोनी शाखा एक विख्यात ||
सुलक्षणें रूपेंसी युक्त || कोण जाणे सांग पां || ३६ ||
वदे वेदव्यास मुनी || शाखा द्वादश विस्तारोनी ||
सांगतसे शिष्यांलागोनी || पैल || षी तें देखा || ३७ ||
ऋग्विधानें वेदांचे भेद || ऐसे वेदव्यास सांगतसे ||
श्रीगुरू म्हणती द्विजा ऐसें || उन्मत्तणें नसावें || ३८ ||
विधियुक्त यजुर्वेद || सांगतों आतां परिकर ||
वैशंपायन शिष्य थोर || अभ्यासावया देखा || ३९ ||
तंव व्यास सांगे शिष्यासी || ऐकें एकचित्तें परियेसीं ||
आतां या यजुर्वेदासी || उपवेद धनुर्वेद पैं || ४० ||
भारद्वाज गोत्र जाणा || अधिदैवत रूद्रप्रतिमा ||
छंद त्रिष्टुप आहे सीमा || ध्यान आतां ऐकावें || ४१ ||
तालुवर स्थूळ केश निर्धारीं || कपाल धरिलें असे करी ||
कांचनवर्ण मनोहरी || नेत्र असती पिंगट || ४२ ||
रक्तश्र्वेत शरीर पांडुवर्ण || पंचरत्न स्थूलदेह जाणा ||
यजुर्वेदाचें असे ध्यान || वैशंपायना ऐकावें || ४३ ||
मुख्य असती चार वेद || त्यांत हा यजुर्वेद मख्य भेद ||
शायंसीं भेद परिकर || वैशंपायन पठणकरी || ४४ ||
निरूक्त शिक्षा कल्प || व्याकरण छन्द ज्योतिष ||
ऐशीं षडन्गें या वेदास || असताती शिषोत्तमा || ४५ ||
धार्मिक भाषा मीमांसा || प्रतिपन्न पद छन्द ||
न्याय कर्म संहिता सहित || हीं आठ उपांगें जाणा || ४६ ||
तयासीं परिशिष्ट अष्टादश || असती ऐका विशेष ||
विस्तारोन परियेसा || व्यास सांगे शिष्यांसी || ४७ ||
मनुष्यासी शिकावयासी || अशक्य आहे परियेसीं ||
लोकोपकार करण्यासी || ऐसा केला विस्तार पै || ४८ ||
इषेंत्वादि सप्ताष्टक संहिता || मन्त्रब्राम्हण निश्र्चिता ||
हें मूळ पढतां मिश्रिता || ह्या यजुर्वेदाचें मूळ पैं || ४९ ||
शेष राहिलें अरण || मिळोन संहिता ब्राम्हण ||
ऐसा यजुर्वेद पूर्ण || वरकड शाखा पल्लव पै || ५० ||
वाचा भक्ती परियेसी || यज्ञादि कर्मकिऋयेसी ||
हें मूळ या वेदासी || व्यास म्हणे शिष्योतमा || ५१ ||
जे भक्तिपूर्वक देखा || या वेदातें भजती ऐका ||
त्यासी पुण्यासी होय निका || ऐकतां पुण्य बहुत पैं || ५२ ||
असे या ग्रंथत्रयासी || प्रश्र्न असती ब्यायंशीं ||
नवष्टाधिक सहस्त्र्रीं || अनुवाक असताती || ५३ ||
शतद्वय दोन सहस्त्र्र || दोन कमीं पन्नासी निश्र्चित ||
सहस्त्र्रद्वय सप्ताधिक || शतत्रय दशकीं ग्रंथ पूर्ण पैं || ५४ ||
आतां तिसरा शिष्य जैमिनी || तयासीं सांगे व्यासमुनी ||
सामवेद तया विस्तारोनी || निरोपीतसे पैं || ५५ ||
यासीं उपवेद गांधर्वास || काश्यप असे ज्यासीं गोत्र ||
विष्णु देवता असे पवित्र || जगती छंद जाणीजे || ५६ ||
हितस्त्र्रग्वी छंद जाण || शुचिष्मंत वस्त्र प्रावरण ||
क्षौमी दन्ती चर्मधारक || दंडधारी रूप असे || ५७ ||
विशाळ नयन कांचनवर्ण || सूर्यासारखें असे किरण ||
षडरत्नी दीर्घ जाण || सामवेदाचें रूप असे || ५८ ||
तयाचे भेद नाहीं मिती || अखिल सहस्त्र्र भेद बोलती ||
ऐसी असे कोणा शक्ती || सर्व वेद शिकावया || ५९ ||
एका नारायणावांचोनी || सर्व भेद न जाणे कोणी ||
ऐक शिष्या जैमिनी || सांगतो तुज किंचित || ६० ||
ग्रही असुरायणींया || दुसरी वासुरायणीया ||
तिसरी देखा वारतांतवीया || ऐसे भेद श्रवण करीं || ६१ ||
नाभी प्रांजली चौथा ऐका || मृग्विधा पंचम देखा ||
प्राचीमयोग्य आणिका || सहावा भेद जाणिजे || ६२ ||
जो ज्ञानयोग्य सप्तम || आरायणीया अष्टम ||
यासी भेद दश आहेति जाण || ऐकावे ते परियेसा || ६३ ||
हरणायणीय दुजा सांख्यायनीय || तिसरा शांदयायनीय ||
मुग्दल नाम जयालागोनी || चौथा भेद जाणावा || ६४ ||
व्द्यखल्वला षष्ट खल्वला || सप्तमभेद लांगुला ||
आठवा जाणे कौमुधुला || नववा भेद गौतम पैं || ६५ ||
दहा भेद ऐक जैमिनी || ऐसें दश भेद विस्तारोनी ||
सांगते जाहले व्यास मुनी || श्रीगुरू सांगती विप्रातें || ६६ ||
तरू पूर्ण सामवेदासी || कोण जाणे ये क्षितीसी ||
तीनवेदी तूंम्हणविसीआ || मदोन्मत्त होवोनियां || ६७ ||
येणेंपरी तया विप्रासी || श्रीगुरू सांगती हितासी ||
तरी ते उन्मत्तपणेंसी || न ऐकती श्रीगुरूवचन || ६८ ||
निंदिती लोक तयांसी || म्हणती मूर्ख तुम्हीं निश्र्चितीं ||
गुरूवाक्य ऐका हर्षी || नाहीं तरी नाश पावाल || ६९ ||
अहो ते दोघे विप्र || सांगताती श्रीगुरूसन्मुख ||
आम्हा पत्र द्यावें त्वरित || नाहीं तरी चर्चा करावी पैं || ७० ||
तापसी म्हणे तो त्रिविक्रृम || पत्र द्यावें हेंचि उत्तम ||
हे विप्र असती अधम || यांसवें चर्चा न करावी पैं || ७१ ||
सदगुरू म्हणती भारतीसी || स्वस्थ बसावें तुम्ही हर्षी ||
चमत्कार पहावा निश्र्चयेंसी || या विप्र मदांधांचा || ७२ ||
शिकवोन पहावें आपण || न ऐकतीं तरी करावें शासन ||
देतां नसे आपणा दूषण || ऐसें सांगती श्रीगुरू || ७३ ||
बहुतांपरी ते विप्रासी || सांगती श्रीगुरू विनयेंसी ||
न ऐकती जे उन्मत्तपणेसी || गुरूवाक्य अमानिती पै || ७४ ||
ही कथा श्रवण करोनी || शिष्य लागती श्रीगुरूचरणीं ||
अथवर्ण वेद निरूपणीं || सांगावा कृपामूर्ती || ७५ ||
सिद्ध म्हणे शिष्यांसी || श्रीगुरू बोलिले विप्रासी या ||
अथर्वण वेदासी || साद्यंत तू श्रवण करीं || ७६ ||
शंभू म्हणे पार्वतीसी || तें व्यास सांगे शिष्यांसी ||
हा अथर्वणवेद मंत्रेंसीं || निरोपिला तो श्रवण करा || ७७ ||
वनौषधी असे मंत्रशास्त्र्रेसी || उपवेद असे या वेदासीं ||
वैजान गोत्र असे यासी || मांत्रिक विद्या असे पैं || ७८ ||
देवता इंद्र असे तयासी || अनुष्टुप छन्द परियेसीं ||
तीक्ष्ण चन्डांश क्रूरे ऐसी || कृष्ण वर्ण असे देखा || ७९ ||
विद्रुप कामकूपी क्षुद्रकर्म || सदार असे तया नाम ||
विश्र्वसृस्यक साध्यकर्म || गलमूर्घ्नि गालव पैं || ८० ||
रक्तगीआवा रूप असे तयासीं || नवभेद असती परियेसी ||
सुमंतुनामें शिष्यसी || सांगतसे श्रीवेदव्यास || ८१ ||
पैपल्य भेद प्रथम || दुसरा भेद दांतानाम ||
प्रदांत ऐसा तिसरा नाम || सूक्ष्म चौथा स्तोता पैं || ८२ ||
औता नाम पंचम ऐका || ब्रम्हादबळ षष्ठ शाखा ||
सात भेद असे निका || सौनळी म्हणती पै || ८३ ||
यथामती सप्त शाखा || असती अथर्वणासीं देखा ||
आणीकही शाखा || दोन गुप्त असती पैं || ८४ ||
अष्टम शौनकशाखेसीं || चरणविद्या नवमेसीं ||
पांच कल्प असती ज्यासीं || सांगतों तें श्रवण करा || ८५ ||
ऐसें चौघां शिष्यांसी || सांगे वेद व्यास परियेसीं ||
प्रकाशिले वेद क्षितीशीं || भरतखन्डीं विख्यात पैं || ८६ ||
भरतखन्डीं लोक समस्त || पूर्वी होते पुण्यवन्त ||
वर्णाश्रमधर्में ते आचरत || तया भरतखन्डांत पैं || ८७ ||
वरकड कलियुगाभीतरी || कर्म खोडिले द्विजवरीं ||
लोपले वेद निर्धारीं || गुप्त जाहले क्षितींत पैं || ८८ ||
तुम्ही कर्मभ्रष्ट जाहलां सहज || म्लेंच्छां सांगतां वेदबीज ||
सत्त्व गेलें तुमचें सहज || मंदमती जाहलांतुम्ही || ८९ ||
पित्यासी होतें महत्त्व || तैं तुम्हां नाहीं किंचित ||
विप्रासी लोक देव म्हणत || भूभार जाहले आतां पै || ९० ||
तरी पूर्वी राजे या विप्रांसी || पूजा करती विप्रचरणासी ||
देती द्रव्य गोदानें || परियेसी ती न घेती विप्रपै || ९१ ||
या वेदाचे बोलेंकरून || त्रिमूर्ती त्या विप्रालागोन ||
वश्य होती इंद्रादि देव जाण || भय सांडिती विप्राचें || ९२ ||
शंकर कामधेनू कल्पतरू || विप्रवाक्ये होताती थोरू ||
पर्वता करिती तृणाकारू || ऐसे पूर्वज तुमचे होते || ९३ ||
पोषिती श्रीविष्णु आपण || पुजीतसे विप्रचरण ||
आपुलें दैवत असें जाणून || ऐसे ते विप्र पूर्वीचे || ९४ ||
रहितयाची पुढें एक || वेद म्हणतां तुम्हीं मूर्खलोक ||
तुमचें पाहो नये मुख || ब्रम्हराक्षस तुम्हीं पै || ९५ ||
भिऊन तुम्ही सत्त्व भंगिले || हीनयातीला श्रविलें ||
क्रृयविक्रृय करितां बोले || ऐसे भ्रष्टविले वेद || ९६ ||
श्रवण जाहले चारीवेदांसी || शाखासहपरिवारेंसी ||
कोण जाणती ये क्षितीशीं || सर्व गुप्त राहिले वेद || ९७ ||
तयामध्ये काय लाभ || घेऊं नयें द्विजक्षोभ ||
कोणी केला नाहीं तुम्हां बोध || जावें आतां स्वस्थानासी || ९८ ||
तुम्ही आपुली स्तुती करितां || जयपत्रें दाखवितां ||
त्रिविक्रृमयतीपाशीं तत्त्वतां || पत्र मागतांलिहून || ९९ ||
न कारूं तरी चर्चाआम्ही येथें || हारी दिसे गा जगातें ||
सांगती लोक राजयांतें || महत्व केंवी उरे पैं || १०० ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे वेदविस्तारकथनं नाम षड्विंशोऽध्याय: || २६ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
सांगती श्रीगुरू हितासी || न ऐकती द्विज तामसी ||
वाद किंवा पत्र || आम्हासीं द्याल तें अंगिकारू || १ ||
हंसत नाचत एक मांतंग || जांत असतां मार्गात ||
तयाते श्रीगुरूपाचारित || विप्रांसवें वादार्थ || २ ||
श्रावकट्टष्टी आपण करून || तया पाहती अवलोकुन ||
जाहलें तया दिव्य ज्ञान || चर्चा करी तो विप्रांसवें || ३ ||
साक्षात होऊनी देवराया || उद्धरीं आम्हां श्रीगुरूवर्या ||
ऐसें विनविती स्वामीया || विप्र धरिती चरण पैं || ४ ||
यतिसीं पुसे मातंग जाण || हीनजाती व्हावया कारण ||
तया सांगती श्रीगुरू आपण || पूर्वापर कर्म सफल || ५ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे मदोन्मत्तविप्रशापकथनं नाम सप्तविंशोऽध्याय: || २७ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
त्रिविक्रृमासह सांगती || तया मातंग निश्र्चिंतीं ||
कर्मविपाक सांगती || श्रीगुरू आपण पैं || १ ||
लोकांचें वर्म काढितां आपण || सदा करी उपहास्यता जाण ||
हृदयरोग तयासी उत्तम || महाकष्ट भागतो || २ ||
केल्या पापाचें निवारण || भारती पुसे श्रीगुरूकारण ||
प्रायश्र्चित कोणतें जाण || सांगावें मज स्वामी देखा || ३ ||
शालिग्रामासन्निध देखा || जपावें नारायण प्रश्र्न ऐका ||
नाशी पंच महापातका || प्रीतीपूर्वक जपावें || ४ ||
यथार्थ न वचे ज्यासी हें व्रत || किंवा असेल अशक्त ||
तीळ गूळ लाध पीठ || खावोन उपास करावे || ५ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे कर्मविपाककथनं नाम अष्टाविंशोऽध्याय: || २८ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
ब्रम्हास्वरूपी श्रीगुरू जाण || सांगीतला कर्मविपाक पूर्ण ||
भारती मातंगासीं जाणें || उद्विग्नचित्त नसावें || १ ||
म्हणोन पुसती त्या दोघांसी || काय असे वासना मानसी ||
ते म्हणती श्रीगुरूरायासीं || भस्ममहिमा सांगावा || २ ||
परमात्मा श्रीगुरूराव || सांगती भस्ममाहात्म्य सर्व ||
ऐकतीं भारती समस्त || शिष्यांसह सांगती || ३ ||
रौरव रौरव नरकीं जे पचती जाण || जे वसताती अनुदिन ||
ज्यासीं संगती नाहीं पूर्ण || ते भस्मेंकरून उद्धरती || ४ ||
मानव असे एक राक्षस || तो उद्धरिला देहासहित ||
भस्म लागतां अंगास || पूर्वांपार स्मरता जाहला || ५ ||
मागें जाहली ऐसी कथा || पूर्वी कृतयुगीं जाहली देखा ||
ब्रम्हांडपुराणीं ती निश्र्चिता || ती तुम्ही श्रवण करावी || ६ ||
देतां वामदेव आलिंगन || भस्म लागलें अंगीं पूर्ण ||
ब्रम्हराक्षस उद्धरोन || ती कथा श्रवण करावी || ७ ||
हराचें असे हें भूषण || भस्म लाविलें सर्वांगीं जाण ||
याविषयीं कथा पूर्ण || सांगे वामदेव राक्षसा || ८ ||
महिमा भस्माचा ऐसा || भस्ममाहात्म्य तुम्हासी ||
सांगे वामदेव परियेसी || राक्षसाकारणें देखा || ९ ||
या भस्माचें माहात्म्य || वामदेव सांगे राक्षसालागुन ||
तें श्रवण करा मन:पूर्ण || संशय फिटे मनाचा || १० ||
यथास्थित आख्यान || शिवें सांगितलें ऋषीलागुन ||
तें श्रवण करा तुम्ही पूर्ण || कैसें भस्म लाविलें || ११ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे भस्ममहिमावरणनं नाम एकोनत्रिंशोऽध्याय: || २९ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
ऐसें हें भस्माख्यान || श्रीगुरू सांगती भारती लागोन ||
पुढें काय जाहलें वर्तमान || तें ऐकावें सादर चित्तें || १ ||
नवस केला दत्तात्रयास || एके स्त्रीपुरूषानें तयास ||
पुत्र व्हावा आम्हास || त्यासी नाम ठेवूं तुझें || २ ||
त्यांसी झाला पुत्र देखा || त्या पुत्रासी व्याधी होई निका ||
उपाय करिती माता पिता || तरी आरोग्य नसे पैं || ३ ||
कोठें जावें पतिस घेऊन || ऐसा विचार करी त्याची स्त्री जाण ||
गाणगापूर लक्षोन || येतां वाटेंत मृत्यु आला || ४ ||
ढीगउपाय केले पतिलागुन || यासीं व्हावें आरोग्य जाण ||
तरी ते व्यर्थ म्हणोन रडे जाण || तों चमत्कार जाहला पैं || ५ ||
ब्रम्हस्वरूपी ऐसा तो शंकर || पांघरला असे व्याघ्रांबर ||
शिरीं असती जटाभार || तो येत जवळी पै || ६ ||
म्हातारा ऐसें पुसे तियेसी || कां रडसी मूर्खपणेंसी ||
जैसा पूर्वसंबंध असे ज्यासीं || तैशापरि घडतसे || ७ ||
डंबर भरलें असे देखा || सर्व जगास मृत्यु असे देखा ||
अमर कोण असे भूलोका || पाहें तरी विचारोनी || ८ ||
रूपें घेतलींस तूं लक्षयोनी || तेथें परि किती केले पाहें मनीं ||
त्याचा शोक जेंवीं त्यागोनी || तैसे परी हा जाणें || ९ ||
पाहें आतां मार्ग बरवा || या संसाराचा न करावा हेवा ||
कार्माचा जैसा असे ठेवा || तैसें होणारं तें चुकेना || १० ||
यतीचे धरितसे चरण || म्हणे जें निरोपिलें मजलागोन ||
तैसे परी वर्तोन जाण || संशय असे ऐक पैं || ११ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे मृतद्विजभार्याशोको नाम त्रिंशत्तमोऽध्याय: || ३० ||

