मंगलवार, 28 जुलाई 2009

श्रीगुरुचरित्र - दशमऽध्यायः

श्रीगणेशाय नमः ।ऐकोनि सिद्धाचे वचन 
 नामधारक विनवी जाण कुरवपुरीचे महिमान
केवी जाहले परियेसा ॥१॥म्हणती श्रीपाद नाही गेले
 आणि म्हणती अवतार झाले विस्तार करोनिया सगळे
निरोपावे म्हणतसे ॥२॥सिद्ध सांगे नामधारकासी
 श्रीगुरुमहिमा काय पुससी अनंतरूपे होती परियेसी
 विश्वव्यापक परमात्मा ॥३॥पुढे कार्यकारणासी
अवतार
झाले परियेसी राहिले आपण गुप्तवेषी
तया
कुरवक्षेत्रांत ॥४॥पाहे पा भार्गवराम देखा
अद्यापवरी भूमिका अवतार जाहले अनेका
 त्याचेच एकी अनेक ॥५॥सर्वा ठायी वास आपण
 मूर्ति एक नारायण त्रिमूर्तीचे तीन गुण उत्पत्ती स्थिति आणि प्रलय ॥६॥
भक्तजना
तारावयासी अवतरतो ह्रषीकेशी शाप देत दुर्वासऋषि
कारण असे तयांचे ॥७॥त्रयमूर्तीचा अवतार
याचा कवणा कळे पार निधान तीर्थ कुरवपूर
 वसे तेथे गुरुमूर्ति ॥८॥जे जे चिंतावे भक्तजने
ते ते पावे गुरुदर्शने श्रीगुरु वसावयाची स्थाने
कामधेनु असे जाणा॥९॥
श्रीपादवल्लभस्थानमहिमा
वर्णावया अनुपमा
अपार असे सांगतो तुम्हा दृष्टान्तेसी अवधारा ॥१०॥
तुज
सांगावया कारण गुरुभक्ति वृथा नव्हे जाण
 सर्वथा करी निर्वाण पाहे वाट भक्तांची ॥११॥
भक्ति
करावी दृढतर गंभीरपणे असावे धीर
 तरीच उतरिजे पैलपार इहपरत्री सौख्य पावे ॥१२॥
याचि
कारणे दृष्टान्ते तुज सांगेन ऐक वर्तले सहज
 काश्यपगोत्री होता द्विज नाम तया वल्लभेश ॥१३॥
सुशील
द्विज आचारवंत उदीम करूनि उदर भरीत
 प्रतिसंवत्सरी यात्रेस येत तया श्रीपादक्षेत्रासी ॥१४॥
असता
पुढे वर्तमानी उदीमा निघाला तो धनी
 नवस केला अतिगहनी संतर्पावे ब्राह्मणासी ॥१५॥
उदीम
आलिया फळासी यात्रेसी येईन विशेषी
सहस्त्र संख्या ब्राह्मणांसी इच्छाभोजन देईन म्हणे ॥१६॥
निश्चय
करोनि मानसी निघाला द्विजवर उदीमासी
 चरण ध्यातसे मानसी सदा श्रीपादवल्लभाचे ॥१७॥
जे
जे ठायी जाय देखा अनंत संतोष पावे निका
शतगुणे
लाभ झाला ऐका परमानंदा प्रवर्तला ॥१८॥
लय
लावूनि श्रीपादचरणी यात्रेसि निघाला ते क्षणी
 वेचावया ब्राह्मणसंतर्पणी द्रव्य घेतले समागमे ॥१९॥
द्रव्य
घेऊनि द्विजवर निघता देखती तस्कर
 कापट्यवेषे सत्वर तेही सांगते निघाले ॥२०॥
दोन
-तीन दिवसांवरी तसकर असती संगिकारी
एके दिवशी मार्गी रात्री जात असता मार्गस्थ ॥२१॥
तस्कर
म्हणती द्विजवरासी आम्ही जाऊ कुरवपुरासी
 श्रीपादवल्लभदर्शनासी प्रतिवर्षी नेम असे ॥२२॥ऐसे बोलती मार्गासी
 तस्करी मारिले द्विजासी शिर छेदूनिया परियेसी