|| श्रीगणेशाय नम: ||
त्रिगुणमूर्ति गुरू आपण || तया पतिव्रते लागोन ||
सांगती लोपामुद्रा आख्यान || पतिव्रताधर्म सकळी || १ ||
गुरू बोले पतिव्रतेसी || धर्म पतिव्रतेचे ऐकलेसी ||
पुढें पतिकरितां परियेसीं || सहगमन करावें हा धर्म || २ ||
नानाउपायें करोनी || सहगमन करावें स्त्रियांनी ||
बेचाळीस कुळें उद्धरोनी || सहगमनीं जाती परियेसा || ३ ||
मग म्हणती श्रीगुरू पतिव्रतेसी || ज्या दुराचारी स्त्रिया परियेसी ||
त्यांचे योगें समूळ कुळासी || नरकीं जाणें असे देखा || ४ ||
कोणी जी पतिसेवा करी || मुख तिचें पहावें निरंतरी ||
दुष्ट स्त्री पाहतां दुरी || सचैल स्नान करावें पैं || ५ ||
यथार्थ पतिव्रताआचार || करिती ज्या नारी निरंतर ||
ज्यांचे योगें पुनीत हा संसार || ऐसें सांगती श्रीगुरू || ६ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे पतिव्रताऽख्यानं नाम एकत्रिंशोऽध्याय: || ३१ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
उठोन पुसे श्रीगुरूसी || जवळीं नसतां मृत्यू होय पतिसीं ||
तरी सहगमन परियेसी || करावें कैंसें तें सांगपां || १ ||
पतिस मृत्यु जवळी नसतां || किंवा रोगी गरोदर असतां ||
सहगमनीं युक्त न होतां || वैधव्यपण आचरावें || २ ||
तीस येतां वैधव्यपण || आचरावें कर्मासारखें जाण ||
सहगमनासम आहे पुण्य || पतिव्रते जाणावें || ३ ||
स्थिती असावी कोणे रीती || विधवाधर्म सांगे बृहस्पती ||
तो श्रवण करीं वो सती || सविस्तार सांद्यंत || ४ ||
तीणें ती कथ सविस्तर || श्रवण केला वैधव्यआचार ||
स्तुती करूनी जोडले कर || मस्तक ठेवी गुरूचरणीं || ५ ||
प्रसन्न जाहले यतिवर || देते जाहले तीतें अक्षयवर ||
पतिसह तूं राहें निरंतर || इह पुत्रसुख पूर्ण भोगीं || ६ ||
लक्ष्य ठेऊन श्रीगुरूचरणीं || आलीस तूं भेटीलागोनी ||
तरी आतां दर्शन घेवोनी || सहगमनीं मग जावें || ७ ||
यथार्थ जावोनी परियेसीं || नमिती जाहली श्रीगुरूचरणासी ||
गुरू देंती वर तियेसीं || अक्षयसौभाग्यवती तुझें नांव || ८ ||
काढून मग वल्लीस || अमृतद्दष्टी लावून प्रेतास ||
तात्काळ उठतसे पति सत्य || तो पुढें स्त्रीचे लागीं || ९ ||
राहोन उभा श्रीगुरू सन्मुख || हस्त जोडोनी स्तुती करित ||
सर्व जन पाहती कौतुक || आंनद चित्तीं न समाये || १० ||
यथाविधी पतिसहित || स्नान केलें संगमांत ||
मनीं हर्ष जाहला बहुत || पूजी श्रीगुरूचरण पैं || ११ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे प्रेतसंजीवनं नाम द्वात्रिंशोऽध्याय: || ३२ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
दिधला मज वर जाणीं || बुद्धि वाद सांगीतला कर्णीं ||
ऐसा यति एक येवोनी || सांगे तो कोण गुरूदेवा || १ ||
गत दिवशीं हें असे जाहलें || सांगीतलें मग वहिलें ||
रूद्रसूक्त श्रीगुरू पाऊलें || अभिषेकोनी दर्शन घेईं || २ ||
बरवें पुशिलें आम्हांसी || रूद्रसूक्त रूद्राक्षासी ||
महात्म्य सांगे || षिसी || स्कंधपुराणीं कथा परियेसा || ३ ||
राजा काश्मीरदेशींचा || ब्रम्हा आपण || त्याचा नातु पाराशर जाण ||
ती कथा निरोपीं साचा || पाराशर वाक्य परिसा साच || कथा ते श्रवण करीं || ४ ||
यथामती जे कथा करिती श्रवण || पातकें त्यांचीं जाती जळोन ||
अपमृत्यु गंडांतर जाण || पुनीत होती ते नर || ५ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे रुद्राक्षमहात्म्यं नाम त्रयत्रिंशतमोऽध्याय: || ३३ ||


|| श्रीगणेशाय नम: ||
सृष्टिकर्ता तो पाराशर || ही कथा तेणें निरोपिली साचांर ||
रूद्राक्षमहिमा परिकर || आहे ऐसा तूं जाण || १ ||
सृष्टीऐसा तो सांगे रूद्राख्यान || श्रवण करी राजा परियेसा || २ ||
स्थिर करोनी आतां मानस || भविष्य ऐके सावकाश ||
पाराशर सांगे रायास || ती कथा तूं श्रवण करीं || ३ ||
त्यजुनीयां सर्व भोग || शतरूद्र करितसे यथासांग ||
सप्त दिन होतां सवेग || बाल पडला निचेष्टित || ४ ||
ते वेळीं शिव आपण येवोन || रक्षितसे बाळाचा प्राण ||
यमातें स्वत: सांगोन || आशिर्वाद देते जाहले || ५ ||
प्रत्येक्ष पाहे याचा प्रत्यय || ऐकतां तो रूद्राध्याय ||
तव पति पावलासे यमालय || तो परत आला पैं || ६ ||
लक्ष्मीकांत जगदगुरू || तुझे स्थान असे माझें माहेरू ||
तरी न सोडावें हें सदगुरू || राहावें ऐसें वाटतसे || ७ ||
यती जो भेटला तो मीच जाण || तुझा भाव पहावयालागुन ||
घेतलें रूप तें मीच जाण || पाहें आतां प्रत्यक्ष || ८ ||
रूप धरिलेंमग यतीचें || प्रत्यक्ष शंकर रूप साचें ||
पाहतां दंपती वाचे || स्तुतीस्तोत्र करीतसे || ९ ||
पाहोन रूप शंकराचे || दंपती होती महा हरिखें ||
रूद्रमाहात्म्य श्रवणाचें || प्रत्यक्ष दर्शन फळ पैं || १० ||
यथोपचारें मग करोनी || पूजिती शंकरालागोनी ||
काळाचें भय गेलें पळोनी || दंपतीतीं आनंदती || ११ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे रुद्राध्यायमहिमावर्णनं नाम चतुस्त्रिंशतमोऽध्याय: || ३४ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
ॐकारस्वरूपासी || विनवून म्हणती तयासी ||
आम्हां एकदा मंत्र देसी || जेणें सुख होय देखा || १ ||
भूवरी ऐसें शुक्राचार्यासी || उपदेश होतां स्त्रियांसी ||
विघ्न झालें त्याचे मंत्रासी || स्त्रियां उपदेश नसे पैं || २ ||
तयासीं जाहलें कैसेंविघ्न || तें सांगावें विस्तारोन ||
म्हणोन धरियले चरण || करूणावचनें करोनी || ३ ||
सर्व दैत्यांचें सैन्य पडे रणीं || शुक्र जाणोन संजीविनी ||
सर्व सैन्यातें उठवोनी || पुन्हां युद्धा पाठवीत || ४ ||
विसाव्याचे दिवसीं || इंद्र जातसे कैलासासीं ||
सांगे वर्तमान शंकरासी || शुक्राची मंत्रकरणी पैं || ५ ||
तों जावोनी सत्वर || नंदीस सांगते झाले ईश्र्वर ||
शुकाचार्या आणावें सत्वर || ऐसे शंकर सांगे नन्दीसी || ६ ||
वर्ततां ऐसें कांहीं दिवसावरी || शुकाचार्य राहतसे उदरीं ||
शिवाचे मूत्रांतुनी बाहेरी || निघून गेले शुक्र पैं || ७ ||
रेतद्वारा झाला उदभव || म्हणोनी नाम पावले भार्गव ||
पूर्वी होतें जैसें नांव || तो शुक्र संजीविनी जपे पैं || ८ ||
बुद्धिवान ऐसा तो बृहस्पती || तयासी इंद्र सांगे निश्र्चितीं ||
शुकासीं विघ्न करा रीती || बुद्धी कांहीं योजावी || ९ ||
भूदेव म्हणे इन्द्ररायासी उपाय || एक असे यासी ||
षटकर्णी करितां मंत्रासी || सामर्थ्य जाईल देखा || १० ||
वोखटें होय शुक्रासी || ऐसा उपाय योजावां परियेसी ||
विद्यार्थी होऊन तयापासी || मंत्रषट्रकर्ण त्याणें करावा || ११ ||
भक्त एक माझा कच असे || त्यासीं पाठवावा विद्याभ्यासें ||
बृहस्पती सांगतसे || त्वां जावें शुकाचें गृहीं || १२ ||
गोष्ट गुप्त ठेवोन त्यापासीं || सादर असावें सेवेसीं ||
संजीवनी मंत्र तूं वेगेंसीं || साधीं गा पुत्रा कचा || १३ ||
देखोन तो शुकासी || नमीतसे सांष्टांगेंसी ||
उभा राहिला सन्मुखेंसी || पुसता झाला शुक पैं || १४ ||
वक्तृत्व करितसे कुमर || तुझी कीर्ती ऐकिली फार ||
विद्याभ्यासा मी सत्त्वर || तव सन्मुख पातलों || १५ ||
लक्षोन धरी तो चरण || म्हणे आलों असें इच्छा धरून ||
तूं भक्तांसी तारिता म्हणोन || ऐकत असें जाण पां || १६ ||
धीरें धीरें विद्याभ्यास करीत || होता गृहीं राहोन निश्र्चित ||
दैत्य आळखिती तयास || मग कपट आरंभिलों || १७ ||
मनीं विचार करिती राक्षस || शिकेल हा येथें मन्त्रास ||
जावोन सांगेल देवांस || कुडें मगपडेल गुरूसी || १८ ||
ही गोष्ट मनीं ते रक्षस आणोनी || केली बुद्धी विपरीत त्यांनीं ||
कचा बाहेर नेवोनी || मारिते झाले दैत्य पैं || १९ ||
सुख मग जाहलें दैत्यांसी || मेळवून आणी मद्यरसासी ||
स्निग्ध करून बहुवसी || पाजिते झाले गुरूतें || २० ||
वसतसे आपुले अंगीं || पाहतां दिसूं लागला मनीं ||
संदेह पडला शुक्रालागीं || कैसें करावें म्हणतसे || २१ ||
धीर धरून मग शुक्र देखा || बोले कच नये बाहेर देखा ||
माजे उदरीं असे निका || कैसा काढूं मी तयासीं || २२ ||
यासी काढितां आपणासी मृत्यु होय मज परियेसी ||
कैसा करावा उपाय यासी || म्हणोनी कन्येप्रती पुसतसे || २३ ||
देवयानी म्हणे पितयासी || सर्वासी तूं वाचविसी ||
प्राण जाईल असें म्हणसी || मजलगीं हें आश्र्चर्य वाटे || २४ ||
नये सांगूं मंत्र कोणासी || षटकर्ण होतां जाईल गुणासी ||
कचा कारणें मग प्राणासी || जाईल गे परियेसा || २५ ||
प्रथमतां मंत्र कन्येसीं सांगतां || तीन वेळमंत्र जपतां ||
कचानें पाठ केला तत्वतां || मंत्र षटकर्णी जाहला पैं || २६ ||
चौथ्यानें मंत्र जपतां क्षणीं || कच निघाला पोट फोडोनी ||
मंत्र जपोनी मग देवयानी || पित्याप्रती उठवीत || २७ ||
दयेनें स्वामी विद्या शिकलों || देवकार्यार्थ संतोषलों ||
तुझ्या कृपेनें मी तरलों || म्हणोन चरण धरीतसे || २८ ||
याकारणें श्रीगुरू सांगत || न सांगता स्त्रियांसी मंत्र ||
शुकाचा संजीविनी मंत्र || निष्कामी जाहला देखा || २९ ||
तव चरणी तरी भक्ती राहोनी || निरोपावे व्रत मजलागोनी ||
पतिव्रता लागे चरणीं || कृपा करावी मजवरी || ३० ||
व्रत एक परियेसीं || गुरू सांगती पतिव्रतेसी ||
स्थिर करूनी मानसीं || व्रतें पावे राज्यपद || ३१ ||
भूतदयावन्त श्रीगुरूनाथ || सांगती निश्र्चयेंसीं पंथ ||
विस्तारोनी बोलती तीस || व्रत तीसीं सांगती ते || ३२ ||
भूरूपी आपण श्रीगुरू || सांगती व्रतविस्तारू ||
म्हणती पतिवत्रते साचारू || व्रत बरवे सांगतों पैं || ३३ ||
वर्णाश्रमवासी लोकांसीं || सोमवार व्रत असें विशेषीं ||
आराधितां शंकरासी || तेणें करून फळ दे तो || ३४ ||
तरी व्रताचें पूर्वानुसंधान || सांगतों ऐकावें तें गहन ||
ऐकतां पापें जाती पळोन || ऐसें श्रवणें फळ देखा || ३५ ||
स्कंधपुराणी सर्व ही कथा || ऐकोनी तुम्हीं साद्यंता ||
पूर्वयुगीं राजा आर्यावर्ता || सार्वभौम तो असे || ३६ ||
विविध पुण्य आचरोनी || शिवासी तेणें आराधोनी ||
पुत्रकामना होती मनीं || तों कन्या जाहली तयासीं || ३७ ||
तुपीरनामें एक ब्राम्हण || सांगतां जाहला कन्या लक्षण ||
चौदावे वर्षी वैधव्यपण || होईल राजा कन्येसी || ३८ ||
वचन तयाचें ऐकोनी || राजा पडला मूर्छागत होवोनी ||
चिंता वर्तली बहु मनीं || विप्रवाक्य ऐकतांची || ३९ ||
रेवानामें सखीलागोनी || कन्या खेळे राजांगणीं ||
बोलतां ऐकलें तिणें कर्णी || चौदावे वर्षी वैधव्य पैं || ४० ||
याज्ञावल्क्याची पत्नी || नाम तिचें मैत्रायणी ||
तियेसी घरीं पाचारोनी || चरण धरितसे ती कन्या || ४१ ||
भक्तिपूर्वक तियेतें नमोनी || करसंपुष्ट जोडोनी ||
विनवीतसे करूणावचनीं || प्रतिपाळावें आम्हांतें || ४२ ||
गोष्ट पुसणें आहे आम्हासी || अहेबपण स्थीर होण्यासी ||
उपाय सांगे वौ मजसी || माता होवोन प्रतिपाळावें || ४३ ||
देती जाहली सोमवारव्रतासी || पूजा सांगे शिवाची तिसी ||
उपोषित रहावें ते दिवशीं || व्रत नेमानें आचरावें || ४४ ||
वर्षत्रयपर्यत करावें व्रत || किंवा अक्षय करीं वो सत्य ||
भय आलें जरी निश्र्चित || तरी हें व्रत न सोडावें || ४५ ||
सीमंतिणी ऐकतां त्वरीत || सोमवारीं गौरीहरा पूजित ||
दुरित गेलें समस्त || व्रतप्रतापेंकरोनिया || ४६ ||
धि:कारोन समस्तांसी || व्रत करितसे हर्षी ||
सर्व दुरितें गेलीं निश्र्चयेंसीं || तो लग्ना योग्य जाहली || ४७ ||
मोहोत्साह करी राजा देखा || पाचारलें राजा विवाहिकां ||
लग्न केलें अति कौंतुका || आनंद जाहला तयासी || ४८ ||
हिरण्यादी नानालंकार || देता जाहला विप्रां नृपवर ||
अखिल दानें सोपस्कार || याचकांलागीं देतसे || ४९ ||
पुत्रासम पाळी जामात || श्र्वशुरगृहीं राहे पत्नीसहीत ||
ऐसें किती दिवसपर्यत || आनंद होतसे परियेसा || ५० ||
वर्ततां ऐसें एके दिवशीं || जलक्रीडे जातसे नदीसीं
सर्व दळ घेऊन समागमेंसी || नदीतीरा पावला || ५१ ||
धीरें फिरतां नदींत नौका || बुडाली अकस्मात देखा ||
आकांत करिती सकळिका || काढा ऐसें म्हणताती || ५२ ||
योगेश्र्वरा त्रिपुरांतका || शरणागत मी रिघालें देखा ||
मरण दिधलें पतीतें ऐका || मजला कैसें न दिधलें || ५३ ||
आठवोनी ती याज्ञवल्क्यपत्नीसी || स्मरण करी वेगेंसी ||
व्रत सांगितलें त्वां मजसी || सौभाग्यदायक म्हणोनी || ५४ ||
नमोनियां मग द्विजासी || विचार पुसे सहगमनासी ||
विप्र सांगती कन्येसी || प्रतावेगळें न घडे देखा || ५५ ||
प्रस्तुत तू आतां ऐसें करणें || प्रेत सांपडे तों राहणें ||
ऐकोनी विप्राचीं वचनें || उगीच राहे सीमंतिनी || ५६ ||
चौप्रहर मग करी शिवचिंतन || नमोनी करी ती व्रत पूर्ण ||
सोमवारीं उपासी बसोन || व्रत पूर्वी केलें तैसेंकरी || ५७ ||
नागलोकींच्या येऊन नारी || बसल्या होत्या नदीतीरीं ||
त्या नेत्या जाहल्या सत्वरी || राजकुमरा पाताळीं || ५८ ||
पुसतसे पुत्रासी शेष || कोणे कारणें तूं आलास ||
ऐसें पुसे तक्षक तयास || कोण देश कोण वंश पैं || ५९ ||
तयासी सांगे कुमार देखा || भूमंडळीं राहणें माझें ऐका ||
नैषधराजा पुण्यात्मा निका || त्याचा असें मी पुत्र || ६० ||
वोखटें वाटे राजकुमारासी || एकला मी पित्याच्या कुशीं ||
भार्या असे चतुर्दश वर्षी || शिवपूजनीं रत सदा || ६१ ||
भूदेव मिळो केलें पाणिग्रहण || गुंतलें असे तेथेंमन ||
पाहिन पित्याचे चरण || तेणें सर्वस्व पावेन || ६२ ||
विधिवशें बुडलोंनदींत || पिता माता दु:खें व्याप्त ||
पत्नी जीव त्यागील सत्य || ती हत्या घडेल परियेसा || ६३ ||
वचन तुझें अमृतासमान || तें ऐकोन मी झालों धन्य ||
रक्षीं आतां माझा प्राण || भेटवीं माता पिता पत्नी || ६४ ||
सुख जाहलें मग तक्षकास || रत्नें नानावस्तु दिल्या तयास ||
अमृता पाजिलें तयास || दुसरे दिधलें स्त्रियेसीं || ६५ ||
वस्त्रे भूषणें अलौकिक || हत्ती तुरंग नाना रत्नें देख ||
देतसे तो तक्षक || आणि सवें देत कुमार आपुला || ६६ ||
तक्षका नमोनी मग त्वरित || वारूवर बैसे राजसुत ||
मनोवेगें मार्ग क्रमित || येता जाहला नदीतीरीं || ६७ ||
सख्यां सहित ते दिवसीं || सीमंतिणी आली स्नानासी ||
सोमवार असे ते दिवसीं || नदीतीरीं उभी असे || ६८ ||
विधि गंधर्व किंवा तुम्ही कोण || नर किन्नर ही सांगा खूण ||
सिद्ध किंवा साधू पूर्ण || वर्तमान सांगा मातें || ६९ ||
तुम्ही पुसतां मजलागोनी || तरी तुम्हीं कोण हें सांगा पूर्वी ||
स्नेह वाटे माझे मनीं || न कळे खूण आपुली || ७० ||
ओळखोन पतीचें रूप || करों लागली ती प्रलाप ||
धरणीवरी पडली मूर्छागत || नेत्रोदक वहातसे || ७१ ||
राव दावी खुण तियेसी || सांगे तुझा भर्ता मी परियेसी ||
देखिली तुज मी ट्टष्टीशीं || सुखें राहावें तूं आतां || ७२ ||
तयासी जाणोनी सीमंतिनी || स्त्र्रवों लागल्या धारा लोचनीं ||
विचार करीं ती मनीं || माझा पती हाचि पूर्ण || ७३ ||
भर्त्याचें जाणोन लक्षण || पाहिली मी सर्व खुण ||
हा सत्य माझा पती पूर्ण || समस्तचिन्हीं युक्त पैं || ७४ ||
गोड वटतसे माझे मनीं || धारा फुटती लोचनीं ||
नमन करी आपुले मनीं || आनुमानें बोलतसे || ७५ ||
देव होईल साह्य आपणा || तरी जोडेल पतीनिधन ||
बुडाला नदींत तों पुन्हा || मागुती कैंचा प्रगटेल || ७६ ||
वधु म्हणे हा होईल वेषधारी || राक्षस किंवा किन्नरी ||
निघाला कपटें नदीतरीं || ऐसी कल्पना करी ती || ७७ ||
सीमंतिनी बोले निर्धार || होतो प्रसन्न शंकर ||
काय उणें पडेल निर्धार || शंकरप्रसादें दु:ख कैंचैं || ७८ ||
धीरे बोलतसे राजपुत्र || पुसोन आरूढें वारूवर ||
निरोप मागोन सत्वर || सीमंतिनी नारींसी || ७९ ||
मग निघे तो अश्र्ववेगें || पावला स्वनगरा सवेगें ||
वासुकीपुत्र होता संगें || तया पाठवी नगरांत || ८० ||
ही गोष्ट सांग तूं वेगेसीं || जावें माझे वैरियापासीं ||
न ऐकती तुझे वचनासी || मग नाश होईल म्हणावें || ८१ ||
धिक्कारोनी वैरियासी || तक्षकपुत्र सांगे त्यासी ||
चाड असेल जरी प्राणांसी || तरी शरण यावें पैं || ८२ ||
योगीयांमाजी तक्षक भला || त्यानें मित्रभाग जोडला ||
दिधले नवसहस्त्र्र नाग बळा || राजपुत्रा कारणें पैं || ८३ ||
यास्तव माझें वचन || न ऐकतां घेईन तुमचा प्राण ||
तक्षकें पाठविलेंजाण || परिपत्याकारणें || ८४ ||
नमोनियां इंद्रसेनासी || तक्षकपुत्र सांगे तयासी ||
तुझा पुत्र आला हर्षी || वासुकीनें धाडिला पैं || ८५ ||
प्रजा पुरोहितासहित || लोक निघाले समस्त ||
कौतुक पहा म्हणत || मेलेला पुत्र कैचा आला || ८६ ||
चोहोंवर्णा आनंद जाहला || राजा मनीं संतोषला ||
पाहेन मी पुत्र ये डोळां || अति आवडीनें निघतसे || ८७ ||
दर्शन होतां राजपुत्रासी || भेटती दोघे ऐकमेकांसी ||
चंद्रांगद पित्यासी || नमस्कार करी पैं || ८८ ||
याप्रमाणें माता पित्यासी भेटून || दु:ख करी तो दारूण ||
विनवी कर जोडोन || मजनिमित्त कष्ट तुम्हां || ८९ ||
तक्षकाचे पुत्रासीं || गौरविलें आलंकार भूषणेंसी ||
देता जाहला परियेसीं || राजा इंद्रसेन देखा || ९० ||
औक्षण केलें पुत्रालागोन || सन्निध तया बैसवोन ||
पुसता झाला वर्तमान || चंद्रांगद सांगे इतिहास || ९१ ||
त्यातें संदर वस्त्राभरणें || दिधलीं होतीं जो तक्षकानें ||
पिता देखोन तीं || संतुष्टमनें म्हणे धन्य तक्षक पैं || ९२ ||
घृत दूध शर्करेसीं || भोजन केलें तक्षकपुत्रासी ||
सांगता जाहला अतिहर्षी || ऐकें ऐसें पतिव्रते || ९३ ||
निरोपी मग नागकुमरासी || बोलाविणें जावें श्र्वसुरासी ||
भृत्य पाठवा वेगेंसीं || चित्रवर्मा राजाकारणें || ९४ ||
सून माझी दैवाआगळी || धरे धर्म तीचा बळी ||
राव म्हणतसे ते वेळीं || पुत्र अमृत पावला पैं || ९५ ||
रक्षित असतां शंकर || आणिक तिचें सौभाग्य स्थिर ||
तेणें वाचला मम पुत्र || शंकर कृपा होतां जाणें || ९६ ||
इत्थंभूत सांगती हेर सत्वरीं || चित्रवर्म्याचि ये नारी ||
व्यवस्था सांगती हर्षभरी || चंद्रांगदाची शुभ वार्ता || ९७ ||
आनंद राजा इन्द्रसेना सत्वर || पुन्हां वराड करी परिकर ||
चंद्रांगदाचा बडीवार || सेना घेऊन येत नगरा पैं || ९८ ||
दिधले बहुत वस्त्रालंकार || वराड होतसे धुरंधर ||
चंद्रांगद स्वमंदिरा सत्वर || सीमंतिनीसी भेटे प्रीतीनें || ९९ ||
त्यांनीं जाऊन मग स्वनगरासी || राज्य दिधलें पुत्रांसी ||
दश सहस्त्र्र वर्षे राज्यासी || केलें चंद्रांगदें पैं || १०० ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे सीमंतिनी आख्यान सीमंतिन्याख्यानकथनं नाम पंचत्रिंशतमोऽध्याय: || ३५ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
जातीचा असे विप्र वेदरत || असे तया गाणगापुरांत ||
विरक्त आणि बहुश्रुत || कर्ममार्गे निरन्तर वर्ते || १ ||
तया ग्रामीं प्रति दिवसीं || विप्र येती समाराधनेसी ||
सहस्त्र्र संख्या विप्रासी || मिष्टन्न भोजन देताती || २ ||
वेदरत विप्राचिये नारी || नाना तरयेनें दु:ख करी ||
परान्न न मिळे आम्हं श्रीहरी || म्हणोनी असे चिंताग्रस्त || ३ ||
दक्षिणा वस्त्र द्रव्य दान || देतो महाधनिक जाण ||
पतिसी सांगे श्रेसें वर्तमान || आमंत्रण वार्ता देखा || ४ ||
सेवक मी असे स्वामी तुमची || वार्ता न ऐके बरवे अन्नाची ||
तरी सांगा स्वामी पतिसी || आमंत्रणा जावें भोजना || ५ ||
सुचवी ऐसें श्रीगुरूलागोन || गुरूमूर्ती हास्यवदन ||
बोलाविती विप्रालागुन || सांगती गुरू परियेसा || ६ ||
नमितो विप्र श्रीगुरूलागोन || विनवीतसे कर जोडोन ||
परान्नाचा नेम आपणां || श्रीगुरू आपण जाणता || ७ ||
वाढिती पात्र मग दंपतीसी || नानापरी मिष्टान्नेंसी ||
संकल्प करितसे नेमेसी || पितृनामोच्चार करूनियां || ८ ||
मग भोजना करितां तियेंसी || दिसों लागलें विपरीतेंसी ||
श्र्वान सूकर अतिहर्षी || समागमें जेविताती || ९ ||
म्हणे तो सौभाग्यवतीसी || कैसें सुख परान्नेंसी ||
सदा दु:ख पतिसी देसी || पुरले कीं तुझे मनोरथ || १० ||
मग ती श्रीगुरूवचन ऐकोनी || लागतसे श्रीगुरूचरणीं ||
विनवितसे कर जोडोनी || क्षमा करणें अपराधा || ११ ||
मग चिंताकार वसे द्विजवरू || म्हणे स्वामी काय करू ||
दोष घडला मज अपारू || व्रतभंग जाहला देखा || १२ ||
राहिलें कार्य विप्रालागुन || तयाचे घरीं घ्यावें अन्न ||
मग करावें गायत्री जप || दोष मग तया न राहती || १३ ||
तिरस्कारावें दानासी || कोणे गृहीं न जेवावें परियेसी ||
विप्र म्हणतो श्रीगुरूसी || सांगावें मज स्वामी पैं || १४ ||
यथाविधी चन्द्रसूर्यग्रहणीं || दान घेऊं नये विप्रानीं ||
जेऊं नये जामातगृहीं || व्रतदिनीं मृतसुतका || १५ ||
तो विप्र विनवी स्वामीसी || माझी विनंती ऐकावी परियेसी ||
सकळ आचार धर्मेसी || निरोपावे स्वामीगा || १६ ||
नीती आहे पाराशरस्मृतिसी || आचार धर्म सकळेंसी ||
जेणें होय अप्रयासीं || सर्व सिद्धी ते व्हावी || १७ ||
दर्भासनीं बैसोन प्रात:काळीं || गुरूस्मरण करावें सकळीं ||
तीन मूर्तीआ घ्यावा तें वेळी || ब्राम्हमुहूर्ती देखा || १८ ||
हा प्रकार करा प्रात:स्मरणीं || मग जावें उठोनी ||
लघुशंकेसी जावें आपणी || शौचाचमन करावें || १९ ||
तेंही सांगे पराशर || षी || ऐकें आचारविधीसी ||
आचमन सांगतों विस्तारेंसी || जे जे समयीं करणें पैं || २० ||
वेळेस नेहमीं करावें आचमन || स्नान निद्रा होतां जाण ||
भोजन जांभई शिंका पूर्ण || आचमन करावें || २१ ||
सर्व गायत्रीजपाव्यतिरिक्त || वरकड दुसरे न जपावे मंत्र ||
अरूणोदय होतां सत्य || बहिर्भूमी जाईजे || २२ ||
न बैसावें पृहृवीवरी || बैसावें पान गवतावरी ||
हिरवें पान करावें दुरी || शुष्कपर्णी बैसावें || २३ ||
परि मृत्तिका शौचविधान || मूत्र शंकेसी एकगुण ||
बहिर्भूमीसी करावें द्विगुण || मैथुनांतीं त्रिगुण पैं || २४ ||
खदीर करंज आघाडेसी || औदुंबरार्कवटपर्णेसी ||
किंवा वृक्ष करंवदेसी || दन्तधावन काष्ठ घेई || २५ ||
दन्तधावन काष्ठ घेऊन || मग करावें प्रात:स्नान ||
तेणें होईल साधन || तेजो बळ आयुष्य वाढें पैं || २६ ||
तीर्थी प्रात:स्नान करण्यासी || सीतोदक उक्तेसी ||
अशक्ता असे देहासी || तरी गृहीं उष्णोदकें करावें || २७ ||
दुसरें मंगलस्नानविधान || सांगतो ऐक ब्राम्हणा ||
भानुवारीं निषेध जाण || ज्वररोंगी दु:खी पैं || २८ ||
गायनरोदनवमनांतीं || मैथुनदु:स्वप्नस्न स्पर्शातीं ||
स्नानावेगळे शुद्ध न होती || स्नान करावें परियेसा || २९ ||
निळें काळें रक्त जीर्ण वस्त्र || ओलें अर्धवस्त्र नेसत ||
तेणें पुण्य राक्षसा जात || एक वस्त्र असतां पैं || ३० ||
विधिपूर्वक वस्त्र नेसल्यावरी || विभूती लावावी शरीरीं ||
मंत्रविधान पुरस्सरीं || भस्म धारण करावें || ३१ ||
स्वाहाकार विवाह दिवसीं || वेदकृत्य आनंदोत्साहेंसीं ||
अभ्यंग स्नानानंतरेंसी || भस्म गोपिचंदन वर्जावें || ३२ ||
नागरमोथे दर्भदूर्वा उशीर || कुश काश कुंद मौजिर ||
गोधूम व्रीही परिकर || दश दर्भ हे मुख्य देखा || ३३ ||
वैश्य क्षत्रियां दर्भ परियेसी || एक नेमिला शुद्रासी ||
चार दर्भ ब्राम्हणासी || चतुर्वर्णी दर्भ असावे || ३४ ||
वर्तुळाकार भोजनेवेळी || ब्रम्ह्यज्ञजपकाळी ||
ग्रंथी बांधिजे कुशमेळी || ब्राम्हणें ऐसें करावें || ३५ ||
शिखास्थानी दर्भ देखा || हस्तीं नवरत्नमुद्रिका ||
अथवा ऐखादें रत्न असतां || पापे तया न लागती || ३६ ||
धुवोनियां हस्त जाण || आरंभावे प्रात:संध्याविधान ||
नक्षत्र असतां प्रारंभोन || अर्घ्य द्यावें सूर्योदयीं || ३७ ||
दुरित पाताके जाण्याकरितां || गायत्रीमंत्र जपावा त्वरिता ||
आसनी बैसावें निगुता || दर्भ पाणी धरावे पैं || ३८ ||
रिक्तहस्तेंकरून || देवेतार्थी करावें द्विराचमन ||
विष्णुनामे प्राणायाम करून || न्यास करावा परियेसा || ३९ ||
तांत्रिक ऐसे करोनी || प्राणायाम करा तीनी ||
त्रिपाद गायत्री जपे कोणी || जपणारासी सर्व सिद्धी || ४० ||
अर्घ्य द्यावयाचे विधान || सांगतो ऐक ब्राम्हणा ||
गोश्रृंगाइतके उंच करोन || अर्घ्य द्यावें सूर्यासी || ४१ ||
नित्य संध्या बाहेर करी जाण || सुरापानादि दिवा मैथुन ||
अनृतवाक्य पातकी जाण || जळोन जाती पैं देखा || ४२ ||
ॐमित्येकाक्षर मंत्र || जपावा तुम्हीं पवित्र ||
ध्यानीं आणावा गायत्रीमंत्र || सर्व पातकें हरती देखा || ४३ ||
तवर्णाक्षरमंत्रासी || असती रूपपुष्प वर्णेसी ||
विद्रुप पापें जाती परियेसी || गुप्तस्थानी जपावा || ४४ ||
सवर्णाक्षर मंत्रेसी || असे रूप पीतवर्णेसी ||
समस्त पापें जाती परियेसी || जंघस्थानी जपावा || ४५ ||
विवर्णाक्षर मंत्रेसी || इंद्रनील विद्युद्वर्णेसी ||
महारोगादी पापें जाती परियेसी || जानुस्थानीं जपावा || ४६ ||
तुवर्णाक्षर मंत्रेसी || वन्हीरूप सोम्यत्व वर्णेसी ||
भ्रूणुहत्यादि पापासी || जानु स्थानीं जपावा || ४७ ||
ववर्णाक्षर मंत्रेसी || सुवर्णरूप परियेसी ||
अघौघादि पापें जाती || गुह्य स्थानीं जपावा || ४८ ||
रेवर्णाक्षर मंत्रासी || रजतरूपश्वेतवर्णेसी ||
रेतस्कंदादि पापें जाती परियेसी || लिंगस्थानी जपावा || ४९ ||
ण्यवर्णाक्षर मंत्रासी || विद्युत्प्रकाश रक्तवर्णेसी ||
अभक्ष्यादि पापें जाती परियेसी || वृषभस्थानी जपावा || ५० ||
भवर्णाक्षर मंत्रासी || कृष्णमेघ सुनील वर्णेसी ||
गुरूहत्यादि पापें विनाशी || नाभीस्थानीं जपावा || ५१ ||
गोवर्णाक्षर मंत्रासी || इंद्र मेघरूप रक्तवर्णेसी ||
गोहत्यादि पापें जाती परियेसी || उदरस्थानी जपावें || ५२ ||
देवर्णाक्षर मंत्रासी || वामदेवरूप गंधर्ववर्णेसी ||
स्त्र्रीहत्यादि पापें जाती परियेसी || स्तनस्थानी जपावा || ५३ ||
यवर्णाक्षर मंत्रासी || सुवर्णरूप सुवर्णवर्णेसी ||
मिहृयाशब्दपापें जाती परियेंसी || थ्दयस्थानीं जपावा || ५४ ||
स्यवर्णाक्षर मंत्रासी || भिन्नरूप कांचनवर्णेसी ||
मार्जरि कुक्कुट पापें जती परियेसी || कंठस्थानीं जपावा || ५५ ||
धीवर्णाक्षर मंत्रेसी || त्वष्टादेवरूप शुक्लवर्णेसी ||
पितृहत्यादि पापें जाती परियेसी || दन्तस्थानी जपावा || ५६ ||
मवर्णाक्षर मंत्रेसी || वासुदेवरूप पदमवर्णेसी ||
समस्त जन्मपापें जाती परियेसी || तालुस्थानीं जपावा || ५७ ||
हिवर्णाक्षर मंत्रासी || अश्र्विनीदेवरूप शंखवर्णेसी ||
महादोषादि पापें जाती परियेसी || नासिकास्थानीं जपावा || ५८ ||
धिवर्णाक्षर मंत्रासी || सोमदेव पांडुरवर्णेसी ||
पाणिग्रहणादि पापें जाती परियेसी || नेत्रस्थानी जपावा || ५९ ||
योवर्णाक्षर मंत्रासी || विष्णुदेवरूप रक्त गोर वर्णेसी ||
प्राणिवधादि पापें जाती परियेसी || भ्रूमध्यें जपावा || ६० ||
योवर्णाक्षर मंत्रेंसी || शक्तिदेवरूप रूक्भाम वर्णेसी ||
सर्व पापें जाती परियेसी || ललाटस्थानी जपावा || ६१ ||
नवर्णाक्षर मंत्रेसी || अश्र्विनौदेव सूर्यतेज वर्णेसी ||
ब्रम्हवधादि पापें जाती परियेसी || पूर्वदिशेस जपावा || ६२ ||
प्रवर्णाक्षर मंत्रासी || प्रजापती देवरूप नीळवर्णेसी ||
विष्णु सायुज पावणें परियेसी || दक्षिणदिशेस जपावा || ६३ ||
चोवर्णाक्षर मंत्रासी || विष्णु देवरूप कुंकुमवर्णेसी ||
सर्वदेवपद पावणें परियेसी || पश्र्चिम दिशेस जपावा || ६४ ||
दवर्णाक्षर मंत्रेसी || नृसिंह देवरूप शुक्लवर्णेसी ||
कैलासपद पावणे परियेसी || उत्तरदिशे जपावा || ६५ ||
यावर्णाक्षर मंत्रेसी || विष्णुदेवरूप नीलवर्णेसी ||
ब्रम्हलोकपद पावणें परियेसी || रुध्वस्थानीं जपावा || ६६ ||
तवर्णाक्षर मंत्रासी || ब्रम्हदेवरूप सुर्वणवर्णेसी ||
विष्णुलोकपद पावणें परियेसी || शिरस्थानीं जपावा || ६७ ||
ऐसें चोविसक्षर मंत्रासी || हस्त ठेवोनिया शिरसि ||
जप करितां विधीसी || पुनरावृत्ती नसे तयां || ६८ ||
बहुत प्रकार जपास ध्यानीं || जपातां नासिकाग्र नयनीं ||
अतिषडंग न्यासोनी || जप करितां पुनीत पैं || ६९ ||
करितां गायत्री प्रशंसा || मंत्रनाम असे विशेषा ||
ह्या अक्षरें पाप हरे देखा || एकचित्तें पयियेसा || ७० ||
एकवट करूनी मन जाण || जप करितां अनुदित ||
मकार हें आपुलें मन || नकार जाणें प्राण पैं || ७१ ||
ज्याप्य ऐंसे अक्षरें दोन्ही || प्रख्यात असती त्रिभुवनीं ||
जकारजन्म विच्छेदोनी || पकार पापें दुरी होय || ७२ ||
मंत्र चारीवेदास एक || गायत्री नाम हें नाशी पातक ||
याकारणें जपावा नि:शंक || वेदपठण फळ असे || ७३ ||
हे मंत्र न जपे जो नर || त्याचा जन्म जेंवी सुकर ||
जप करितां तुम्हीं निर्धार || चिंतिलें फळ पावाल || ७४ ||
सुखासनीं बैसोनी || हस्त ठेवावा नाभिस्थानीं ||
जपमाला तये स्थानीं || धरोनी शिरीं वामहस्त ठेवणें || ७५ ||
गंगेंत उभ्यानी प्रात:काळीं || उभें किंवा बसोन मध्यान्ही ||
थ्दय हस्त मुख स्पर्शोनी || सायंकाळी जप करावा परियेसा || ७६ ||
धी म्हणजे प्रज्ञा धरोनी || थ्दयस्थानीं माला माध्यान्ही ||
सुखस्थानीं सांयकाळी || प्रात: नाभीसीं देखा || ७७ ||
पूवील जप तीन वेळीं || जपतां वृक्ष पहावा जवळीं ||
जरी वृक्ष नसे जवळी || नासाग्रट्टष्टीनें जपावें || ७८ ||
ट्टष्टी हें नाम असे गायत्रीसी || मिळोन म्हणे गा जपासी ||
म्हणतां होय महादोषी || महानरक भोगीतसे || ७९ ||
वर्णोच्चार गायत्रीमंत्रासी || त्रिपदा जपावी हर्षी ||
ब्रम्हहत्यादि पापें नाशी || अनंतपुण्य होय परियेसा || ८० ||
धरी जपमाळेचा मेरू || उल्लंघितां पाप असे अपारू ||
प्राणायाम केलिया त्रिवारू || मेरूलंघिलें पापा जाय || ८१ ||
न पहावें मागें पुढें || जप करितां मन असावें ट्टढें ||
शूद्रादि नानायातीकडे || संभाषण नसावें दर्शन || ८२ ||
उत्तम जप करितां ऐसा जाण || मनेच्छा होती पूर्ण ||
ऐकती सर्व || षीजन || पाराशर || षी सांगतसे || ८३ ||
वरूणीमंत्र जपोनी || सायं प्रात: करा औपासनी ||
मिळोन न करा सर्वानीं || सर्वी पृथक करावे || ८४ ||
रूद्रसूक्त मग जपोनी || एकादश मंत्र मग जपोनी ||
ब्रम्हयज्ञ करावा ब्राम्हणीं || माध्यान्हपर्यत परियेसा || ८५ ||
करावा ब्रम्हयज्ञ अरण्यांत || मध्यदिनीं येतां उदीत ||
वेदाध्ययन करावें तावत || तृतीय सवनेंकरोनी || ८६ ||
मित्र येतां माध्यान्हीं || चो अक्षरींमंत्र म्हणोनी ||
तर्पण करावें देवर्षिपितृगणीं || करावें ऐसें विप्रें परियेसा || ८७ ||
वर्ण नाम गोत्र उच्चारोनी || तर्पण करा पितृगणीं ||
भूमीवरी दर्भ ठेवोनी || तर्पण करावें विधियुक्त पैं || ८८ ||
श्र्वेत तीळ देवांसी || धूम्रवर्ण || षींसी ||
कृष्णवर्ण पितरांसी || तिळतर्पण करावें || ८९ ||
धरोनी यज्ञोपवीत सव्य देवांसी || उपविती || षीसी ||
अपसव्य पितरासीं || तर्पण करावें ऐसेविधी || ९० ||
देवां देणें अंजुळी एक || षींसी अंजुळीद्वय ||
पितरां अंजुळीत्रय || तर्पण ऐसें करावें देखा || ९१ ||
स्त्रियासी अंजुळी एक देखा || व्यतिरिक्त माता बंधुसी ऐका ||
सपत्नी आचार्य पत्नी नामिका || अंजुळीद्वयीं तर्पावें || ९२ ||
त्याज्य दिवस तिळतर्पणासी || रविशुक्रवारीं नेमेसी ||
प्रतिन्नवमी षष्ठी एकादशी || माघनक्षत्रीं करूनये || ९३ ||
मुख्य विवाह उपनयनासीं || जन्मनक्षत्र जन्मदिवसीं ||
गृहीं आनंदोत्साहेंसी || तर्पण ते दिनीं करूं नये || ९४ ||
क्षीणता वृद्धी श्राद्धदिवसीं || तर्पण करावें नेमेंसी ||
अमावास्या संक्रांतीसी || तिळतर्पण मुख्य पैं || ९५ ||
यद्यपि जरी करणें असे || तर्पण || उदकीं हें मुख्य जाण ||
मुद्रिकासुवर्ण हस्तें धरोन || किंवा दर्भपवित्रें करी || ९६ ||
माध्यान्हकाळ होतां || माध्यान्हसंध्या करावी तत्वतां ||
सूर्यासी अर्घ्य देई तत्वतां || तर्पणानंतर मुख्य पैं || ९७ ||
मृत्युंजयमंत्रविधान || ध्यानीं आणावें आपण ||
मग घ्यावा सूर्यनारायण || उपस्थावें त्रिमूर्तिसीं || ९८ ||
तांत्रिकें सांगितलें जाण || मांत्रिक असे गहन ||
तें सांगतां परम कठीण || होणें असे परियेसा || ९९ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे आन्हिकनिरूपणं नाम षड्त्रिंशतमोऽध्याय: || ३६ ||


|| श्रीगणेशाय नम: ||
श्रीगुरू विप्रातें सांगती || गृह रक्षणकारणें निश्र्चिती ||
अग्निमंथन काष्ठें रीती || संपादावें कृष्णाजिनें || १ ||
विप्रासी संध्या जैसी || देवपूजा करावी तैसी ||
त्रिकाळ अर्चन देवासी || मनोभावें करावें देखा || २ ||
विधियुक्त प्रणव द्वादश || उदक मंत्रोनी प्रोक्षी शिरस ||
मग करावे अंगन्यास || कलशादि पूजा करावी || ३ ||
पत्रें पुष्पें नानाविध जाण || सांगतों ऐका || षिजन ||
आपण पेरिलीं सगुण || तीं उत्तमपक्षी देखा || ४ ||
तेलादी रस पुष्पें काष्ठकुश || स्वहस्तीं परहस्ती असतां ||
नमस्कारितां घडे दोष || अशास्त्रबाधा होईजे || ५ ||
जो करील भावें देवपूजा || तो होईल पुनीत एके द्विजा ||
अन्नसंस्कारें करी वोजा || वैश्र्वदेव करोनी पैं || ६ ||
मग करावें आपण भोजन || अतिथी पंक्ती घेऊन ||
सर्वथा न करी अन्न भिन्न || प्रपंच करितां दोष पैं || ७ ||
यापरि करोनी भोजन || मग श्रीगुरूकुळ देव स्मरोन ||
मातापितयातें नमस्कारोन || करावें ऐंसें द्विजोत्तमा || ८ ||
यदर्थ सांगे पाराशर || ब्राम्हणपणाचा आचार ||
ऐकताती समस्त || षिवर || तेंवी आचार करीती || ९ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे आन्हिककर्मनिरूपणं नाम सप्तत्रिंशतमोऽध्याय: || ३७ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
संकल्प करूनी एक ब्राम्हण || करीन आराधना म्हणोन ||
त्रिवर्गापुरतें अन्न || घेवोन आला असे देखा || १ ||
कळलें श्रीगुरूसी वर्तमान || बोलाविती तयालागुन ||
सांगती आजी दिनी म्हणोनी || भिक्षेसी करावी आयती || २ ||
लवणादि करूनी षडरस || भक्ष्य भोज्य अन्न सुरस ||
सर्व तयारी तो करीत || श्रीगुरूआज्ञें परियेसा || ३ ||
लोक बोलती तयालागोन || कैसें करीसी आराधन ||
आम्हा उपासी तूं ठेऊन || कोठोनी आलासी ये ठायीं || ४ ||
कैंचा आला हा ब्राम्हण || नित्य होताती आराधन ||
आम्हीं जेवितसों मिष्टान्न || आजिचे दिनीं उपवास पैं || ५ ||
करोनियां सर्वी संध्या स्नान || मठीं यावें नित्यप्रमाण ||
ऐसें सांगती सर्वालागुन || श्रीगुरूवाक्य ऐका हो || ६ ||
सर्व लोक गेले स्नानासी || श्रीगुरू म्हणती विप्रासी ||
शीघ्र करीं होईल निशी || विप्र अपार सांगितले || ७ ||
क्षीण वृद्ध पांगुळ अंधास || बोलावीं सर्वा भोजनास ||
ग्रामवासी समस्तांस || जेवूं घालावें त्वा सर्वा || ८ ||
नेमें इतुकें झाल्यावरी || श्रीगुरू ते विप्रातें पाचारी ||
वर देते झाले दरिद्र दुरी || पुत्रपौत्र होती तुज || ९ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे अन्नपूर्तिकद्विजचतु:सहस्रभोजनं नाम अष्टत्रिंशोत्तमोऽध्याय: || ३८ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
कुलवन्ताची स्त्री देख || वांझ म्हणती तीस सर्व लोक ||
वय जाईलें साठी वर्षे देख || ती येते गुरूदर्शना || १ ||
स्मारं स्मारं म्हणोनी || ऐसी स्तुती करोनी ||
पतिसहवर्तमान येवोनी || संगमीं सेवा करीत || २ ||
टवकारूनी गुरू पुसती || कां करितां तुम्ही स्तुती ||
संकट काय असे तुम्हांप्रती || सांगावा सर्व वृतांत || ३ ||
हांकिलें मज सर्व जनीं || पुत्रवती मी नव्हें म्हणूनी ||
आतां तरी पुढले जन्मीं || पुत्रहोई ऐसा देई वर || ४ ||
कांही दिवस होतां जाण || इह जन्मींच तुज पुत्र होऊन ||
एक कन्या तुज लागोन || होईल माते पतिव्रते || ५ ||
नित्य करावें अश्र्वत्थपूजन || तेणें होईल मनेच्छा पूर्ण ||
ब्रम्हांडपुराणीं आख्यान || अश्र्वत्थाचें आहे पैं || ६ ||
विधियुक्त करितां सेवा || फळ पावे तात्काळिका ||
ऐसें सांगे पाराशर लोकां || सांगताती श्रीगुरू || ७ ||
ध्वनी होतसे वृक्षसन्निधेंसी || श्रवण करीं वो मानसीं ||
तैं फळ पावे निश्र्चयेंसी || तूं जाणावें पतिव्रते || ८ ||
सर्व कथा श्रवण करोनी || पुसताती श्रीगुरूलागोनी ||
साठीं वर्षे वय झालें पूर्ण || कैंचा पुत्र होईल देखा || ९ ||
नाभी नाभी ऐसा शब्द || श्रीगुरू सांगती तया वांझेस ||
तुम्हा पुत्र कन्या होती शुद्ध || देंते जाहले वर तीसी || १० ||
मग नवमास भरोनी || प्रसूत झाली शुभदिनीं ||
कन्या प्रसवली तेक्षणीं || आनंदती उभयतां || ११ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे वृद्धवंध्याप्रसवो नाम एकोनचत्वारिंशत्तमोऽध्याय: || ३९ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
समस्त येतीं भेटीसी || आला असे एक विप्र परियेसी ||
तया कुष्ठ भरलें सर्वागेसी || नमुनी स्तोत्र करी पैं || १ ||
करूणावचन त्याचें ऐकोनी || श्रीगुरू पुसती तयालागोनी ||
तूं पाप केलेंस म्हणोनी || कुष्ठ भरलें सर्वांगी || २ ||
लौकर जावें तूं संगमसी || शुष्क काष्ठ होय पल्लवेंसी ||
तेव्हां तुझे दोष संमूळेंसी || जातील जाण निच्श्रयें || ३ ||
दिधलें गुरूनें मग काष्ठा || सांगीतली किऋया वरिष्ठ ||
तेणेंरीती करी तो पापिष्ठ || गुरूवाक्याप्रमाणें || ४ ||
गुरूवाक्य शिष्यासीं कारण || सर्वथा नव्हे अप्रमाण ||
जैसें असे भक्ताचें अंत:करण || तैसें तया होतसे || ५ ||
मग म्हणती श्रीगुरू || ऐका गुरूभक्तीआप्रकारू ||
स्कंधपुराणीं कथा थोरू || ऐका तुम्हीं शिष्य हो || ६ ||
दमरोदक मग घालूनी || पल्लव आणिले काष्ठालागोनी ||
औदुंबर वृक्ष होवोनी || दिसूं लागला सर्वासी || ७ ||
लागतसे मग तो विप्र चरणीं || गेलें कुष्ठ सर्वांगी जाणीं ||
तो स्त्रोत्र करी श्रीगुरूलागोनी || समस्त ऐकती जन || ८ ||
इत्थंभूत कुष्ठ गेलें देखा || मग वर देते झाले सन्मुख ||
पुत्रपोत्रानां दे तूं सुखा || सरस्वतीमंत्र देती || ९ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे शुश्ककाष्ठसंजीवनं नाम चत्वारिंशत्तमोऽध्याय: || ४० ||

|| श्रीगणेशाय नम: ||
ब्रम्हज्ञानीतुम्ही सिद्ध मुनी || होतां गुरूसन्निधानीं ||
शिष्य जाहले कोणते गुणी || निरोपावें ज्ञानमूर्ति || १ ||
म्हणतां ऐसें नामधारक || सिद्ध सांगती कथानक ||
श्रवण करीतो भाविक || पूर्वजकथा आपुली || २ ||
चारी राष्टींचे लोक ब्राम्हण || येती गाणगापुरीं लागोन ||
श्रीगुरूचें घेतातीआ दर्शन || मनेच्छा त्यांच्या पूर्ण होती || ३ ||
वोसरग्रामीं तुझा पूर्वज || नामें तया म्हणती सायंदेव ||
येऊन भेटला गुरूसी सधन || स्तुती केली परोपरी || ४ ||
नेवोनी मग एकांतीं तयासी || पुसताती क्षेमवार्ता परियेसी ||
काय इच्छा आहे मानसीं || पूर्ण होईल विप्रोत्तमा || ५ ||
गणगोतबंधुसम आपणा || जाणून येतसें तव दर्शना ||
सेवा तुमची करोनी मना || ऐसी आंस असे पैं || ६ ||
भिऊन वागणें गुरूपासी || गुरूसेवा कठीण तुम्हासी ||
याविषयीं कथा आहे विशेषी || ईश्र्वरपार्वतीसंवादे || ७ ||
रमणी पुसतसे ईश्र्वरासी || गुरूभक्ती आहे कैसी ||
ती सर्व विस्तारेंसी || सांगावी मजकारणें || ८ ||
सर्व सुलभ असे अप्रयास || जो जाणे गुरूकुळवास ||
एके भावें धरोनी कास || आराधनकार देखावें || ९ ||
त्यांत ब्रम्हपुत्रांचें आख्यान || सांगती शंकर पार्वतीलागुन ||
ती कथा तुम्ही करा श्रवण || गुरूसेवा करा निरंतर || १० ||
इत्थंभूत कथेचा इतिहास || पहा तुम्ही काशी खंडांत ||
त्वष्टा ब्रम्हपुत्र विख्यात || वेदांत असे निरूपण || ११ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे काशीमकायात्रानिरूपणं नाम एकचत्वरिंशत्तमोऽध्याय || ४१ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
नित्य यात्रा तो ऐसी करी || ऐकतसे त्वष्टा पुत्रब्रम्हचारी ||
ही कथा काशीखंडाभीतरी || श्रवणें होती पुनीत || १ ||
ब्रम्हच रोयाणें जाण || सर्व वस्तु मग आणोन ||
समर्पितो श्रीगुरूलागोन || मग होती तया प्रसन्न || २ ||
शुद्ध मनेंकरून श्रीगुऋरू || आशीर्वाद देते जाहले सवेगु ||
चन्द्रार्कावरी नांदे सुखा रूपू || विश्र्वरूप तुज म्हणती || ३ ||
धरोनियां शुद्ध भाव || जो गुरूसी निरंतर शरण ||
तयासी म्हणा सधन || म्हणोन सांगती देखा || ४ ||
बुधवारीं ऐसे रात्रीसी || ही कथा सांगितली विप्रासी ||
उदय होतां गुरूवारेंसी || प्रात काळीं होय संपूर्ण || ५ ||
धरोनी हात मग सायंदेवाचा || पाहें बा काशीवास साचा ||
आशिर्वाद देती त्याला || यात्राफळ तुझे वंशी || ६ ||
परिसा तुम्ही गुरूमहिम्यासी || गुरवारीं जे गुरूसी भजती ||
तयां नसें पुनरावृत्ती || वर तोचि गुरू जाणावा || ७ ||
रिक्तपाणी किंवा हस्त धरून || गुरूदास्यत्व करावें जाण ||
मंत्रोपदेश यावरी पूर्ण || देतां सिद्धी तत्काळपैं || ८ ||
पुर्वजन्मार्जित पुण्यराशी || होत्या कांही तुमच्या गांठीसी ||
म्हणोन पाहिलें च्रणासी || पुनित जाहलों म्हणे पैं || ९ ||
नानापरी स्तवी सायंदेव || कर्नाटकीभाषेंत अभिनव ||
गुरू ऐकती भावें देख || आनंदें डुलताती || १० ||
यती सांगती सायंदेवालागुन || आजी अनंतव्रताचा दिन ||
करोनियां वेगें स्नान || पूजावें अनन्तासी || ११ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे काशीक्षेत्रमहिमावर्णनं नाम द्विचत्वारिंशत्तमोऽध्याय: || ४२ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
सर्व बैसोन तेथें शिष्यभार || पुसताती श्रीगुरूसी विस्तार ||
श्रीगुरू सांगती सविस्तर || श्रवण करिती पैं देखा || १ ||
चिंतित काम जाहलेंपूर्ण || ऐसें व्रत दुजें नसे जाण ||
या व्रतप्रभावेंकरून || कौंडण्य || षी तरला पैं || २ ||
दान कर्म जपादी अनुष्ठान || होतसे प्रभावें पूर्ण ||
जो व्रत करी भावेंकरून || आयुष्य बळवृद्धी त्यासी || ३ ||
न करी जन्मांत हें व्रत || त्याचा जन्म जाणा व्यर्थ ||
जन्मांत तरी करावें हें व्रत || म्हणोन सांगती श्रीगुरू || ४ ||
दर्शने पापें होती भस्म || स्मरणें पुनीत आत्माराम ||
जरी व्रत करी अधम || तो पुनीत जगत्रयीं || ५ ||
परंपरा जो चालवी हें व्रत || तया पुण्या नाहीं मित ||
सुख ऐश्र्वर्य स्त्रियायुक्त || किर्ती होतसे जगत्रयीं || ६ ||
रमावर उमकांत जाण || प्रसन्न होती तयासी पूर्ण ||
ऐसा व्रताचा प्रताप जाण || सांयदेव शिष्य ऐकतसे || ७ ||
मग पुसतसे सायंदेव || व्रताचा सांगावा पूर्ण भाव ||
निरोपावें स्वामी कृपाघना || म्हणोन चरण धरीतसे || ८ ||
शांतरूपें होवोनी तयासी || सांगताती वृत विस्तारेंसी ||
श्रीगुरू म्हणती शिष्यासी || व्रत करावें समस्त पैं || ९ ||
तारावया विश्र्वासी || अवतरले श्रीकृष्ण परियेसीं ||
त्यांनी सांगीतलें पांडवांसी || ती कथा श्रवण करा || १० ||
यथाविधी श्रीगुरू निरोपेंसी || व्रत केलें संतोषीं ||
पुजीते जाहले श्रीगुरूसी || नानाउपचारे पैं देखा || ११ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे श्रीमदनंतव्रतकथानिरूपणं नाम त्रिचत्वारिंशत्तमोऽध्याय || ४३ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
दुराचारी ग्रामवासी लोक || त्याठायीं असे एक तंतुक ||
तो सेवा करूं लागला देख || श्रीगुरूची परियेसी || १ ||
साक्षात्कार निरंतर || गृहधंदा करितसे तंतुक ||
घरीं असे बहु आपदा || ग्रह बाधा तया पूर्वजन्मींची || २ ||
ग्रहबाधा असे तयासी || म्हणोनी लागला सेवेसी ||
राजांगणीं निच्श्रयेंसी || सडासंमार्जन करी देखा || ३ ||
हर्षयुक्त होवोनी मनीं || नित्य सेवेसीं येतसे अनुदिनीं ||
तों शिवरात्र येतसे दिनीं || लोक जाती यात्रेसी तंतुका श्रीशैल्या || ४ ||
निघाले लोक यात्रेसी || तंतुका बोलाविती हर्षी ||
तो म्हणे तुम्ही मूर्ख परियेसी || जातां तुम्ही यात्रे देखा || ५ ||
वारूनियां समस्तांसी || मग गुरू पुसती तंतुकासी ||
तूं कां न जासी यात्रेसी || सांग मनीचा हेतू || ६ ||
रमणीय स्थान पाहून || श्रीगुरू निरोपिती आख्यान ||
स्कंदपुराणी कथा जाण || शिवरात्रमहिमा || ७ ||
नाना उपायें करून || राजा पावतसे राज्यासन ||
भावें संकट दूर करी जाण || ऐसें करावें गुरूराया || ८ ||
यदर्थ तंतुक साचार || पूर्वजन्मींचे भूतपरिकर ||
होते तया ग्रहांत || नाश करूनी पुनीत केले || ९ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे श्रीशैलशिवरात्रीमहिमावर्णनं नाम चतुश्चचत्वारिंशत्तमोऽध्याय: || ४४ ||


|| श्रीगणेशाय नम: ||
एक नंदीनाम ब्राम्हण || तयासी कुष्ठ भरलें जाण ||
आतां तो श्रीगुरूसन्निधान || नमन करी साष्टांगें || १ ||
दावीतसे सर्व शरीर || म्हणे करावा मजवर उपकार ||
श्रीगुरू टाकिती भस्म जिव्हेवर || ज्ञान दिल्हें तयासी पैं || २ ||
तयासी होतां ज्ञान || श्रीगुरूसी म्हणतसे आपण ||
सांगावें स्वामी कृपा करून || पूर्वकर्म माझें समस्त पैं || ३ ||
सांगती तयासी वेदांत || छत्तीसप्रश्र्नोतर गुप्त ||
तेणेंकरोनी तो वेदरत || श्रवणें करोनी कुष्ठ गेले || ४ ||
राहिलातो क्षणेक निवांत || स्तुती केली बहूश्रुत ||
श्रीगुरू ती श्रवण करीत || स्तुतिस्तोत्रें सकळपैं || ५ ||
यदर्थ ते कुष्ठयासींदेखा || स्तवनें नाश केलें कुष्ठा ||
श्रीगुरू मग संतोषी चित्ता || प्रसाद देती तयासी || ६ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे द्विजकुष्ठपरिहारो नाम पंचचत्वारिंशत्तमोऽध्याय: || ४५ ||


|| श्रीगणेशाय नम: ||
सर्व लोक येती यात्रेसी || गाणगापुरीं परियेसीं ||
तयांमध्ये एका भक्तें आपुले || ग्रामासी नेलें गुरूसी पैं देखा ||
कवि असे तया ग्रामीं एक || नित्य पूजीतो महादेव ||
कवित्व करी नित्य एक || महादेवाचे वरीदेखा || २ ||
लक्षितसे तो श्रीगुरूसी || मग विचार करी निजमानसीं ||
देहधारी मनुष्यासी || कवित्व करणें हे अधम || ३ ||
निद्रा येतसे मग कवीसी || स्वप्नीं पहातसे गुरूसी ||
तो लिंगरूपी दिसे त्यासी || श्रीगुरूरूपी शंकर देखा || ४ ||
गर्जना करूनी उठे ते क्षणीं || विस्मित जाहला आपुले मनीं ||
साक्षात हा ईश्र्वर अवतरोनी || भक्तमनेच्छा पुरवी पैं || ५ ||
माता पिता बंधु सर्व तूं जाण || माझे आप्त सोईरे जाणून ||
आतां तारावें मज आपण || भवसागरापासून || ६ ||
गती द्यावी मजलागुन || उद्धरावें मज अनाथदीना ||
मी जाहलों तुमचे स्वाधीन || आतां आपुला मी शिष्य || ७ ||
मग श्रीगुरू म्हणती तयासी || गुरूमार्ग ऐक परियेसी ||
श्रवण तुज उपदेश करावयासी || अवधी कांहीं नसे देखा || ८ ||
श्रीगुरू सांगती तयासी || तूं गुरू मार्ग ऐक परियेसी ||
श्रवण करावें अगत्येंसी || ऐसें सांगती त्या कवीतें || ९ ||
त्या उपदेशेंकरून || ज्ञान झालें विप्रालागुन ||
कवित्व केलें विप्रें आपण || श्रीगुरूसी परियेसा || १० ||
इत्थंभूत मग तयासी || श्रीगुरू उपदेश करितां त्यासी ||
नाम ठेविलें कवीश्र्वर त्यासी || येती घेऊन गाणगापुरीं || ११ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे कल्लेश्वरमहिमावर्णनं नाम षट्चत्वारिंशत्तमोऽध्याय: || ४६ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
गाणगापुरीं असतां गुरू || ख्याती जाहली अपरंपारू ||
लोक येती थोर थोरू || भक्तजन बहु झाले || १ ||
तरी येतसे सण दिपवाळीचा || शिष्यां आनंद मोठा साचा ||
गुरूसी न्यावें हा बेत मनींचा || आले असती मठीं पैं || २ ||
चारी गावींचे मग येती शिष्य || बोलाविती श्रीगुरूस ||
उदईक असे चतुर्दशी दिवस || यावें आपण माझे ग्रामीं || ३ ||
निच्श्रयें सांगती तयासी || जावें तुम्ही आपुले ग्रामासी ||
मी येतों तुमचे गृहासी || ऐसें सत्य सांगती शिष्यांपैं || ४ ||
ग्रामांतील भक्तजन || ऐसें कौतुक ऐकोन ||
विनविताती कर जोडोन || आम्हां सांडोनी जाता स्वामी || ५ ||
तयांसी म्हणती श्रीगुरूनाथ || राहूं आम्ही नाहीं जात ||
न करा चिंता मनांत || आम्ही येथेंची असों देखा || ६ ||
आठ रूपें जाहले आपण || अपारमहिमा नारायण ||
साता ठायीं गेले जाणा || गाणगापुरीं होतेची || ७ ||
ऐसी दिपवाळी झाली || समस्तां ठायीं पुजा घेतली ||
पुन्हा एकचि मूर्ति ठेंली || गौप्यरूपें कोणी नेणे || ८ ||
कार्तिकमासीं पौर्णिमेसी || करावया दीपाराधनेसी ||
समस्त आले परियेसी || गाणगापुरीं गुरूजवळी || ९ ||
समस्तही नमस्कारिती || भेटी दहावे दिवसीं म्हणती ||
एकमेकांत झगडतीं || म्हणती आपुले घरीं गुरू होते || १० ||
एक सत्य मिहृया म्हणत || समस्त शिष्य खुणा दाखवित ||
आपण दिल्हें हें वस्त्र || श्रीगुरूजवळी असे देखा || ११ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे अष्टस्वरूपधारणं नाम सप्तचत्वारिंशत्तमोऽध्याय: || ४७ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
श्रीगुरू जातां संगमासी || एक शुद्र पाहून हर्षी ||
पुसताती श्रीगुरू तयासी || किंकारणे आलासी सांग मज || १ ||
नमून शूद्र मग बोलत || पेरिलें आहे यावनाळशेंत ||
पीक व्हावें तयासी बहुत || मग कुटुंब खाईल तव प्रसादें || २ ||
गणगोत माझेंतुम्ही यथार्थ || ऐसें ऐकतां श्रीगुरू म्हणत ||
सर्व शेत आजि कापीं त्वरित || पीक होईल बहुत देखा || ३ ||
भीतीं न धरावी तू मानसीं || मी सांगतों जेतुजसी ||
तें तूं करावें निच्श्रयेंसी || तरी शेत आजि त्वा कापावें || ४ ||
राहती मठासी सांगून शूद्रातें || सर्व शेत कापून रचिलें ||
तों सायंकाळी पर्जन्यानें || लेकांचीं शेतें नासविलीं || ५ ||
यथास्थित त्या शूद्राचें || शेत पिकलें श्रीगुरूवाचे ||
मग त्याला बोलाविलें साचें || शिष्यलोक परियेसा || ६ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे शूद्रवरप्रदानं नाम अष्टचत्वारिंशत्तमोऽध्याय: || ४८ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
त्रिगुणमूर्ति श्रीगुरू आपण || सांगताती शिष्यांसी जाण ||
जालंदरआख्यान || श्रवण करिती शिष्य पैं || १ ||
लोकां नमस्कार प्रदक्षिणाविधान || सांगती शिष्यांलागोन ||
पुढें सांगती एक पुराण || भारद्वाजाची कथा पैं || २ ||
काशीतीर्थ दावोनी || पुढें पाप विनाशतीर्थ पाहोनी ||
सांगती सर्व विद्वज्जनीं || तों येतसे भगिनी देखा || ३ ||
मग आपुले भगिनीसी || सांगती पापें पूर्वदेहासी ||
तीं सर्व सांगून तियेसीं || मग उद्धरिली पैं देखा || ४ ||
नेवोनी मग सर्व शिष्यांसी || दाविताती तीर्थे परियेसा ||
असे गाणगापुरासी || उधरिती समस्तांतें || ५ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे अमरजासंगमगाणगापूरक्षेत्रवर्णनं नाम एकोनपंचाशत्तमोऽध्याय: || ४९ ||

|| श्रीगणेशाय नम: ||
भक्त एक असेंापुला पूर्वीचा || झालासे राजा विदुरानगरींचा ||
तया वर असे भेटीचा || ती कथा पुर्वी जाहलीं पैं || १ ||
यथास्थित तो राज्य करीत || तयाचे मांडीवरी रोग होत ||
तें दु:ख निरसावया जात || गाणगापुरा रजक पैं || २ ||
दर्शन देऊन तया यवनालागोन || सांगती तया पिंगलाख्यान ||
श्रवण करीतसे यवन || एका भावें करोनियं || ३ ||
शरण जावें त्वां सत्पुरूषासी || तुझा रोग हरेल निच्श्रयेंसी ||
ऐकतां राजा झाला संतोषी || नमन करी साष्टांगें || ४ ||
नानापरीं मग स्तुती करोनी || स्फोटक दावी गुरूलागोनी ||
तों दिसेना कोठेंही एक खुण || मग पूर्वस्मरण होय पैं || ५ ||
इथृंभूत सर्व त्या रजकासी || ज्ञानोपदेश करूनी परियेसी ||
मग स्नान करोनी गौतमीसी || येते जाहले मठीं देखा || ६ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे सार्वभौमस्फोटकशमनऐषवर्यावलोकनवैदुराप्रवेशो नाम पन्चाशत्तमोऽध्याय: || ५० ||

|| श्रीगणेशाय नम: ||
श्रीगुरू म्हणती समस्तांसी || आम्ही जातों श्रीशैल्यासी ||
राहता म्लेंच्ह येतील भेटीसी || याकारणें जाणें देखा || १ ||
नृसिंहरूप ठेवोन गाणगापुरी || आपण गेले पर्वतावरी ||
शिष्यां सांगून ते अवसरीं || स्मरणें संकटे जातील || २ ||
शिकवून समस्तजनासी || आम्ही राहतों याचि ग्रामासी ||
चिंता न करावी परियेसी || ऐसें सांगोन जाती पैं || ३ ||
व्हावया जनासी दर्शन || तयासी सांगती खूण जाण ||
दोनप्रहरां करूं संगमीं स्नान || पुन्हा येऊं मठीं पैं || ४ ||
समस्तां सांगोन कथा जाण || गुरूवारीं प्रात:कालीं केली पूर्ण ||
मग शुक्रवारीं आपण || जाते झाले श्रीशैल्या || ५ ||
रवि असतां कुभराशीसीं || असित पक्ष प्रतिपदेसी ||
बहुधान्यसंवत्सरासीं || अकराशें चाळीस || ६ ||
स्वता: आपण ऐकटे जाण || जाती पुष्पक विमानींबैसोन ||
माघारले सर्व || षिजन || मठीं पहाती मूर्ति पैं || ७ ||
तीर्थ जाण गाणगापुर || जे वसती तया ग्रामीं भक्त चतुर ||
त्यांची मनेच्छा पूर्ण करी शंकर || सकलाभीष्टें साधती || ८ ||
गुरूचरित्र ही कथापूर्ण || जे वाचिती सप्त दिवस जाण ||
तयां साधन दुजें नसोन || मनेच्छा पूर्ण करी शंकर || ९ ||
रक्षिती त्यासी आपण शंकर || तयासी न विसंबे क्षणभर ||
जें सांगितलें मुख्यसार || तेंचि हें जाणावें तुम्ही || १० ||
वेदांतसार आहे हें जाणा || पुढें अवतार सोपान पूर्ण ||
होईल तो परिसा तुम्ही जन || असें गुरूचरित्र पै || ११ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे श्रीगुरुसमाधिगमनं नाम एकपंचाशततमोऽध्याय: || ५१ ||

|| श्रीदत्तात्रयाची मानसपूजा ||

|| श्रीगणेशाय नम: ||
|| श्रीदत्तात्रयाची मानसपूजा ३री ||

प्रथम गणेश पूजन || सरस्वतीतें वंदन ||
सदगुरूंसी करूनी आवाहन || हृदय चौरंगी बैसविलें || १ ||
भाव हेंची पाद्य आचमन || चरण प्रक्षाळणकरून ||
तीर्थ मस्तकीं वंदून || मार्जन करूनी शुद्ध व्हावें || २ ||
पंच तत्वांचें पंचामृत || शांति गंगोदक निर्मळ बहुत ||
वाणीनें न बोलावें अनृत || हेंची दिगंबरा आवडतें || ३ ||
वैराग्य रंग भगवी छाटी || स्मरण रूद्राक्ष माला कंठीं ||
शंख चक्र त्रिशूल मुष्टी || अत्री पुत्र शोभतो || ४ ||
पाठीसी उभी गायित्री माता || श्र्वानरूपी वेद तत्वता ||
अनसूयेची अगाधता || त्रैमूर्ती बाळें खेळविलें || ५ ||
प्रेम आरक्त केशरी गंध || सुमन हाराचा सुटला सुगंध ||
तुळस गांठी चरणारविंद || श्रीपाद वल्लभ पूजियेले || ६ ||
समतेचा मांडिला पाट || त्यावरी श्रद्धेचें ताट ||
सगुण चित्रें रांगोळी उत्कृष्ट || भोजनास बैसले यतिराज || ७ ||
वाढिलें ज्ञानामृत अन्न || मायेची शाखा पव्कान्न ||
अनुभवानंद जलपान || जगदगुरू संतोषले || ८ ||
भजनाचे विडे रंगले || चित्त दक्षिणेस दिलें ||
प्रारब्ध कर्पूरा जाळिलें नरहरी आनंदती || ९ ||
जागृती स्वप्न सुषुप्ती || प्रदक्षिणा ओलांदती ||
गुरू तये स्थळीं राहती || नमन केलें साष्टांगीं || १० ||
आतां मंत्रपुष्प राहिलें || देह चरणासी वाहिलें ||
कृष्ण सेविका नाम उरलें || पुसून जाईल कालांतरीं || ११ ||
मानस पूजा कृष्णें रचिली || हृदयांतरीं राहतो जवळी ||
तो मी तो मी ऐसे बोली || लक्ष असावें सर्वदा || १२ ||

सदगुरू || श्री गुरूदेव दत्त || चरणाची विनंम्र भावयुक्त अंतकरणपूर्वक प्रार्थना

गुलाब पुष्पासम गौर कांती || आजानुबाहु अशी दिव्य मुर्ति ||
कृपापूर्ण ती नेत्रदीप्ती सतेज || नसे मानवी देह हा स्वामीराज || १ ||
प्रत्यक्ष नरसिंह सरस्वतीचे || जे रूप श्रीपाद श्री वल्लभाचे ||
अवधूत मुर्ति अवतार झाला || नमो सदगुरू दत्त स्वामी पदाला || २ ||
जयाच्या पुढें काळ ही नम्र आहे || अशा स्वामीच्या मी पदी बाळ आहे ||
समर्था तुझें पोर ना दीन व्हावे || चरणी तुझ्या ते सदा लीन व्हावे || ३ ||
अनन्य भावे घडे स्वामी भक्ति || करिती तयां संतही साह्य प्रीती ||
ग्रहांची नसे त्या प्रतिकुल भीती || कुलदेवता ही अनुकुल होती || ४ ||
पदी भक्त आले कृपा पात्र झाले || बहु सिद्ध केले किती उद्धरीले ||
असामान्य तुमची असें किर्तीगाथा || म्हणोनीच हा ठेविला पायी माथा || ५ ||
असे पात्र स्वामी मी तुमच्या कृपेसी || नको सोडू माते तरी या मुलासी
मला संपदाही तुझे पाय दोन्ही || तुझ्याविण माझे जगी नाही कोणी || ६ ||
फळाली कृपा संत देवादिकांची || मिळाली मला जोड स्वामी पदांची ||
हृदयी ठेव जीवा धरी घट्ट पाय || तया सारखी न करी कोणी माया || ७ ||
मातेची माया पित्याचीच छाया || दया मुर्तिच्या या नको सोडू पाया ||
मना भार ठेवी अरे याच ठाया || मिळेना कुठे ही अशी स्वामी माया || ८ ||
सदा स्वामी सन्नीध ऐसे करावे || तुम्ही साह्यकारी मनीं हे ठसावे ||
जाज्वल्य तुमचा अभिमान राहो || भयाचा मला लेश न स्पर्श होवो || ९ ||
समर्थ जाणोनी आलो मी पाया || तुम्हीच माझे सर्वस्व व्हाया ||
कृपेचे जरी अल्प देशी निधान || जीवा सारीखे मी तयासी जपेन || १० ||
पदी हट्ट ऐसा धरीला असें मी || ध्यानी दिसावे मला याच जन्मी ||
मी स्वामीचा स्वामी सर्वस्व माझे || असें प्रेम वाढो गुरूमाय तुझे || ११ ||
मला स्वामी राजा तुमचीच छाया || तुम्हाविण देवा करी कोण माया ||
स्वामी समर्थ गर्जूनी गावे || या जीवनाचा महायज्ञ होवो || १२ ||
आधार नाही तुम्हां विण कोणी || नसे आश्रदाता तुम्हा विण कोणी ||
माता पिता सदगुरू एक स्वामी || जवळी मला घ्या करी प्रार्थना मी || १३ ||
स्वामी करावे इतुके करावे || हाती धरावे मला ना त्यजावे ||
होईन मीं पात्र तुमच्या कृपेने || अशा तळमळीवीण मी कांहीं नेणे || १४ ||
प्रभो मी न माझा तुमचाच होवो || त्वदिच्छे प्रमाणे ही वृत्ती रावो ||
असे हो कृपाळा तुम्हां वाहिलो मी || चरणारविंदार्पणमस्तु स्वामी || १५ ||
|| श्री गुरूदेव दत्त ||

|| श्रीदत्तात्रय मानसपूजा ||

|| श्रीगणेशाय नम: ||
|| श्रीदत्तात्रय मानसपूजा ||
|| श्रीगुरूभ्योनम: ||
प्रथम होवोनि सुस्नान || मग करूनियां पवित्र ||
आसनीं बैसावें स्वस्थचित्त || श्रीगुरूमानसपुजेसी || १ ||
सिद्ध आसनारूढ ध्यानीं || खेचरी मुद्रा धारणीं ||
तूंचि तारक आम्हां लागुन || हरि स्वरूपी दत्तगुरू || २ ||
मानसपूजे कारणें || परिवारासह तुम्ही येणें ||
उतावीळ मी दर्शनाकारणें || ऐसी प्रार्थना करावी || ३ ||
सुवर्णयुक्त रत्नजडित || देवतामय सुंदर खचित ||
सिंहासन मी कल्पिलें येथ || बैसावें जी सदगुरू मूर्ती || ४ ||
कर्पुर चंदन मिश्रित तेलें || पादप्रक्षालना जल कल्पिलें ||
स्वीकार कराहो येवेळें || तव चरण प्रक्षाळितों || ५ ||
गंध तुलसी बिल्वपत्र || उदक अक्षता शमी पवित्र ||
यांनी भरलें हें सुवर्णपात्र || सुवास तयांचा घ्याहो स्वामी || ६ ||
सुवासिक जल मनांत आणिलें || सुवर्णपात्रीं मग तें भरलें ||
भक्तीनें तुम्हां अर्पण केलें || आचमन मधुपर्क दिगंबरा || ७ ||
सुगंधीत सुंदर तेलें || स्नानालागीं मी कल्पियलें ||
पंचामृतें गंगोदकें न्हाणिलें || स्वीकारावी देवराया || ८ ||
दिगंबराहो आचांत्यजलें || भक्तीनें तुम्हां अभिषेकिलें ||
भगवें वस्त्र मृगचर्म अर्पिलें || स्वीकार करा हीच प्रार्थना || ९ ||
बहू सूत्रांनीं असे युक्त || ऐसें हें ब्रम्हसूत्र ||
म्हणूनी देवतामय सूत्र || धारण करा गुरूवर्या || १० ||
भस्म कस्तुरी आणि केशर || चंदनयुक्त परिकर ||
रत्नाक्षता असती तयार || अलंकृत तुम्हां करितसें || ११ ||
तुळसी गंध शमि बिल्वपत्र || सुवासिक नानापुष्पें येथ ||
मनांत कल्पिली म्यां बहूत || अर्पिली तीं सदगुरूचरणीं || १२ ||
लाक्षासिता अभ्रक श्रीवास || श्रीखण्ड अगरू गुग्गुलयुक्त ||
खास अग्नींत धूपास || घातलासे यतिराया || १३ ||
सुवर्णपात्र मी कल्पिलें || तयामध्यें दीप लाविले ||
कर्पूरयुक्त प्रज्वाळिलें || स्वीकाराहो दत्तप्रभू || १४ ||
षडरसाचें पक्वान्न परिकर || गोरसयुक्त मिष्टान्न साचार ||
सुवर्णपात्रीं ठेंविलें सत्वर || भक्षण जलपान करावें || १५ ||
हस्तमुख प्रक्षालून || सवेंचि आचमन करून ||
तांबुल दक्षिणादि फलेन || संतुष्ट व्हावें स्वामिया || १६ ||
रत्नदीपांची आरती लावून || आणि आपणा नमस्कार करून ||
करितों तवगुण वर्णन || प्रदक्षिणा सहित पैं || १७ ||
दिगंबराहो तव मस्तकीं || अर्पिली मंत्रपुष्पांजली कीं ||
गायन वादन नर्तनादि || उपचार षोडश अर्पिले || १८ ||
तव प्रेरणेनें प्रेरित || आज्ञान पामर मी खचित ||
पूजा केलीहो त्वरित || प्रेरक तुम्ही संतुष्ट व्हावें || १९ ||
मग घालोनि प्रदक्षिणा || करितों सांष्टांग नमन ||
करद्वय जोडोनि जाणा || तव प्रार्थना करीतसें || २० ||
जयजयाजी दिंगंबरा || जयजयाजी अत्रीकुमरा ||
ब्रम्हा विष्णू महेश्र्वरा || सांभाळावें बाळकासी || २१ ||
तूं दीनांचा कैवारी || अवतरलासी अनुसूयोदरीं ||
तुझी भक्ती जो निरंतरी || प्रतिपाळसी वरदहस्तें || २२ ||
ऐसी प्रार्थना करून || मागतसे तुजलागून ||
या मानसपूजेचे पठण || करितां दु:खें हरवी || २३ ||
भक्तांची व्हावी कामना पूर्ण || पिशाच्चादि बाधा निरसन ||
अनेक संकटांपासून || मुक्त व्हावें भक्तानें || २४ ||
येणेंपरी मागतां वर || प्रसन्न झाला यतिवर ||
जे भक्तिभावें पठण करील नर || संकटें त्याचीं दूर पळती || २५ ||
विश्र्वास धरील जो मानसीं || त्यासी कृपा करील औदुंबरवासी ||
न म्हणा हो असत्य यासीं || अनुभवें कळों येईल || २६ ||
इति श्रीगुरूचरित्रपरमकथाकल्पतरौ सिद्धनामधारकसंवादे दत्तदास विरचित || दत्तात्रय मानसपूजास्तोत्रं संपूर्ण ||
|| श्री दत्तार्पणमस्तु || श्रीगुरूदेव दत्त ||
|| समाप्त ||

|| मानस पूजा स्वामी समर्थाची ||

|| श्रीगणेशाय नम: ||
|| मानस पूजा स्वामी समर्थाची ||
नमो स्वामी राजम दत्तावतारम || श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ति रूपम ||
ब्रम्ह स्वरूपाय करूणा कराय || स्वामी समर्थाय नमो नमस्ते ||
हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा || मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा ||
कुठें माय माझी म्हणे बाळ जैसा || समर्था तुम्हा विण हो जीव तैसा || १ ||
स्वामी समर्था तुम्ही स्मतृगामी || हृदयासनी या बसा प्रार्थितो मी ||
पूजेचे यथासांग साहित्य केले || मखरांत स्वामी गुरू बैसविले || २ ||
महाशक्ति जेथे उभ्या ठाकताती || जिथें सर्व सिद्धी पदी लोळताती
असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ || परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त || ३ ||
सुवर्ण ताटी महारत्न ज्योती || ओवाळोनी अक्षदा लावू मोती ||
शुभारंभ ऐसा करूनी पूजेला || चरणा वरी ठेवूया मस्तकाला || ४ ||
हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा || तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा
प्रणिपात साष्टांग शरणागताचा || तुम्ही वाहिला भार या जीवनाचा || ५
ही ब्रम्हपूजा महाविष्णू पूजा || शिव शंकराची असें शक्तिपूजा ||
दहीदुध शुद्धोदकाने तयाला || पंचामृती स्नान घालू प्रभूला || ६ ||
वीणा तुतार्‍या किती वाजताती || शंखादि वाद्ये पहा गर्जताती
म्हणती नगारे गुरूदेव दत्त || श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ || ७ ||
प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली || श्री दत्तस्वामीसिया स्नान घाली
महासिद्ध आलें पदतीर्थ घ्याया || महिमा तयांचा कळता जगा या || ८ ||
मीं धन्य झालो हे तीर्थ घेता || घडू दे पूजा ही यथासांग आता
अजानबाहू भव्य कांती सतेज || नसे मानवी देह हा स्वामीराज || ९ ||
प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज || तया घालुया रेशिमी वस्त्र साज ||
सुगंधित भाळी टीळा रेखियेला || शिरी हा जरीटोप शोभे तयाला || १० ||
वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा || सुवास तो वाढवी भाव साचा ||
शिरी वाहूया बिल्व तुलसीदलाते || गुलाब जाई जुई अत्तराते || ११ ||
गंधाक्षदा वाहूनीया पदाला || ही अर्पूया जीवन पुष्प माला ||
चरणी करांनी मिठी मारू देई || म्हणे लेकरासी सांभाळ आई || १२ ||
इथें लावुया केशर कस्तुरीचा || सुगंधीत हा धूप नानाप्रतिचा ||
पुष्पाजली ही तुम्हा अर्पियेली || गगनांतूनी पुष्प वृष्टी जहाली || १३ ||
करूणावतारी अवधूत कीर्ति || दयेची कृपेचीं जशी शुद्धमूर्ती ||
प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची || अशी दिव्यता स्वामी योगेश्र्वरांची || १४
हृदमंदिराची ही स्नेह ज्योती || मला दाखवी स्वामिची योगमुर्ति ||
करू आरती आर्त भावे प्रभूची || गुरूदेव स्वामी दत्तात्रयाची || १५ ||
पंचारती ही असे पंचप्राण || ओवाळूनी ठेवू चरणा वरून ||
निघेना पुढें शब्द बोलू मी तोही || मनीचें तुम्ही जाणता सर्व काहीं || १६ ||
हे स्वामीराजा बसा भोजनाला || हा पंचपक्वान्न नैवेद्य केला ||
पुरणाची पोळी तुम्हा आवडीची || लाडू करंजी असें ही खव्याची || १७ ||
डाळिंब द्राक्षें फळें आणि मेवा || हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा ||
पुढें हात केला या लेकरानें || प्रसाद द्यावा आपुल्या करानें || १८ ||
तांबुल घ्यावा स्वामी समर्था || चरणाची सेवा करू द्यावी आता ||
प्रसन्नतेतून मागू मी काय || हृदयी ठेव माते तुझे दोन्हीं पाय || १९ ||
सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू || दुजी दक्षणा मी तुम्हां काय देऊ ||
नको दूर लोटू आपुल्या मुलासी || कृपा छत्र तुमचेच या बालकासी || २० ||
धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला || पदी ठेवू दे शीर शरणा गताला ||
हृदयी भाव यावें असे तळमळीचे || करी पुर्ण कल्याण जे या जिवाचे || २१ ||
तुझें बाळ पाही तुझी वाट देवा || नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा ||
मनी पूजनाची असे दिव्य ठेव || वसो माझीया अन्तरी स्वामी देव || २२ ||
|| श्री दत्तार्पणमस्तु || श्रीगुरूदेव दत्त ||