द्रव्य घेतले सकळि ॥२३॥भक्तजनांचा कैवारी
 श्रीपादराव कुरवपुरी पातला त्वरित वेषधारी
जटामंडित
भस्मांकित ॥२४॥त्रिशूळ खट्वांग घेऊनि हाती
उभा ठेला तस्करांपुढती वधिता झाला तयांप्रती
त्रिशूळेकरूनि
तात्काळ ॥२५॥समस्त तस्करा मारिता
एक
तस्कर येऊनि विनविता कृपाळुवा जगन्नाथा
निरपराधी आपण असे ॥२६॥नेणे याते वधितील म्हणोनि
आलो आपण संगी होऊनि तू सर्वोत्तमा जाणसी मनी
 विश्वाची मनवासना ॥२७॥ऐकोनि तस्कराची विनंती
श्रीपाद त्याते बोलाविती हाती देऊनिया विभूति
विप्रावरी प्रोक्षी म्हणे ॥२८॥मन लावनि तया वेळा
मंत्रोनि लाविती विभूती गळा सजीव जाहला तात्काळा
ऐक वत्सा ऐकचित्ते ॥२९॥इतुके वर्तता परियेसी
 उदय जाहला दिनकरासी श्रीपाद जाहले गुप्तेसी
राहिला
तस्कर द्विजाजवळी ॥३०॥विप्र पुसतसे तस्करासी
 म्हणे तू माते का धरिलेसी कवणे वधिले तस्करासी
म्हणोनि
पुसे तया वेळी ॥३१॥तस्कर सांगे द्विजासी
आला होता एक तापसी जाहले अभिनव परियेसी
वधिले तस्कर त्रिशूळे ॥३२॥मज रक्षिले तुजनिमित्ते
धरोनि बैसविले स्वहस्ते विभूति लावूनि मग तूते
सजीव केला तव देह ॥३३॥उभा होता आता जवळी
अदृश्य जाहला तत्काळी कळे कवण मुनि बळी
 तुझा प्राण रक्षिला ॥३४॥होईल ईश्वर त्रिपुरारि
भस्मांगी होय जटाधारी तुझी भक्ति निर्धारी
म्हणोनि आला ठाकोनिया ॥३५॥ऐकोनि तस्कराचे वचन
 विश्वासला तो ब्राह्मण तस्कराजवळिल द्रव्य घेऊन
गेला यात्रेसी कुरवपरा ॥३६॥नानापरी पूजा करी
ब्राह्मणभोजन सहस्त्र चारी अनंतभक्ती प्रीतिकरी
 पूजा करी श्रीपादुकांची ॥३७॥ऐसे अनंत भक्तजन
मिळूनि
सेविती श्रीपादचरण कुरवपूर प्रख्यात जाण
 अपार महिमा ॥३८॥सिद्ध म्हणे नामधारकासी
संशय धरी तू मानसी श्रीपाद आहती कुरवपुरासी
अदृश्यरूप होऊनिया ॥३९॥पुढे अवतार असे होणे
 गुप्त असती याचि गुणे म्हणती अनंतरूप नारायण
 परिपूर्ण सर्वा ठायी ॥४०॥ऐसी श्रीपादवल्लभमूर्ति
लौकिकी प्रगटली ख्याति झाला अवतार पुढती
 नृसिंहसरस्वती विख्यात ॥४१॥म्हणोनि सरस्वतीगंगधरू
सांगत कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरू
 सकळाभीष्टे साधती ॥४२॥इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे भक्तसंकटहरणं
 नाम दशमऽध्यायः ॥१०॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु
ओवीसंख्या ॥४२॥श्रीगुरुदत्तातरेयार्पणमस्त

 



--
Ravindra S. Dhurandhar
Ph No.9324107806
http://gorakhmantras-ravidhurandhar.blogspot.com/

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें